Jan 27, 2022
स्पर्धा

दुर्गा ... भाग 11

Read Later
दुर्गा ... भाग 11

 

दुर्गा....

( मागच्या भागात बघितले, एका आजीबाईचा साथीने दुर्गाला राहायला घर आणि उपजीविकेचे साधन मिळाले होते. दोन महिने होऊनही ती ज्याला भेटायला जात होती, तो भेटला नव्हता. शेवटी त्याच्या भेटीचा तो दिवस आलाच, दुर्गाच्या समोरून एक मोठी काळी गाडी येत होती, त्यात तिला तो दिसला होता . दुर्गाने आवाज देऊनही त्याने ऐकून न ऐकल्यासरखे झाले होते. तो घरात गेला आणि दार बंद झाले. .....आता पुढे ......) 

 

 

भाग 11

वर्तमान ....

" तुमचे ते मालक, त्यांनी तुम्हाला ओळखले नाही की ओळख दाखवली नाही.  चिंधी गावात त्यांना तुमची गरज होती म्हणून त्यांनी तुमच्या सोबत मैत्री केली , गरज संपली तर ओळख सुद्धा दाखवली नाही. तुमच्या बोलण्यावरून तरी वाटते आहे ते मोठ्या घरतले होते, श्रीमंत होते. कदाचित त्यांनी तुम्हाला ओळखले सुद्धा असेल , पण सगळ्यांसमोर   गरिबांना काय ओळखी देणार??? नाही काय ???  तुम्ही किती आशेने तिथे जात होता, अगदी एकही दिवस न चुकता . किती मन आतुर होते तुमचे त्यांना भेटायला ?? खूप वाईट वाटले असेल तुम्हाला तेव्हा ?? " ... ईशान

" ह्मम, तेव्हा वाईट तर खूप वाटले होते. खरे तर मूर्खपणाच होता तो, मी खूप साधारण दिसणारी मुलगी , अगदी गर्दीत हरवून जाईल अशी , खूप सामान्य, कोण माझ्याकडे कशाला बघेल, किंवा इतक्या श्रीमंत,  मालक सारख्या व्यक्तीने माझ्याकडे पहावे , मला ओळखावे , हा विचारच मूर्खपणाचा होता . कोणी आपल्याला ओळखावे त्यासाठी आपल्याला आपली एक वेगळी ओळख बनवावी लागते . ...." ...बोलता बोलता दुर्गा परत भूतकाळात गेली आणि सांगू लागली.
 

दुर्गाच्या नजरेपुढे दार बंद झाले, ते बघून तिच्या हृदयावर कोणीतरी आघात केल्यासारखे तिला वाटले. आधीच तिने  आवाज देऊनही तिला दुरालक्षित केल्यासारखे वाटले, त्यात तिच्या डोळ्यासमोर दार बंद झाले होते, जसे काही तिच्या शरीरातून तिची आत्मा कोणीतरी काढून घेतली , असे तिला वाटत होते. आपोआप तिच्या डोळ्यांतून अश्रू  गळायला लागले होते. समोरचे सगळं आता तिला अंधुक अंधुक दिसायला लागले होते. दोन वर्षापासून ती ज्याची वाट बघत होती, ज्या आशेवर तिने मुंबई शहर गाठले होते , ती आशाच आता संपली होती , मातीमोल झाल्यासारखे तीला वाटत होते. जड अंतःकरणाने ती तिथून उठली आणि खिन्न मनाने,   परतीच्या वाटेला लागली. पुढे जातांना एक एक पाऊल उचलणे तिला खूप जड जात होते. आपल्या उलट्या हाताने डोळ्यातले पाणी पुसत पुसत, रडत , हुंदके देत ती चालत होती.

" दुर्गा........ "........

कुणीतरी दुर्गा नाव घेतल्यामुळे , चालता चालता दुर्गाचे पाय तिथेच खिळले.

" मालक ......" दुर्गाच्या तोंडातून अस्पष्ट आवाज आला. तिने वळून मागे बघितले, तर खरंच तो उभा होता. त्याला समोर बघून दुर्गाच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहात होते. तिच्या ओठांवर गोड हसू उमटले होते.  सगळ्या आशा सोडल्यानंतर अचानक त्याला असे समोर बघून तिला तर काहीच सुचेनासे झाले होते. त्या पुढे बघून तिचं डोकच ब्लँक झाले होते. ती फक्त त्याला बघण्यात  मग्न झाली होती.  इतक्या दिवसांनंतर ती त्याला बघत होती . तिचे त्याला निहाळणे सुरू होते .

6.2" फीट उंची , गोरा रंग, पाणीदार काळे डोळे , सरळ नाक, धनुष्यबानाच्या आकार सारखे ओठ , ट्रिम केलेली शेविंग, केसांचा वन साईड केलेला भांग . क्रीम व्हाइट कॉटनचा शर्ट, बाह्या वरती फोल्ड केलेल्या , डार्क नेव्ही ब्ल्यू कलर ची ट्राऊजर , ब्लॅक लेदर शूज , एकदम कडक असा तो आपले हाथ खिशात घालून दुर्गा कडे बघत उभा होता.

