Jan 27, 2022
कथामालिका

दुर्गा ... भाग 13

Read Later
दुर्गा ... भाग 13


दुर्गा
भाग 13

राकेशच्या झालेल्या प्रकारातून आर्या आणि त्याच्या वडिलांमध्ये थोडी वादावादी झाली होती.  पण आर्याविरचा स्वभाव बघता , त्यांनी चूप बसनेच योग्य समजले होते. अर्यविरची आई सुद्धा त्याच्यावर बरीच नाराज होती. त्यांना दुर्गा अजिबात आवडली नव्हती, वरतून आर्याविरने दुर्गाची बाजू घेतल्यामुळे त्या दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात दुर्गाबद्दल आणखीच  अढी निर्माण झाली होती. त्यांच्यासमोर दुर्गा नाव काढलेले सुद्धा त्यांना आवडत नव्हते . आर्याविरने आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता , पण त्या त्याचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या, त्यामुळे थोडा वेळ घेऊया विचार करत त्याने आईसमोर दुर्गा हा विषय बंद केला होता.

*******

दुर्गाचे कॉलेज सुरू झाले होते.  सोबत आजीचे खाण्याचा ठेला सुद्धा, जिथे ती कॉलेज नंतर आजीला मदत करत होती. त्यासोबतच  आर्यविर  सांगेल ती प्रॅक्टिस सुद्धा. हे सगळं सांभाळता सांभाळता दुर्गाची खूप दमछाक व्हायला लागली होती. आर्याला सुद्धा ते लक्षात यायला लागले होते. काय उपाय करता येईल, याच्यावर त्याचा विचार सुरू होता.
 

" आजी दुर्गा ???" ....आर्या.

रोज पहाटे दुर्गा आणि आर्या मॉर्निंग एक्सरसाईज सोबत करत होते. रोज  सकाळी 4.30 वाजता  आर्या त्याचा गाडीने दुर्गाच्या चाळीत दुर्गाला न्यायला   यायचा. आज पंधरा मिनिटे वाट बघूनही दुर्गा खाली नव्हती आली , म्हणून मग तोच वरती तिच्या घरी गेला होता. दार खटकवले तर आजीने दार उघडले होते .

" झोपली आहे , थोडी कणकण होती पोरीला  रात्री  . झोपू दिलं, उठवले नाय . ते काय अलार्म वाजत होता , पण म्याच बंद केलं. दमायला होते पोरीला . म्हणून म्हणलं आजच्या दिवस आराम करू देत. " ...आजी

" मी बघू काय तिला ?" ....आर्या

" हो हो , बघ की . ये आतमध्ये . तशीही  मी खाली चालली आहे , बस घटकाभर पोरीजवळ. येतेच म्या. " ...आजी आर्याविरला आतमध्ये घेत , दार लोटून बाहेर तिच्या प्रातविधीला निघून आली.

दुर्गा खाली एका पतल्याश्या वाकडीवर चादर पांघरून झोपली होती. आपण इतक्या ऐशोआरमात राहतो , इतके पैसे कमावतो, पण आपली लेडी लव अशी या परिस्थितीत राहते, बघून त्याला थोडे वाईट वाटत होते.

" आर्या ...... ह्याच सवयी चांगल्या असतात जीवनासाठी, आरमाचं जीवन शरीराला कमकुवत बनवते. नका जास्ती विचार करू . मी जशी जगतेय , एकदम परफेक्ट अँड फाईन आहे " ..... दुर्गा

" तू जागी आहेस ???" .... आर्या तिच्या जवळ जात खाली बसत तिच्या डोक्यावर हात ठेवत ताप चेक करत होता.

" हम्म , तुम्ही आलात तेव्हाच जागी झाले होते. पण उठायला जड वाटत होते म्हणून उठली नाही . " .... दुर्गा

" थोडा ताप आहे . आरामाची गरज आहे  " ..... आर्या

" हो, आणि एक जादू की झप्पीची " ... म्हणतच दुर्गा त्याचा एक हात आपल्या हातात घेत  त्याच्या मांडीवर आपले डोक ठेवत झोपली.

