Jan 27, 2022
प्रेम

दुर्गा ... भाग 12

Read Later
दुर्गा ... भाग 12

भाग 12

" सिक्युरिटी कॉल द पोलीस ........."

आवाज दिल्यावर सुद्धा कोणी आले नाही बघून त्यांचा आणखीच संताप झाला होता...... त्या परत सिक्युरिटीच्या  नावाने ओरडत होत्या.  घरात होणाऱ्या गोंधळाचा आवाज बाहेर पर्यंत येत होता....काहीतरी मोठं घडलंय लक्षात घेऊन  आर्या जो आताच बाहेरून आला होता, तो  गाडी तिथेच सोडून पळतच आतमध्ये आला ... आणि समोरचे दृश्य बघून त्याचा  काळजात धस्स झाले होते  , त्यासोबतच त्याला खूप रागही येत होता. 

समोर हॉलमध्ये एक पस्तीसच्या आसपासचा पुरुष  खाली जमिनीवर   विव्हळत पडला होता, त्याच्या चेहऱ्यावर काळे निळे दागर पडले होते, चेहरासुद्धा बऱ्यापैकी सुजला वाटत होतं.  दुर्गा एका हाताने  त्याची कॉलर पकडत दुसऱ्या हाताने चाकू त्याच्या मानेवर धरला होता. दुर्गाचे केस पूर्णपणे विस्कटलेले होते , तिचे डोळे रागाने लाल झाले होते ....तिची ओढणी कुठेतरी खाली पडली होती.. हॉल मध्ये काही वस्तू इकडे तिकडे पडल्या होत्या. काही वस्तू फुटफाट झाल्या होत्या ..... तिथली ,  त्या रूमची हालत बघून तिथे काय झाले असेल याचा अंदाज येत होता. 

तेवढयात बाहेरून धावत स्क्युरिटी गार्ड आतमध्ये आले...

" रमेश ,go out, I will handle this matter, and no need to call the police,and where is all household staff??? Tell them to report me  " .... आर्या

" Yess Sir ....." .....आर्याचे बोलणे ऐकून ते गार्ड्स बाहेर चालेले गेले.

" यू जंगली मुलगी...... दूर हो ......." ...

" दुर्गा sss.......... " ... आर्या ओरडतच दुर्गाजवळ गेला..तिचा हात पकडून तिला दूर केले.

आर्याच्या आवाजाने ती भानावर येत त्याच्याकडे बघत होती ..

" मला सोडा मालक, आज मी याला सोडणार नाही. मुलींना काय वस्तू समजुन ठेवले आहे काय या लोकांनी , का यांच्या बापाची इस्टेट , पाहिजे तसे वागले, पाहिजे तसे खेळले . नाही याला जन्माची अद्दल घडवली तर नाव नाही लावणार ' दुर्गा '" .....दुर्गा

" दुर्गा , सोड त्याला , मी बघतो त्याला ,  " .... आर्या

" नाही, मी आज याला सोडणार नाही ...." ....दुर्गा

" कायद्याला आपल्या हातात घेऊ नको दुर्गा, तुझं भविष्य घडावणयात काही अडथळा निर्माण व्हायला नको. माझ्यावर विश्वास आहे ना, मी बघतो त्याला." ... आर्या , त्याचे ऐकून दुर्गा बाजूला झाली. 

" दुर्गा , तू ठीक आहे???" ... आर्या

" दुर्गा???? वीर ही जंगली मुलगी दुर्गा आहे ???" .....

" Mom , हो हीच दुर्गा आहे ...." ...आर्या

" व्हॉट????? तू हिला भेटायला घेऊन येणार होता ??" आर्याची आई स्वाती रागाने तीच्याकडे बघत बोलत होत्या.

" मॉम, आपण नंतर बोलू, आधी इथे काय घडले आहे ते बघू दे, आणि घरातला सगळा स्टाफ का गायब आहे? कुठे  गेला.....??? सिक्युरिटी sssss " ....आर्या ओरडला..

" दुर्गा तू  ठीक आहे ??? " ... आर्या तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत, तिचे केस नीट करत बोलत होता.

" ते ....ते ....माझ्या....माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते ......." ... दुर्गा आर्याकडे बघत बोलत होती.  आर्याला आता भयंकर राग येत होता, आपोआप त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेलेल्या.....

" काय?? कसे शक्य आहे हे??? Are you mad ?? आणि तू काय तिला बघतो आहे?? त्याला बघ आधी  , हिने काय केले आहे त्याच्यासोबत ते ?? " .... स्वाती

" जिवंत आहे ......, तुम्ही आलात म्हणून वाचला हा " ...दुर्गा रुक्षपणे बोलली.