जेव्हा तो गाडी चालवत येत होता, दुर्गाने आवाज दिला तेव्हा तो तिकडे बघत होता की गाडी समोरून एक कुत्रा धावत येत होता, त्याला लागू नये म्हणून, दुर्गाकडे बघता बघता त्याची मान परत वळली होती . जेव्हा त्याची गाडी गेट उघडेपर्यंत उभी होती तेव्हा त्याला साईड मिरर मधून रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला दुर्गा उभी असल्यासारखे वाटले होते, पण तेव्हाच गेट उघडल्या गेले आणि त्याने गाडी आतमध्ये घेतली होती. पण क्षणाचाही वेळ न लावता गाडी तिथेच उभी करत तो पळतच बाहेर आला होता.

" No change at all ......" .... तो तिला बघत होता.

5.7" उंची, सावळा रंग, मनाचा ठाव घेणारे कोरीव डोळे, छोट सरळ नाक, ओठांच्या खाली डाव्या साईडला एक छोटासा काळा तीळ,  कपाळावर छोटीशी काळी टिकली ,  केसांचा मधून भांग काढत कंबरेच्या खालीपर्यंत आलेली कुरळ्या केसांची  वेणी, केसांच्या काही बटा कपावरून कानाजवळ खाली येत तिच्या खांद्याला स्पर्श करत होत्या ,, गळ्यामध्ये एक काळा धागा, त्यात ओम चे चांदीचे लॉकेट, लेमन लाईट रंगाचा सलवार , त्यावर तशीच दोन्ही खांद्यावरून घेतलेली ओढणी, पायात काळया रंगाची बारीक पट्टे असलेली स्लीपर .   भरल्या डोळ्यांनी आणि ओठांवर हसू , दुर्गा त्याच्याकडे खूप प्रेमाने बघत होती.

तिला बघून त्याचे सुद्धा ओठ रुंदावले . ती भरभर पावले टाकत त्याच्याकडे येत त्याच्यापुढे उभी राहिली. त्याला बघून तिला स्वप्नात असल्यासारखे वाटत होते. ती त्याच्या डोळ्यात बघत होती.  तो पण तिला बघण्यात गुंतला होता. दोघेही एकमेकांना बघण्यात येवढे मग्न झाले होते की  सगळं जग तिथेच थांबल्यासारखे त्या दोघांना वाटत होते.

स्वप्नात तर नाही आहो, खात्री करून घेण्यासाठी तिने आपला उजवा हात हळूहळू पुढे नेत त्याच्या हाताला स्पर्श केला , त्यानंतर हळूहळू हाथ वरती नेत त्याच्या खांद्याला स्पर्श केला. नंतर परत हाथ वरती नेत त्याच्या गालाला स्पर्श केला.....तिला तसे करतांना बघून त्याला तिचे हसू आले...

" मालक, खरंच आहात तुम्ही????"......दुर्गा

"हो..." ...त्याने त्याच्या गालावरच्या   तिच्या हातावर आपला हात ठेवत होकारार्थी मान हलवली.

त्याच्या झालेल्या हाताच्या स्पर्शाने, तिचा उर एकदम भरून आला होता , हृदय जोराने धडधडायला लागले होते .

" तुम्ही खरंच आहात, तुम्ही आलात ....तुम्ही आलात.. मी तुमची खूप वाट बघत होती . सगळे म्हणाले तुम्ही नाही येणार, तुम्ही मला विसरले . पण ....पण मला तुमच्यावर पूर्ण विश्वास होता, की तुम्ही नक्की याल , तुम्ही नक्की याल "...... अडखळत , रडत ती बोलत होती.

" दोन वर्षापासून  अशीच रडत होती काय??? " ....तो

" हं.......... काय??" .....ती आपले डोळे पुसत बोलली.

" मी म्हणालो, दोन वर्षापासून अशीच रडत होती काय???   बारीक झाली , म्हणून विचारतोय..?" ...तो

त्याच्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर हसू आले....तिने नकारार्थी मान हलवली.

" घरी जाऊया......"..तिचा एक हात आपल्या हातात घेत त्याने रस्ता ओलांडला. तो इकडेतिकडे बघत रस्ता ओलांडत होता, ती मात्र फक्त त्याच्याकडे बघत चालत होती. तो गेट जवळ आला तेव्हा गेट उघडल्या गेला, तो तिला घेऊन आतमध्ये गेला. गार्डदादा तर त्या दोघांकडे बघत होता.

" बरे झाले आपण दुर्गाताई सोबत उद्धट नाही वागलो, नाहीतर आपली नोकरी गेली  असती " ....त्याला तिचा हात पकडलेला बघून,  गार्डच्या मनात विचार येऊन गेला.

दुर्गा तर त्यालाच बघत होती, कुठे जात आहोत तिने बघण्याची तसदी सुद्धा नाही घेतली.
 

" सिक्युरिटी पार्क द कार " .... तो , तिचा हाथ पकडतच बोलत होता.