" बच्चा ,   आईची आठवण येत आहे ना ????" .... आर्या तिच्या केसातुन हात फिरवत तिला कुरवाळत बोलला.

" तुम्हाला कसं कळलं?" ...दुर्गा डोळे मिटूनच बोलत होती.

" कळतं मला. या नक्ट्या नाकावरचे हे जे दोन हेड लाइट्स आहेत ना , ते सांगतात मला सगळं. " .... आर्या

" ह्मम ..... झोपू मी??" .... दुर्गा आळशी आवाजात बोलली.

" ह्मम , झोप ..." .... आर्या तिच्या डोक्यातून हात फिरवत तिच्याकडे बघत  बसला होता. थोड्या वेळाने आजी येण्याची चाहूल लागली तसे दुर्गाने त्यांच्या मांडीवर ठेवलेले तिचे डोक खाली उशीवर ठेवले.

" अगं झोप ..." ... आर्या

" आजी येत आहे " ......दुर्गा

" मग , काय होते ??? त्यांना माहितीच आहे सगळं " .... आर्या

" नको , मोठ्यांचा मान ठेवत त्यांच्यापुढे अदबीने वागायला पाहिजे ." .... दुर्गा

" बरं बाबा...." ....आर्या , तिथून उठत आजीच्या बेडवर जाऊन बसला.

" काय रे , काय म्हणती दुर्गा ??? " ...आजी आतमध्ये येत बोलली.

" ताप आहे थोडा , आरामाची गरज आहे " ....आर्या

" हो  न .... बरं चहा घेशील काय??? दुर्गा साठी पण ठेवते, रात्री जेवली नव्हती नीट " ....आजी

" हो ..." .... आर्या

आजीने गरम गरम आल्याचा चहा केला. एक कप आर्या दिला.

" दुर्गे,  चहा बिस्कीट खाऊन घे , बर वाटेल " ....आजी तिच्या जवळ जात तिला उठवत बोलल्या. 

" ह्मम...... झोपू दे आजी ...." ....बोलत परत दुर्गा झोपली.

" दुर्गा  घे,  पियुन घे आधी , मग झोप , कोण उठवणार नाही. " .....आजी

"  उठाव लागेल, हातपाय धुवाव लागेल थोड्या वेळाने पिते    ......" ....दुर्गा

" राहू दे , असाच पिऊन घे ....." ...आजी
 

" कोण कुठली दुर्गा, कोण कुठली आजी.... पण किती छान प्रेमाचं, काळजीचे नाते निर्माण झाले आहे दोघींमध्ये.... खरंच नाते टिकवण्यासाठी नाती रक्ताचीच असणे गरजेचे नसते, माणुसकी, प्रेम, काळजी , समर्पण याने सुद्धा नाती खूप सुंदरपणे फुलवता येतात " ....आर्या चहाचा एक एक घुट पित दोघांमध्ये चालले बोलणे बघत विचार करत  होता.

दुर्गा जागेवरच उठून बसली. हाताने केस नीट केले. ओढणी चेहरा पुसून घेतला. आजीने तिच्या हातात चहा बिस्कीट दिलीत.

" म्या हिला म्हणलं , ठेल्यावर जास्ती नको थांबू, पण ऐकत नाय हि " ....आजी एका कोपऱ्यात चहा पीत आर्या सोबत बोलत होती.

" असं कसं, घर आपलं आहे ना, मग तू एकटीने काबर राबायच ??? " ..... दुर्गा

" हो , पण तुझं शिक्षण पण महत्वाचं आहे . अशी तब्बेत खराब होत राहिली तर कसं व्हायचं ???" .... आजी

" ते काय रोज होते काय??? असं कधीतरी होत असते , येवढं काय त्यात " ...दुर्गा

" पहा आता , तूच समजव पोरा, खूप हट्टी हाय, कोणाच्या बापाचं ऐकत नाही ....." ...आजी वैतागत बोलली.