" मी सोडणार नाही त्याला आता " .... आर्याने त्याची कॉलर पकडत त्याला उचलून उभ केले आणि परत त्याला मारले, तो परत खाली पडला.

" वीर  , तू काय हिच्यावर विश्वास ठेवतो आहे , ही अशी रानटी , कोण चुकूनही बघणार नाही हिच्याकडे ..." ... स्वाती

" Mom please, ती खरे बोलते आहे , आणि हा राकेश कसा आहे मला चांगलेच माहिती आहे  " .... आर्या

" वीर , तू आता घरातल्याच व्यक्तींना वाईट म्हणणार, या जंगली मुली साठी?? या मुलीच अश्या असतात, पैसे मिळवण्यासाठी या काहीपण करू शकतात. तुझ्यासारख्या मुलाला तिने नादी लावले आहे , मग हा राकेश तर काहीच नाही त्यापुढे..." ....स्वाती

" Mom, दुर्गा अशी नाही आहे , and please no more words against Durga . हा राकेश , याला तर मी बघतोच,  तुमच्या पुढे संस्कारी बनतो, पण मला याचे सगळेच कारनामे  माहिती आहे . खूपदा वारनिंग देऊन सोडले आहे याला . मला हा कधीच घरात नको होता, पण तुमच्यामुळे मी याला घरात सहन करत होतो . " ..... आर्या, त्याने गार्डला कॉल केला , त्यांना काही इन्स्ट्रक्शनस् दिले . गार्ड्स  राकेशला उचलून बाहेर कुठेतरी घेऊन गेले.

" वीर , तू काय करणार आहेस त्याच्यासोबत ??? विसरू नको तो तुझ्या बाबाचा नातेवाईक आहे ते . " ...स्वाती

" मॉम , एका मुलीवर वाईट नजर टाकण हा खूप मोठा गुन्हा आहे .  त्याचे काय करायचे ते मी बघेल आहे. " ... आर्या

" ही मुलगी मला अजिबात आवडली नाही आहे वीर . आईवडील चांगलेच ट्रेन करतात अशा मुलींना , चांगल्या   घरच्या मुलांना कसे फसावयचे ते. ही तुझ्यासाठी ठीक  नाही आहे , कोणत्याही अँगलने ही तुला मॅच होत नाही. " ....स्वाती

" हे बघा काकी ....." ....दुर्गा

" काकी ??? It's so down Market . वीर हिला नीट बोलता पण येत नाही . I can't bare her here ....." .. स्वाती

" हे बघा मॅडम , तुम्ही मालकांच्या आई आहात म्हणून मी जास्ती बोलणार नाही, पण  माझ्या मायला इथे मधात आणू नका . आम्ही गरीब आहोत, पण असे संस्कार नाहीत माझे .  आणि तो मुलगा माझ्यासोबत जबरदस्ती करत होता , म्हणून मारले आहे मी त्याला , आणि परत कोणी असे वागेल तर परत मारेल मी  " ....दुर्गा

" You cheap girl, तुझी हिम्मत कशी झाली मला परतून उत्तर द्यायची .  आताच्या आता माझ्या घरातून चलती हो." ..... स्वाती चांगल्याच चिडल्या होत्या , आणि चिडतच बोलत होत्या. 

" Mom, I said no more words for Durga . I love her .....more than that I respect her ..." ... आर्या

" बघितले तुझ्यामुळे माझा मुलगा बदलला आहे . आजपर्यंत तो कधीच माझ्यासोबत असा बोलला नव्हता. She is so down market , हिच्यापेक्षा तर घरातले नोकर बरे ....."  स्वाती चिडतच आतमध्ये निघून गेल्या .

" मालक, मी काहीच केले नव्हते. मला  तो एक माणूस इथे काम करणारा म्हणाला की साहेब वरती बोलावत आहे . म्हणून मी वरती रूम मध्ये गेले. कोणीच दिसले नाही, परत यायला वळली तर तो मुलगा उभा होता. त्याने खोलीचे दार बंद करून घेतले. मी त्याला म्हणाले मला जाऊ दे , तो म्हणाला वीरसोबत फिरत असते , त्याच्या सोबत  झालंच आहे ना सगळे , माझ्याकडे विरपेक्षा जास्ती पैसे आहेत , पाहिजे तितके देतो..  ....असे काही काही बोलत मला स्पर्श करत होता. मी त्याला ढकलून , खोलीचे दार उघडून खाली पळत आली . तो पण माझ्या मागे आला आणि माझी ओढणी , कपडे ओढत होता. म्हणून मी त्याला मारले.  " ..... दुर्गा

" दुर्गा..... Everything is fine now ...right ..." ... आर्या

" मालक  , मॅडम म्हणाल्या मी तशी नाही आहे. माझ्या मायने असे काही शिकवले नाही. मी तुम्हाला नाही फसवले. " ....दुर्गा

" आर्या ......" ..... आर्या , तो तिच्या जवळ जात तिला आपल्या मिठीत घेत बोलला.