त्याच्या आवाजाने दुर्गाची तंद्री तुटली. थंड हवेची एक झुळूक तिच्या शरीराला स्पर्श करून गेली. आतापर्यंत ती  बाहेर उन्हाची कळ सोसत होती , त्या थंड हवेच्या मुलायम स्पर्शाने तिचे मनही सुखावले होते.  ती आजूबाजूला बघत होती. तेव्हा तिच्या लक्षात आले की ती रोज ज्या मोठ्या गेट च्या बाहेर त्याला शोधत यायची, आज ती त्या गेटच्या आतमध्ये होती. डोळे मोठे करत आश्चर्यचकित होत ती तिथले सगळे न्याहळत होती. फिक्कट ब्राऊन क्रीम कॉम्बिनेशन रंगाचा मोठा दुमजली बंगला , लांब लांब चार पाच पायऱ्या, नंतर एक भलामोठा पोर्च, आधुनिक सहा मोठाले खांब , पोरच मध्ये आणि वरती कुंडी मधून खाली आलेले वेली, छोटी छोटी शो ची झाडे, रंगीबेरंगी फुले.. पोर्चमध्ये एका कॉर्नरमध्ये दोन बांबूच्या खुर्च्या, मधत एक टेबल .... बंगल्या भोवती छोटी छोटी इंग्लिश गवत पायाला मुलायम स्पर्श करणारी, त्यातून मधून मधून वळणे घेत बनवलेले देखणे काँक्रिटचे वळणदार रस्ते. मोठी कंपौंडची भिंत, भिंतीला लागून नारळाच्या झाडासारखी दिसणारी मोठी मोठी झाडं, अधून मधून फळांची, फुलांची मोठी झाडे , त्यांनाच खाली त्यांच्या भोवती छोटी छोटी रंगीबिरंगी फुलांचे झुडूप, बंगल्याच्या थोडं मागच्या बाजूला गाड्या पार्किंगसाठी जागा होती.  मोठ्या गेट पासून बंगल्याचा मेन दारारकडे जाणाऱ्या मोठा रस्ता, आजूबाजूने मोठमोठ्या उंच बारीक कलाकुसर केलेल्या  कुंड्या , त्यातून काही वेल आणि रंगबिरंगी फुले झोपाळ्यावर बसल्यागत झुला घेत होते. पोर्च मधून पुढे जात मधोमध एक मोठा लाकडी कोरीव कमान, लाकडी बॉर्डर असलेले मोठे दार,  त्यात काचा बसावल्या होत्या. त्या काचांवर सुंदर पेंटिंग केले होते.  सगळेच खूप सुंदर आणि फ्रेश होते. मोहून टाकणारे असे ते वातावरण होते.  अगदी तिने पुस्तकात बघितलेल्या राजमहलासारखे तिला ते भासत होते. स्वप्नात पण नसेल बघितले इतकं सगळं सुंदर ते होते. बाहेरचं इतके सुंदर आहे , घर आतमधून किती सुंदर असेल , तिच्या डोक्यात विचार येऊन गेला. तेवढयात तिथे दोन काळया ड्रेस मधले दोन धिप्पाड माणसं तिथे  आले आणि तिची आजुबाजूच निरीक्षण करण्याची तंद्री भंग पावली. त्याने त्या ब्लॅक सुटवाल्यांना काहीतरी इंस्ट्रक्शन्स दिल्या आणि तिचा हात पकडत घरात जायला निघाला. 

" इथे बाहेरच थांबते मी .... " .....दुर्गा

" का...??? भीती वाटते आहे माझी ??? " ... तो, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत बोलला.

" ना.....नाही.... असं काय नाही......ते आपलं असच, इथे बाहेर छान आहे , म्हणून बोलली " ..... दुर्गा सारवासारव करत बोलली ...

" ' दुर्गा आहे मी, नाद नाय करायचा.....' , माझ्या लक्षात आहे बरं , मला अजूनही तुझी आणि तुझ्या कंबरेमध्ये लपऊन ठेवलेल्या चाकुची भीती वाटते . "....तो

ती डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती. त्याचे बोलणे ऐकून तिच्या ओठांवर हसू आले.

कोणाची हिम्मत नाही इथे तुला स्पर्श करायची, माझीसुद्धा नाही.  चल आता आतमध्ये.." .... तो तिची मस्करी करत तिला आतमध्ये घेऊन गेला.

" बापरे मालक, किती भारी घर आहे तुमचं . काश्मीरला अशीच थंडी असेल नाही, किती थंड आहे तुमचं घर . म्हणूनच तुम्ही असे गोरे गोमटे  आहे बघा . मला तर प्रश्न पडतोय तुम्ही तिथं चींधिगावला त्या टिनाच्या खोलीत राहिलेच कसे " .... दुर्गा कौतुकाने बोलत होती.

" ह्मम , सवय आहे मला .... जिथे काम असेल तिथे जावे लागते ..." ....तो

तेवढयात एक बाई ट्रे मध्ये पाण्याचे  ग्लास घेऊन आली, आणि दुर्गा समोर ट्रे धरला. सकाळपासून दुर्गा काहीच न  खाता पिता तिथे बसली होती, तहान तर तिला खूप लागली होती. तिने पाण्याचा ट्रे बघून एकदा त्याच्याकडे बघितले.

" घे पाणी ....." ...तो

तो जसा घे म्हणाला... दुर्गाने एक ग्लास उचलला आणि गटागटा पाणी प्यायली , तेवाढया पाण्याने तिचे काहीच भागले  नाही, तिने परत दुसरा ग्लास उचलला आणि सेकंदात पाणी संपवले.

" आहा....आता बरे वाटतेय " .....ती ग्लास ट्रे मध्ये ठेवत बोलली.