" असं कसं तुला एकटीला राबू देईल , तुझं पण किती वय झालं आहे. तुझ्या शिवाय कोण आहे मला , तुला काही नको व्हायला . " .... दुर्गा

" मला का होतंय....... अन् माझं आता काही झालं तरी चालते, तुझ्या जीवनाची सुरुवात हाय ना ..." ... आजी

दोघींची आता तू तू मैं मैं सुरू होती. आर्य ते बघत होता.

" तुमचं झाले असेल बोलून तर मी काही बोलू काय ??? माझा जवळ काही सोल्युशन्स आहे यावर " .... आर्या

" तुम्ही सुद्धा आजीसारखेच बोलणार , मी आजीला काम करायला एकटे सोडणार नाही , and this is final Mr Aaryaveer !!!!!! ..."...दुर्गा

" ठणक बघून घ्या बाईसाहेबच्या  आवाजातली ... कोण म्हणेल बरे नाही म्हणून ...." ...आजी

" बरं , तुम्ही दोघी परत सुरू नका होऊ , मी काय सांगतोय ते नीट ऐका. " ....आर्या

" बोल पोरा ...." ...आजी

" आपण आजीचे छोटे दुकान रेनोवेट करूया. आजीच्या हातची मिसळ पाव आणि दुर्गाच्या हातचा वडा पाव जास्ती फेमस आहे ना ... आपण त्या सोबत आणखी काही पदार्थ ऍड करू आहेत. दोन लोकं ठेऊ. ते हे सगळं करतील. आजी सगळ्यांवर लक्ष ठेवतील. आणि जे तुमची ओळख आहे , स्पेशली लोकं खायला येतात ते पदार्थ , सुट्टीच्या दिवशी घरी तुम्ही आणि दुर्गा त्याचे मसाले बनऊन घेत जा. जी दोन लोकं आपण ठेऊ त्यांना तुम्ही ट्रेन करा. दुर्गा अधून मधून तिथे येत जाईल . म्हणजे दोघींची दग दग कमी होईल " ....आर्या

" पण पोरा, लोकं ठेवायची म्हणलं तर त्यांना पगार पण द्यावं लागल . इतके पैसे नाही . दुकानाच नविणकरण पण कठीण आहे. " .... आजी

" तीन महिन्यांसाठी मला द्या , मी करतो आहे सगळं. " .... आर्या

" पण......" ....दुर्गा

" मला माहिती तुम्ही दोघीही खूप स्वाभिमानी आहात. असं समजा माझ्याकडून लोन घेतले आहे , नंतर चांगली कमाई झाली की महिन्याच्या महिने एक रक्कम ठरवून मला परत करा . तुमच्या दोघींच्या हाताला खूप चव आहे , जर आपला उत्कर्ष होत असेल, कमाई होत असेल, तर प्रॉब्लेम नसायला हवा " .... आर्या

" दुर्गा बरोबर बोलत आहे हा , आणि तुझं भविष्य पण महत्वाचे हाय , आणि आपली ओळख वाढत असेल तर चांगलेच हाय " .... आजी

" चला तर मग ठरलं ........" ... आर्या दुर्गाकडे बघत होता . तिच्या चेहऱ्यावरचा भाव वरून त्याला  काही कळत नव्हते

" काय चालतंय नव्हं ???....." आर्या दुर्गाकडे बघत बोलला.