" ह ....??" ....दुर्गा , त्याला असे करतांना बघून ती गोंधळली आणि काय बोलत होती ते सुद्धा विसरली.

" आर्यविर  ...म्हण..... मालक नाही ..... " ...आर्या

" आर्याविर ??? " ...दुर्गा

" हो, आता इथे मी काही कशाचा मालक नाही आहो . आपले आता बरोबरीचे नाते आहे , तुला बायको बनवायचे आहे मला , पण त्याआधीही आपण खूप चांगले मित्र आहोत , आणि मैत्रीत नाते बरोबरीचे असते , कोणी लहान नाही कोणी मोठे नाही. म्हणून आता मला आर्याविर म्हणायचं , मालक नाही.  " ... आर्या

" पण आर्यविर ......" .....दुर्गा

" माझे  फ्रेंड्स , घरातले मला वीर पण म्हणतात , तू ते सुद्धा म्हणू शकते . पण मला मालक नाही , परत जर  मालक म्हणाली ना तर बघ मग मी काय करतोय ते???  "

" का........य क.....र......नार ????" .....दुर्गा  त्याला तिच्या खूप जवळ येताना बघून अडखळत बोलत होती.

" तू म्हण तर......." ......आर्या कधी तिच्या डोळ्यात तर कधी ओठांकडे बघत बोलत होता.

"आर्या ........" .... दुर्गा घाबरून बोलली. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघूनच त्याच्या डोक्यात सुरू असलेल्या खोडकरपणाचा अंदाज तिला आला होता.  तिला असे घाबरलेले बघून त्याला तिची खूप गम्मत वाटत होती.

" That's better ....." ... तो तिच्यापासून हसतच दूर झाला.

" पण मा..... आर्या , तुमच्या आईंना मी नाही आवडली. आणि त्यांचे बरोबर पण आहे , तुम्ही एखाद्या राजकुमार सारखे आहात, तुम्हाला बायको पण तशीच हवी तुम्हाला साजेशी .  माझी तुमची काहीच बरोबरी नाही. " ....दुर्गा

" ठीक आहे , सारखे बनुया......." ...आर्या

" म्हणजे ???' .....ती न समजल्यासारखी त्याच्याकडे बघत होती.

" हे पैसे, हे घर..... याचाच प्रॉब्लेम आहे ना , बाकी तर तू आणि मी सारखेच आहोत .... चल हे सगळं सोडतो आहे मी ....." ... आर्या

" मालक......???" .....दुर्गा . दुर्गाने जसे मालक म्हटले त्याने एकही क्षणाचा विलंब न करता तिच्या गालांवर तिला किस केले. त्याने तसे केलेलं बघून दुर्गा अवाक् होत त्याच्याकडे बघत होती. तिला तसे बघतांना बघून तो गालात हसला .

" पहिली वेळ होती म्हणून मुद्दाम लोकेशन चुकवले आहे , नंतर मात्र असे होणार नाही. " .... आर्या

" हा...???? लोकेशन ????" .....दुर्गा त्याने किस केले तिथे गालावर हात ठेवत त्याच्याकडे बघत होती.

" नंतर जागा चुकणार नाही ......" तो आपल्या ओठांवर एक बोट ठेवत बोलला..

" तुम्ही काबर तुमचं घरदार सोडणार??? असे वागलात तर तुमच्या आई आणखीच चिडणार माझ्यावर. मी आधीच आपल्या आईपासून दूर आहे , आपला परिवार हीच आपली श्रीमंती आहे. ".... दुर्गा

" मग काय करायचे , तू सांग...??" ... आर्या

" काय...??" .... दुर्गा

" मग घे चॅलेंज , बनून दाखव काहीतरी ..... " ...आर्या

" ह.??.." ..... दुर्गा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती.

" हे बघ मला तर तू जशी आहेस तशीच आवडते. पण माझी सुद्धा इच्छा आहे की तू मोठं काहीतरी बनावे . मॉम नाराज आहे थोडी, तिला तर मी मनवेल , तिचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तू एकटी नाही आहेस , मी शिकवेल तुला सगळं , अगदी मॉम सुद्धा तुझ्यावर गर्व वाटला पाहिजे. मग तयार आहेस???" ..... आर्या

" हो ...... तुम्ही जसे म्हणाल तसे ..." ... दुर्गा आनंदाने बोलली.