" मी आताच आलो बाहेरून फ्रेश होतो..तू पण चल " ... तो

" अं...नको, मी थांबते इथेच, तुम्ही जावा ..." ....दुर्गा

" Are you sure ??" .... तो

" हो....." ....दुर्गा

" Okay, मग बस इथे , टीव्ही बघ, मी आलोच " ....तो सोफा चेअरकडे हाथ दाखवत बोलला.

दुर्गा सोफाजवळ गेली, पण तिची त्यावर बसायची हिम्मत होत नव्हती. ती आपल्याच विचारात उभी होती.

" काय झाले??? बस....किती वेळ अशी उभी राहणार आहे ?" ....तो

" सोफा मळेल, माझे कपडे खराब......." ...दुर्गा , दुर्गा आपल्या कपड्यांकडे बघत कधी त्या सोफाकडे बघत बोलत होती.

" दुर्गा , हे तुझेच घर आहे , तू कुठेही बसू शकते, कुठेही हात लावू शकतेस...घर माणसांनी बनत असते , वस्तूंनी नाही. तुझं या घरात येण्याने घर जास्ती सुंदर झाले आहे .... बस आता . मी लगेच येतो. " ....तो

त्याचं बोलणे ऐकून दोन अश्रू तिच्या डोळ्यात जमा झालेच. दोन तीन महिन्यांपासून अनोळखी अशा  मुंबईमध्ये फिरत होती. कितीतरी जीवघेणे  अनुभव तिला आले होते . घर नव्हते, आपले म्हणण्यासारखे कोणी नव्हते, आजींनी थोडी माया लावली होती , तिच्या प्रेमाच्या शब्दांवर ती मुंबई मध्ये एक एक दिवस काढत होती. आज आता जेव्हा त्याने ' हे तुझंच घर आहे ' असे बोलला होता तेव्हा  अचानक ही अनोळखी मुंबई तिला आपलीशी वाटायला लागली होती.

" काय झाले??" ....तो

" अह, काही नाही ..." ...दुर्गा

" तू बस , मी आलोच " ...त्याने टीव्ही लावला आणि पळतच वरती रुममध्ये गेला.

त्याला तिला विचारायचे तर खूप काही होते.  चींधिगाव बद्दल त्याला बऱ्यापैकी माहिती होते, दुर्गावर काही वाईट प्रसंग तर ओढवला नाही ना , राहून राहून त्याच्या मनात येत होते .  तिच्या चेहऱ्यावरून ती थकली दिसत होती, शरीराने आणि मनाने सुद्धा. म्हणून तिला आधी रिलॅक्स होऊ द्यावे, नंतरच विचारू , मनात विचार करत तो त्याच्या रूम मध्ये गेला होता.

दुर्गा घराचं निरीक्षण करत बसली होती.  तो अजिबात बदलला नाही हे बघून तर तिला खूप आनंद झाला होता. तोच आपलेपणा, तीच काळजी त्याच्या वागण्या बोलण्यातून तिला जाणवत होती. त्याचे असे तिची काळजी घेताना  बघून तिचे  मन सुखावले होते. खूप दिवसांनी तिला तिचे मन, डोके शांत जाणवत होते. 

तो लगेच फ्रेश होत खाली आला, बघतो तर दुर्गा सोफाच्या हातावर डोकं ठेऊन झोपली होती. आता कशाचीच काळजी नाही असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. तिचा चेहरा खूप शांत वाटत होतं. तिला बहुतेक थंडी वाजत असावी, तिने तिची ओढणी स्वतः भोवती लपेटून घट्ट धरून ठेवली होती.

" जोसेफ , ऑफ द AC " ..... तो

" Sir....but ...." .... जोसेफ.

" I said off the AC " .... तो

जोसेफ ने AC बंद केला.....

तो तसाच तिच्या पुढे जात  टोंगळ्यावर खाली बसला...आणि तिच्याकडे बघत होता. 

" दुर्गा...जशीच्या तशीच आहे, अगदी मला आवडत होती तशीच , फक्त थकली दिसते आहेस.... खूप वाट बघितली असशील ना माझी ,  सॉरी मला येता नाही आले... " ...तो तिच्याकडे बघत मनातच बोलत होता.

" सर , मॅडम सकाळपासून तिथे बाहेर बसल्या होत्या " .... केशव माळी

" What ??? From morning??? It's four o'clock now ....".... तो , ते ऐकून तो शॉक झाला होता.

" सर , मॅडम गेल्या दोन तीन महिन्यांपासून रोज रात्री येत होत्या , तुम्ही इथे  आहात काय विचारायला " .... केशव

" काय????? मला कोणी कळवले का नाही???" .... तो

" सर, तुम्हाला कसे कळणार?? मोठ्या मॅडमला कसे सांगणार??? त्यांना कळवले असते तर त्यांनी लागलीच दुर्गा मॅडम विरुद्ध काही अँक्शन घेतली असती. दुर्गा मॅडम जवळ या घराचा पत्ता आहे म्हणजे त्या जवळच्या असतील , असा अंदाज बांधला , आणि तुमच्या बोलण्यात नाव ऐकले होते. म्हणून मग मोठ्या मॅडमला नाही सांगितले. " ... केशव माळी

" Okay .... या दुर्गा मॅडम आहेत, या इथे कधीही येऊ शकतात... यांना कधीही अडवायचे नाही. Keep in mind ....." ... तो

" हो सर ....." ...केशव माळी बोलून निघून गेला.