" चालतंय काय, उडतय की ....." ...दुर्गा आनंदने बोलली

" बरं , आजी दुर्गाला घेऊन जातो आता घरी, तुम्ही नसणार दिवसभर घरी, तिच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसेल आहे . रात्री परत इथे आणून पोहचवेल "....आर्या

" हो , घेऊन जा . थोड जबरदस्ती खाऊ पियु घाल, पोरगी लय नाटकं करती खातांना . " ...आजी

" हो , माहिती थोडी आगाऊ आहे , पण तुम्ही काळजी नका करू ,  लक्ष ठेवतो मी . दुर्गा आवर, मी बाहेर आहो  ...." ...म्हणत आर्या खोलीच्या बाहेर येत तिची वाट बघत होता.

आर्या दुर्गाला त्याच्या घरी घेऊन आला. त्याच्या रूम मध्ये नेत तिला बेडवर झोपवले.  खाली जात कुकींग स्टाफला ब्रेकफास्ट आणि जेवणात काय काय बनवायचे सगळे समजावत ऑर्डर देऊन परत वरती रूम मध्ये आला.

" आराम कर , ब्रेकफास्ट घेऊन येईल सुनीता मावशी , मग मेडिसिन देतो, संध्याकाळ पर्यंत बर वाटेल आहे.. " ... आर्या . दुर्गाने होकारार्थी मान हलवली.

आर्याची  आंघोळ पांघोळ,  आवरावरी , मध्येच एखादा फोन कॉल , असं सगळं सुरू होते, शांतपणे तो रूम मध्ये इकडे तिकडे फिरत त्याचे काम करत होता.   घरात इतकी नौकर मंडळी असून सुद्धा तो स्वतःचे कामं स्वतः करत होता, ते बघून दुर्गाला त्याचे खूप कौतुक वाटत होते. दुर्गा बेडवर पडल्या पडल्या त्याला बघत होती.

सुनिता मावशी वरतीच ब्रेकफास्ट घेऊन आल्या . दोघांनीही नाश्ता आटोपला .

" हे .... हे काय करत आहात तुम्ही  ???" .... दुर्गा  आर्याच्या हातात इंजेक्शन बघत घाबरतच बोलली.

" दुर्गा ताप आहे आणि विकनेस आहे तुला , इंजेक्शन ने लवकर बर वाटेल आहे." .... आर्या तिच्याजवळ येत बोलला.

" ना.....नाही, मला नको ते .... मला गोळी हवी " ..... दुर्गा

" नाही, हेच घ्यायचे , संध्याकाळ पर्यंत बरी होशील आहे . नाहीतर उगाच दोन चार दिवस जातील " ... आर्या

" नाही...... प्लीज ..... म..... म........" ..त्याला जवळ आलेले बघून तिचे शब्द तोंडातच अडकले.... घाबरलेल्या नजरेने ती त्याला बघत होती.

" Don't tell.... तू घाबरते इंजेक्शनला??? .... ' द दुर्गा , नाद नाय करायचा ' चाकू छुरे, काठी लाठी बिनधास्त हाताळणारी, एक छोट्या सुई ला घाबरते ??? Unbelievable  ....." ..आर्या आपले हसू कंट्रोल करत बोलत होता.

" हे बघा ,मी घाबरत नाही, आणि तुम्ही डॉक्टर नाही, इकडेतिकडे कुठेही टोचली तर???" ....दुर्गा

" तुला काय माहिती, मी कोण आहे ते ???  .... आर्या तिच्या जवळ बसत ,तिच्या डोळ्यात बघत गूढ आवाजात बोलला.

" कोण आहात ??? काय करता ??" ..... दुर्गा , दुर्गा  त्याचा डोळ्यात आणि त्याच्या गूढ आवाजात  अडकली होती.

" मी आधी करत नव्हतो, पण आता करतो " ..... तिला गुंतलेले बघून त्याने हळूच कापसाने तिच्या दंडावर स्पिरीट लावले आहे इंजेक्शन दिले.

" काय...???" ...दुर्गा

" प्रेम....." ....आर्या, इंजेक्शन काढत तिच्या हातावर कापसाचा बोळा घट्ट पकडून ठेवला होता.