" खूप मेहनत घ्यावी लागेल??? थकायला काहीच चांस नाही . अगदी कपड्यांची स्टाईल, खाण्यापिण्याची स्टाईल , बोलण्याची स्टाईल....सगळेच नव्याने शिकायला लागेल .. .. करशील ?" ... आर्या

" हो , तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच ...." ...दुर्गा

" आणि हो मॉमचे बोलणे मनावर नको घेऊ  , थोडी हायपर  होते तिच्या मनासारखे नाही झाले की, पण मनाने खूप प्रेमळ आहे. " ... आर्या

" ह्मम ,  आर्या आता काहीतरी बनाल्यावरच या घरात पाय ठेवेल आहे ." ..... दुर्गा

" दुर्गा, तुला मॉम चा राग आला आहे काय ? , मी सांगितले ना , तिला समजावलं की समजेल आहे ती "... आर्या

" नाही नाही , मला मॅडम चा राग वैगरे नाही आला त्यांचे पण बरोबर आहे , तुमच्यासाठी त्यांची वेगळी स्वप्न असतील , वेगळ्या अपेक्षा असतील , तुम्हाला आणि या घराला शोभेल अशीच मुलगी हवी ना ... आता दिसणे, माझा रंग तर मी बदलू शकत नाही , पण या घराला आणि तुम्हाला शोभेल असे काहीतरी कतृत्व नक्कीच करेल, काहीतरी बनून दाखवेल. आणि जेव्हा या घराला साजेसे असे काहीतरी बनेल , तेव्हाच या घरात पाय ठेवेल ...." ...दुर्गा

" Okay बच्चा , नो प्रोब्लेम ..." त्याने तिला एका हाताने आपल्या जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हाथ फिरवत ' मी नेहमीच सोबत असेल '  असे आश्वासन दिले.

******

" राकेश, this is last warning for you , stay away from Durga.... दुर्गाच काय ,कुठल्याही मुलीला नजर वर करून बघितले तर मी तुला जिवंत सोडणार नाही. तुला असे गायब करेल की सापडणार पण नाहीस  आणि तुला माहिती आहे जे मी बोलतो ते मी करतो ." ..... आर्या

" त्या चीप मुलीसाठी तू माझ्या.........." ....राकेश बोलतच होता की खाडकन त्याच्या जबड्यावर एक मोठा आघात झाला , आणि त्याच्या नाका तोंडातून रक्त निघायला लागले होते.

" I said no single bad word for any girl " .... आर्याने आपल्या उलट्या हाथाचाच एक उलटा जोरदार पंच  त्याच्या जबड्यावर मारला होता. राकेशला भोवळ आली आणि तो बेशुद्ध झाला.

एका अंधारमय खोलीमध्ये गार्ड नी राकेश आणून ठेवले होते. दुर्गाला तिच्या घरी पोहचवून आर्या तिथे आला होता. आणि राकेशचा चांगलाच समाचार घेतला होता.

राकेश आर्याच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा होता. तो मोठ्या घराचा  बिघडलेला, वाया गेलेला अशा प्रवृत्तीचा होता.  त्या प्रकारानंतर आर्याने राकेशला चांगलाच दम दिला होता.

पण झालेल्या प्रकारामुळे मात्र आर्याच्या मॉम आणि दुर्गामध्ये पहिल्याच भेटीत सगळे बिनसले होते. आर्या दुर्गाचे रिलेशन जे त्याला लवकरच एका नव्या सुंदर वळणार घेऊन जायचे होते आता तेच सगळं सावरून घ्यायलाला बहुतेक आता बराच वेळ लागणार होता . त्यांच्या या नात्याला आता कुठल्या कुठल्या परीक्षा द्याव्या लागणार होत्या हे मात्र येणारी वेळच ठरवणार होती.


******

क्रमशः

( सदर कथा मी रहस्यकथा या स्पर्धेसाठी लिहायला घेतली होती , पण काही कारणास्तव मी दिलेल्या वेळेत पूर्ण करू शकली नाही , तरी सॉरी. 
या कथेला आपल्या सगळ्यांचा खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे , त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता ही कथा एक प्रेमकथा सोबतच सामाजिक विषयाने वळणे घेत  पुढे जाईल. 

भाग पोस्ट करायला उशीर होतो, त्याबद्दल सॉरी. तरी लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल आहे.

भरभरून प्रेम दिल्या बद्दल आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.)  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️