" जोसेफ लंच रेडी कर ....... "... त्याने दुर्गाच्या आवडीप्रमाणे जेवण बनवायला सांगितले होते. तो दुर्गाच्या समोरच्या सोफामध्ये बसत दुर्गाकडे बघत होता. दोन वर्षांनंतर ती त्याला दिसली होती, मन भरून तो तिला बघून घेत होता...तिला बघत त्याला तिच्यासोबत घालवलेले दिवस आठवत होते, ते आठऊन आपसूकच त्याच्या चेहऱ्यावर स्मायल आले. ती अचानक इथे कशी काय?? त्याच्या डोक्यात विचार सुरू झाले होते.

एखाद तासाने दुर्गाला जाग आली .  बऱ्याच दिवसांनी तिला इतकी गाढ झोप लागली होती .  तिला थोड्या वेळ साठी आपण स्वप्नात आहो असेच वाटत होते. डोळे उघडून बघितले तर तो तिच्या पुढे बसला होता . तिने आपले डोळे चोळत परत पुढे बघितले तर तोच तिला दिसत होता. तिला तसे करतांना बघून त्याला हसायला आलं.

" मीच आहो, आणि तू आपल्याच घरी आहेस ... " ..तो

" मी तुमची वाट बघत होती, माहिती नाही कशी काय  झोप लागली मला . " ....ती केस , ओढणी नीट करत बोलली.

" दुर्गा , हातपाय धुवून घे, जेवायला बसुया " ....तो

" अरे कशाला तुम्ही त्रास घेतला, मी घरी जेवेल आहे ..." ...दुर्गा

" दुर्गा , आता हे पण तुझेच घर आहे . मला खूप भूक लागली आहे , जा पटकन फ्रेश होऊन ये . मी वाट बघतोय "...तो

तिथे असणाऱ्या एका काम  करणाऱ्या बाईने तिला बाथरूम दाखवले. दुर्गा फ्रेश होऊन बाहेर आली.

" चल......" त्याने तिला डायनिंग टेबल जवळ नेत तिच्यासाठी खुर्ची मागे सरकवली..

दुर्गा बऱ्याच वेळ तिथे काहीतरी विचार करत उभी होती. तिथला स्टाफ तिच्याकडे बघत होता. तिला खूप अवघडल्यासारखे झाले होते. त्याचा लक्षात तिचा अवघडलेपण आले होते. त्याने इशर्यानेच सगळ्यांना तिथून जायला सांगितले. तसा सगळं स्टाफ तिथून क्षणार्धात गायब झाला.

" दुर्गा ...... बस" .....तो

" हो ......" ...दुर्गा त्याने तिच्या पुढे ओढलेल्या खुर्चीवर बसली.

त्यानेच तिचे ताट वाढले ... ते बघून दुर्गाचे डोळे चमकले .

" मालक , तुम्हाला अजूनही माहिती आहे मी काय खाते?? मला काय आवडते ? " ...दुर्गा

" विसरणार कसा, कारण आता माझे सुद्धा हेच फेवरेट फूड आहे ......." ...तो

दुर्गा त्याच्याकडे बघून हसली, आणि पटापट जेवायला सुरुवात केली. दोघांनी मिळून जेवण आटोपले. त्याला तिच्यासोबत बरेच बोलायचे होते.

" खूप छान होते मालक जेवण " ....दुर्गा

" ह्मम , पण तुझ्या हातची चव कशालाच नाही " ....तो

" काहीही हा मालक.... या सगळ्या स्वयंपाकी लोकांनी खूप सुंदर जेवण बनवले आहे . " ..... दुर्गा

" ह्मम , ते त्यांचे काम करतात, तुझ्या बनवलेल्या जेवणात प्रेमाची साथ होती, म्हणून जास्ती चविष्ट होते.." ...तो

दुर्गा कुतूहलाने त्याच्याकडे बघत होती. तिला त्याचे कौतुक सुद्धा वाटत होते , इतका मोठा घरचा व्यक्ती , आणि तिचं कौतुक करतोय.

" बरं दुर्गा आता मला तुझ्यासोबत खूप महत्वाचे बोलायचे आहे . वरती रूममध्ये येतेस??"" ... तो

" आ.........आपण बाहेर...... बाहेर बागीच्यामध्ये बसुया   ?" .....दुर्गा वरती त्याचा रूमकडे बघत बोलली.

" दुर्गा , घाबरते आहे तू मला??? मी तुला  खाणार नाही आहो. घरात आल्यापासून बघतोय अवघडल्यासारखी वाटते आहे. रिलॅक्स दुर्गा ..... " ....तो

" नाही.....ते....तसे.....नाही.....ते बाहेर आता वातावरण किती छान झालाय, तुम्ही बाहेर खूप छान , सुंदर झाडे लावली आहेत  आणि मला बाहेरचा बगीचा सुद्धा आवडला. म्हणून म्हणाली " .... दुर्गा चाचरत बोलत होती.

" बरं , चल बाहेर......." ..तो

तो आणि दुर्गा बाहेर आलेत, तिथेच एका कॉर्नरला बांबू सोफा वैगरे बसायची छान व्यवस्था होती . दोघंही तिथे येऊन बसले. त्याने तिथल्या लोकांना काही सूचना दिल्या तसे ते काळे कपडेवाले लोकं दूर जाऊन उभे राहिले.