" काय???" .....दुर्गा .... " हे काय????? मला नको इंजेक्शन , प्लीज ऐका ना माझे....मला भीती वाटते " .... दुर्गा त्याचा हातात कापूस बघून बोलली.

" कठीण आहे बाबा माझं..... कसं करायचं आता" ... आर्या

" काय कठीण ??? "....दुर्गा

" मला क्रिकेट टीम तयार करायची होती  " .... आर्या

" मग करा .... कोण अडवते आहे तुम्हाला  " ....दुर्गा

" तू ??" ..... आर्या

" मी का अडवू तुम्हाला??" ....दुर्गा

" दुर्गा तू किती ' ढ ' आहे ग .... झाले इंजेक्शन देऊन " .....आर्या

" काय??? " .... दुर्गा

" I love you ......" ... आर्या

" तुम्ही ना , माझ्या डोक्यावरून जाता " ....दुर्गा

" कधी ना इथे हृदयात पण जाऊ दे .... तू आतापर्यंत मला I love you म्हणाली नाही आहेस " ... आर्या

" ढ म्हणालात ना , आता  वाट बघा ...." .. दुर्गाने हाताने ठेंगा दाखवला.   

" झोपा ....जास्ती ताण नका देऊ डोक्यावर " ....त्याला तिचे हसायला आले होते.  , तिचे नाक आपल्या बोटांच्या चिमटीत पकडत बोलला .

" तुम्ही पण सरळ सरळ बोलत जावा ..." पांघरून डोक्यावरून घेत दुर्गा  बेडवर झोपली .

तिला झोपायला सांगून  तो लॅपटॉप उघडून आपले काम करत बसला होता.  दुर्गाचे इकडून तिकडे कड पलटने सुरू होते.

" दुर्गा काय चालले आहे ??? झोपायला सांगितले आहे ना , झोप शांत " ...तिची चुळबूळ बघत तो बोलला. .

" काहीतरी गडबड आहे , झोप नाही येत आहे " ...दुर्गा

" काय गडबड ???? झोपायच चुपचाप " ....आर्या , थोड्या कडक आवाजात बोलला. तशी तिची चुळबुळ कमी झाली.

" Yess  coming ...." ... आर्या चा फोन वाजला होता, फोनवर दोन शब्द बोलत त्याने फोन ठेवला.

" दुर्गा , मला काम आले आहे , थोडा वेळ लागेल यायला. शांत झोपायाचे , गडबड करायची नाही . " .... आर्या

" ह्मम .... असे करत आहेत, कसे काही मी लहान बाळ आहे ...." ... दुर्गा स्वतःतच बडबडत होती.

******

" प्लॅन???" .... आर्या

" नाही माहिती " ....तो

"  हे बघ, मला मारायला आवडत नाही , पण वेळ सुद्धा घालवलेला आवडत नाही ..." ... आर्या थोडा नरमेने बोलत होता.

"मला खरंच माहीत नाही " .....तो , तो बोलतच होता की त्याच्या जबड्यावर एक मोठा आघात झाला . तो पलीकडे जाऊन पडला. त्याच्या तोंडातून रक्त आणि एक दात बाहेर पडला. त्याच्या चेहऱ्याचा नक्षाच बदलला.. आर्या त्याच्या पुढे जात उभा राहिला. आता आर्याचे डोळे रागाने लाल झाले होते. आता आर्याला बघून तो चांगलाच घाबरला. आर्या परत हात उचलणार की त्याची पँट मध्येच बाथरूम झाली.

" सांगतो, सांगतो "....तो रडत बोलला .

" किती लोकं आहेत??..." .... आर्या

" चार......म्हणजे मल तेवढेच माहिती . मला फक्त एक बॉक्स पोहचून द्यायचा होता .." .....तो

आर्या त्याचं ऐकून बाहेर आला ...