" दुर्गा , सगळ्यात पहिले सॉरी , तुला खूप वाट बघावी लागली माझी. तुला सांगूनही मी या दोन वर्षात तुला भेटायला सुद्धा नाही आलो. पण कामच असे होते की......"

" मालक, मी काही विचारले आहे काय??? जर तुम्हाला मला विसरायचे असते तर आज ओळख नसती दाखवली .  मला कशाचेच स्पष्टीकरण नकोय , माझा विश्वास आहे तुमच्यावर . " ....दुर्गा

" हा तुझा मोठेपणा आहे . असू दे .. मला सांग तू इथे कशी काय ??? तुला बघितल्यापासूनच जाणवत आहे की बरच काही घडून गेले आहे . मला सगळं सांग " ....तो

दुर्गाने त्याला त्याने चींधिगाव सोडल्यापासून ते आजपर्यंत घडलेले सगळे सांगितले. तिचं बोलणं ऐकतांना कधी त्याला तिचा अभिमान वाटायचा तर कधी  खूप वाईट आणि राग सुद्धा येत होता.

" दुर्गा, मला खरंच माफ कर , माझ्युळेच तुला इतक्या वाईट परिस्थितीतून जावे लागले. माझ्यामुळे हे सगळं घडले आहे ..... I am sorry dear " ..... तो तिच्यापुढे खाली टोंगळ्यावर बसत तिचा हात आपल्या हातात घेत बोलत होता. मुंबईमध्ये आल्यावर रेल्वे स्थानकावर तिच्यासोबत झालेली जबरदस्ती , आपले स्वतःचे घर असून तिला बाहेर रेल्वे स्थानकावर राहावे लागले, सगळंच ऐकून त्याचं मन खूप गहिवरून आले होते . बोलता बोलता त्याचा आवाज सुद्धा जड झाला होता.

" मालक , तुमची काय चुकी नाही . मी केलेय स्वतःच रक्षण, मी ठीक आहे आता " ....दुर्गा

" जेव्हा तुला गरज होती, तेव्हांच मी नव्हतो तुझ्यासोबत .   I am feeling guilty now ......" .. तो

" मालक , असे काय बोलत आहात तुम्ही . मला वाईट वाटते आहे ...." ....दुर्गाचा चेहरा त्याला तसे बघून एकदम लहानसा झाला. त्याने जागेवरून उठत तिला मिठी मारली. अचानकपणे त्याला असे जवळ बघून ती थोड्या वेळ साठी गोंधळली .

" I am sorry Durga .... I am sorry ..." तो त्याची मिठी घट्ट करत वारंवार तेवढीच एक लाईन बोलत होता.  त्याला तसे बघून तिला सुद्धा वाईट वाटत होते . न राहवून तिने पण आपले हात त्याच्या पाठीवर ठेवत त्याला पकडले.   बऱ्याच वेळाने त्याला थोड शांत वाटले आणि तो तिच्या दूर झाला.

" सॉरी , ते भावनेच्या भरात......." ...तो

" ठीक आहे मालक.. किती सॉरी बोलणार आहात आता ??? मी ठीक आहे,  तुम्ही मला भेटले सुद्धा . आता आणखी काही नको . तुम्ही थकले असाल, आराम करा, मी पण आता घरी जाते. " ....दुर्गा

" घरी??? दुर्गा तू कुठेही नाही जाणार आहे आता. तू इथेच राहणार आहे . हे तुझंच घर आहे. " ...तो

" कुठल्या हक्काने हे माझे घर आहे मालक ?? मला इथे नाही राहता येणार. असे एक मुलगा आणि मुलीचे सोबत राहणे समाजमान्य नाही आणि मला ते आवडणार सुद्धा नाही, कदाचित तुमच्या घरीसुद्धा नाही आवडणार.  मी तुम्हाला भेटायला आले होते. माझे हे डोळे तुम्हाला बघायला तहानलेले होते . तुम्हाला मन भरून बघितले , आता दुसरी काही इच्छा नाही. आता घरी जायला हवे. " ... दुर्गा

" जर या घरी यायचा हक्क दिला , तर येशील ???  " ..तो

" तुमची माझी काहीच बरोबरी नाही मालक . आणि तसे पण मी आजीला सोडून नाही येणार , आज मुंबई सारख्या शहरात  सुरक्षित आहे ते आजीमुळेच . इथे तीच आता माझा परिवार आहे , आणि माझी जबाबदारीही . " ...दुर्गा

" इथे कोण कुठे राहत आहे , कोणाला बघायला फुरसत पण नाही आणि काही वाटत पण नाही. इथे हे सगळं नॉर्मल आहे. आणि मला कोणी काय बोलेल, कोणामध्ये हिम्मत सुद्धा नाही . तरी मी तुझा आणि तुझ्या विचारांचा मान ठेवतो आणि समाजमान्य जी काही पद्धती रीती  असतील त्या सगळ्या पूर्ण करून तुला या घरात आणेल . " ....  तो

" इतकी मोठी स्वप्न नका दाखाऊ मालक ,जी कधीच पूर्ण होणार नाहीत,  जी मी स्वप्नात सुद्धा बघितली नाही आहेत. " ...दुर्गा

" मी बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण करत असतो. बरं ते तर नंतर बघू , आधी तुझ्या स्वप्नंच बघुया . " .....तो.