" टोनी , रेकॉर्ड एवरीथिंग .....  " ... आर्या

" ओके , त्याचं काय करायचे??? " .... टोनी

" माहिती घेऊन, थोडे धमकावून  सोडून द्या त्याला. पण त्याच्यावर नजर ठेवा . नक्कीच तो काहीतरी गडबड करेलच." ....आर्या

" ठीक आहे ." ... टोनी

एका जंगल समान परिसरात, एका पडक्या झोपडीत एका वीस बावीस वर्षाच्या तरुणाला पकडून आणून ठेवले होते. त्याच्याकडून काहीतरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठीच आर्या इथे आला होता.

इकडे दुर्गाची चुळबुळ सुरु होती.  सुनिता मावशी तिला अधूनमधून येऊन बघून जात होत्या.

" कसे झोपतात हे लोकं या बेडवर ....आपले तर हातपाय हेकडे व्हायचे यावर. खालून पण मऊमऊ, वरतून पण मऊमऊ ....दुर्गा कठीण आहे तुझं या सगळ्यात राहायचं म्हणजे दिव्यच आहे... " ...दुर्गा स्वतःशीच बोलत होती.

" मॅडम , काही पाहिजे आहे काय ??? " ...सुनीता

" मालक आले काय???" ... दुर्गा

" नाही, त्यांना उशीर होईल " ...सुनीता , ते ऐकून दुर्गा जागेवर उठून बसली.

" मॅडम तुम्हाला मेडिसिन दिले आहे, सरांनी तुम्हाला आराम करायला सांगितला आहे. " ...सुनीता

" सरांची चमची ........" ..दुर्गा कुजबुजली

" मॅडम , काही बोललात तुम्ही ??" ....सुनीता

" तुमच्याकडे अशी छोटी गादी आहे काय??, " ...दुर्गा

" काय???" ....सुनीता

" मला या बेड वर झोप येत नाही आहे. अंग भारीच दुखायला लागले माझे. मला अशा बेड झोपायची सवय नाही, बारीक काही असेल तर द्या" ...दुर्गा

" पण सर....." ....सुनीता

" ठीक आहे , मग मी झोपत नाही, मालकांनी विचारले तर तुमचे नाव सांगणार.. ..." ..दुर्गा

" नको नको, थांबा , घेऊन येते मी " ....सुनीता बाहेर गेली आणि थोड्या वेळातच एक छोटी कापसाची गादी घेऊन आली .

" ही???? ही पण हीचीच मावशी आहे , हे नकोय " ....दुर्गा

" यापेक्षा दुसरे काही नाही. " ....सुनीता

" चटई आहे???" ....दुर्गा

" हो ...." ...सुनीता

" तीच द्या मग " ...... दुर्गा

" मॅडम, सर रागावतील "  सुनीता

" मी आहे ना , जा आता घेऊन या लवकर , झोप येते आहे मला ..." ... दुर्गा

सूनिताने तिला चटई आणून दिली . दुर्गाने ती खाली टाकली, त्यावर एक चादर टाकली . आपल्याच हाताची उशी करत , एक चादर पांघरून झोपली.

जवळपास चार तासांनी आर्या घरी आला .
" दुर्गा कशी आहे ??? " ...आतमध्ये येता येता त्याने सुनीता मावशीला प्रश्न केला.

"  ठीक आहेत " ...सुनीता

" जेवण केले???" ... आर्या

" मॅडम झोपल्या आहेत ." ...सुनीता

" ह्मम " ....बोलतच तो वरती गेला. बघतो तर दुर्गा त्याला खाली झोपलेली दिसली . आधीच तो रागात होता, त्यात त्याला दुर्गा खाली झोपलेली दिसली. त्याचा रागाचा पारा भयंकरच चढला . तो बाहेर जायला वळला.

" Calm down  Mr Aryaveer , calm down ...... मी ढ नाही आहे, आणि खरंच कठीण आहे तुमचं  ....." आर्याच्या कानावर तिचे शब्द पडले तसे  त्याला हसायला आलं... त्याचा राग कुठल्या कुठे पळाला होता. तो परत वळत तिच्या जवळ येऊन बसला.

" तुमच्या चमची...... "..बोलता बोलता तिने जीभ चावली..तो एक भूवयी उंचावत तिच्याकडे बघत होता.

" म्हणजे, सुनीता मावशीची काहीच चूक नाही आहे. मला या अश्या बेडवर झोपायला नाही जमत .....रागावू नका त्यांना ....." ... दुर्गा

" ढ च काय म्हणत होती.....??" .... आर्या

" कुठे काय???" ...... दुर्गा

" आता बोलत होती ?" .... आर्या

" सुनिता मावशी , रागावू नका " ....दुर्गा

" हो ssss??? त्याच्या पाहिले ???" ...आर्या

" Calm down ....." .. दुर्गा

" त्याच्या नंतर " ..... आर्या

" आठवत नाही ....." ...दुर्गा , दुर्गा हसत बोलत होती.

" हो का, आठवत नाही काय , थांब आठवण करून देतो " ... म्हणत त्याने तिचा कंबरेला गुदगुल्या करायला सुरुवात केली ....आता असाच त्यांचा एकमेकांना गुदगुल्या करण्याचा खेळ सुरू झाला होता....... गुदगुल्यामुळे तिला आता हसू अनावर झाले होता....पोट पकडून ती हसत होती, तिला बघून त्याला हसायला आलं होते.....

*****

" Any Information ???" ... आर्या

" You were right... त्याला सोडले आहे, त्याचा काही लोकांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे " ..टोनी

"ह्मम , आपण त्याच्यापर्यंत पोहचलो आहे, त्यांना कळले असेल, त्याला कदाचित ते जिवंत नाही सोडतील. त्याला काही व्हायच्या आधी आपल्याला त्या लोकांपर्यंत पोहचायचे आहे " ... आर्या

" Yess sure ... आहेत आपली लोक त्याच्या मागावर . " .. टोनी

" And speed up the activities ..." ... आर्या

" Yess...and you need to be more careful . ते मागावर असू शकतात ..." ... टोनी .

" ह्मम ..."... आर्या

*******

आर्याने आजीचे खाण्याचे दुकानाला नवीन रूप दिले. ठरल्याप्रमाणे मेनू लिस्ट मध्ये आणखी काही पदार्थ जोडले गेले होते. ते एक छोटे रेस्टॉरंट सारखेच तयार झाले होते.  दोन नवीन मुल कामावर ठेवली होती. आणि आणि दुर्गाने त्यांना सगळ्या स्पेशल ट्रिक्स शिकवल्या. मसाले मात्र आजी आणि दुर्गाच करायचे. त्यामुळे त्यांच्या पदार्थांना एक वेगळी युनिक चव प्राप्त झाली होती, ज्यामुळे त्यांचे रेस्टॉरंट ची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.

रेस्टॉरंटचे सगळं काम व्यवस्थित मार्गी लागल्यामुळे दुर्गा बरीच निश्चिंत झाली होती. आजी एकटीच सगळं सांभाळून घेत होती. त्यामुळे दुर्गाला आता बराच वेळ मिळत होता.

आर्याने आता दुर्गाच्या  पर्सनल डेव्हलपमेंटवर भर द्यायला सुरु केले होते. इंग्लिश तिला येत होते, पण पूर्णपणे इंग्लिश मध्ये बोलणे तिला तेवढे जमत नव्हते, त्याची पण प्रॅक्टिस सुरू केली होती.  सोबतच तिला UPSC चा परीक्षेसाठी तयारी करायला गाईड करत होता. तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले की ती या परीक्षा देऊ शकणार होती.

****

 

क्रमशः 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️