" म्हणजे?" .दुर्गा

" तुला पोलिस व्हायचं होते ना ??, त्याबद्दल बोलतोय " .....तो

" पण आता हे कसे काय शक्य ?" ..... दुर्गा

" सगळंच पॉसिबल आहे  . तू म्हणालीस ना तुझ्याजवळ तुझे सगळे महत्वाचे पेपर , सर्टिफिकेट आहेत , मग आता आपण इथल्या कॉलेजमध्ये एडमिशन घेऊ , तुझं शिक्षण सुरू करूया " .... तो

" पण मालक, माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत  . इथले  कॉलेज मला परवडणारे नाही , मी फी भरू शकत नाही " ... दुर्गा

" मॅडम , तुम्हाला नोकरी लागल्यावर परत करा " ...तो

" पण ......" ..

" पण ...?? आता काय?? ........" तो तिच्या पुढे हात जोडत बोलला. त्याला तसे करतांना बघून दुर्गा खुदकन हसली . त्याला भेटल्यापासून आता ती मनमोकळी हसली होती. तिला हसतांना बघून त्याला आता खूप बरं वाटत होते.

" अहो मालक, ऐकून तर घ्या ..... खरंच सिरीयसवाले कारण आहे ...." ...दुर्गा हसतच बोलत होती.

" Okay ..... काय ???" ...तो

" सगळे सर्टिफिकेट आहेत, पण  सेकंड यीअरची मार्क्सशीट  नाही घेतली , म्हणजे रिझल्ट लागायचा आधीच इकडे यावे लागले. जुन्या कॉलेजमधून TC  नाही काढलेली, म्हणजे माझं शेवटचं वर्ष होत , तर नाही काढले होते . आता जर दुसऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर ते लागतील  " ....दुर्गा

" बस , इतकेच.... ते घेऊन येऊ आपण " ...तो

" पण ते गाव जवळ आहे तर???? ते लोकं मला शोधत असतील ......" ... दुर्गा काळजीत बोलत होती.

" मी आहो ना , तुला काहीच होऊ देणार नाही, you can trust me " .... तो

" ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसे " .....दुर्गा

" Good , उद्या शनिवार, मग रविवार, कॉलेज बंद असेल, आपण सोमवारी जातोय तुझ्या कॉलेजला , आणि मार्क्सशीट , TC काढून आणू , इथे एडमिशन घेऊ, लवकरच शिक्षण सुरू करू. " ....तो

" ठीक आहे, मी आजीसोबत बोलून घेईल . बरं आता मी जाते , खूप वेळ झाला इथेच आहे . " ...दुर्गा

" हे बघ दुर्गा, तुला इथे नाही राहायचे, तुझ्या विचारांचा मी रिस्पेक्ट करतो. पण हे तुझेच घर आहे, तू इथे कधीही येऊ शकते, राहू शकते.... हे अख्खं घर तुझं आहे हे लक्षात ठेव, आणि इथे यायला  आता तुला कोणीच कधीच अडवणार नाही आहे, मी असेल वा नसेल . आजी तशी पण दुकानात आहे ना , मग थांब इथे , रात्री मी तुला घरी पोहचून देईल आहे. तुला अजुन नीट मनभरून बघितले सुद्धा नाही आहे , दोन वर्षाची कसर भरून काढणार आहो मी आता , माझ्या नजेसमोरून आता हलायचे सुद्धा नाही ......." ....तो  तिला बघत होता.

" मालक असे नका बघू, खूप अवघडल्यासारखं होते आहे ....." दुर्गा इकडे तिकडे बघत बोलत होती.

" Okay....... चल तुला घर दाखवतो आणि सगळ्यांसोबत ओळख करून देतो " .... तो तिला घरात घेऊन जात सगळ्यांसोबत ओळख करून देत होता  . सगळं घर दाखवले आणि शेवटी त्याची रूम , रुममध्ये ते आले.

" बापरे........किती सुंदर.....किती मोठी.......पूर्ण घरात सगळ्यात सुंदर आहे ही खोली " ....दुर्गा आश्चर्याने डोळे मोठे करत बघत होती.

" इकडे ये , माझी सगळ्यात आवडती जागा दाखवतो ......तिथे कोणालाच जायला परवानगी नाही आहे , फक्त माझी पर्सनल स्पेस आहे ....." , त्याने त्याच्या रूम मध्ये एका कॉर्नर्मध्ये असलेला दरवाजा उघडला आणि तिला आतमध्ये नेले.... खूप मोठ्या मोठ्या खिडक्या, अशी ती एक रूम होती. खूप फ्रेश वाटत होते तिथे. एका खिडकीजवळ    एक मोठा काऊच होता. कॉर्नर मध्ये एक टेबल चेअर..... काही हाताने बनवलेल्या , भारताचे वेगवेगळ्या भागातले दर्शन घडवणाऱ्या वस्तू सजाऊन ठेवल्या होत्या.

" बापरे .....किती सुंदर........" ...दुर्गा  रूममध्ये गोल गोल फिरत एक एक वस्तू बघत होती.

" Wait, सगळ्यात सुंदर गोष्ट दाखवतो या खोलीची ..." ..म्हणत त्याने सगळ्या खिडक्यांचे पडदे ओढले.... लाइट्स ऑफ केले...

" मालक.........." ...दुर्गा त्याला असे करतांना बघून गोंधळली होती.

" दुर्गा.......the most beautiful creation of God " ....म्हणतच त्याने कुठलेतरी एक बटन दाबले आणि क्षणार्धात सगळ्या भिंतींवर दुर्गाचे फोटो उमटले. तिचा योगा करतांना, काठी खेळताना, व्यायाम करतांना, ऊस खातांना , सायकल चालवताना , रनींग करतांना, बकरिसोबत खेळताना , त्याचसाठी डब्बा घेऊन येताना , एक डोळा मारत गिल्ली दांडू खेळताना, खळखळून हसतान्ना .....असे बरेच फोटो तिथे होते. सगळे फोटो इतक्या उत्कृष्ट प्रकारे काढले होते की बघतच राहावे वाटत होते . दुर्गाचे तर डोळे आणि तोंड उघडेच्या उघडेच राहिले होते. पूर्ण रूम तिच्या फोटोंनी सजली होती. ती सगळ्या फोटोंजवळ जात फोटोवरून हात फिरवत फोटो बघत होती. ते सगळं बघून त्याच्या प्रेमाची खोली तिला कळली होती, इतक्या आत्मतियेने ते सगळे फोटो काढले होते.  ते सगळं बघून  तिच्या डोळ्यात पाणी तरळले....सगळे फोटो बघता बघता ती त्याला धडकत त्याच्या पुढे आली. तो तिलाच बघत टेबलला टेकून उभा  होता.

" काय झाले??? ..." ... तिच्या डोळ्यात पाणी बघून ,  तो उठून उभा होत तिच्या जवळ येत बोलला.

दुर्गाने  फक्त काही नाही म्हणून  मान हलवली.

" नाही आवडले काय??? " ....तो

ती काहीच बोलली नाही, पानीभरल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे बघत होती .

" दुर्गा, या फोटोंच्या आधारेच मी ही दोन वर्ष काढली आहेत. तुझ्याजवळ यावे खूपदा वाटायचे   पण कामं अशी निघायची की तुला भेटायला सुद्धा यायला नाही जमलं .  तुझ्या गावाला आलो आणि आयुष्याचं बदलले माझे. त्या दिवशी तुला सोडून जातांना माझ्या शरीरातून कोणी माझा जीव काढून घेत आहे असे वाटत होते. तुला खूप मिस  करत होतो . फक्त तुझीच स्वप्न बघत होतो. आणि जेव्हाही तुझी आठवणीने अस्वस्थ व्हायला लागायचे तेव्हा इथे येऊन बसत असतो  " .....तो

त्याचं बोलणे ऐकून आता तिच्या डोळ्यातले जमलेले पाणी तिच्या गालांवर ओघळायला लागले.  तिला काय होते आहे काहीच कळत नव्हते , तिच्या हृदयाची धडधड वाढली होती ,  तिचे मन खूप घाबरायला झाले होते आणि शेवटी न राहवून ती त्याच्या जवळ जात , त्याच्या गळ्यात हात घालत तिने  त्याला करकचून मिठी मारली. रडत रडत अंगावर ओढवलेले वाईट प्रसंग , त्यात त्याचे प्रेम सगळंच तिच्या डोळ्यासमोरून फिरत होते . फार वाईट असा काळ तिने अनुभवला होता, बघितला होता .... पण खूप धैर्याने ती एकटी सामोरी गेली होती , तिला खचून चालणार नव्हते , पण हे सगळं करतांना मनातून मात्र ती खूप घाबरली होती , तरी सुद्धा जगायचं म्हणून तिने सगळच खूप सावरून धरले होते, आता मात्र तिचे  मन खूप जड झाले होते, तिच्या सहनशीलतेचा बांध फुटला होता . त्याच्या स्पर्शाने, त्याचा मिठीत शेवटी ती मनातली भीती बाहेर निघाली होती. ती त्याचा मानेला परत परत घट्ट पकडत रडत होती.  त्याला तिचं घाबरलेले मन कळत होते, तिला रडून मोकळं होऊ द्यावे विचार करत त्याने तिच्या कंबरमध्ये हात घातला आणि तिला आणखी जवळ ओढून घेत तिच्या डोक्यावर हाताने पकडून घेत  तिला मनसोक्त रडू दिले. बऱ्याच वेळाने तिचे रडणे थांबले होते, पण ती इतकी जास्ती रडली होती की अजूनही तिचे हुंदके देणे सुरूच होते. तिला असे हुंदके येताना बघून आता मात्र त्याला खूप वाईट वाटत होते .

" दुर्गा ...... Calm down बच्चा, you are very strong girl ..... " ......दोन्ही हात तिच्या गालांवर ठेवत तिचा चेहरा वर करत तिच्याकडे बघत हळू आवाजात प्रेमाने  बोलत होता.  तिने त्याच्याकडे बघितले आणि परत तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून एक अश्रू बाहेर आलाच .... त्याने कसेबसे स्वतःला रोखून धरले होते , पण  आता तिच्या डोळ्यातला तो अश्रू   बघून त्याच्या हृदयातून एक मोठी कळ गेली, आणि त्याच्या स्वतःवरचा कंट्रोल सुटला  ... तिचा चेहरा वर करत त्याने त्याच्या ओठांनी तिच्या गालांवरचे अश्रू टिपले.    त्याच्या ओठांच्या स्पर्शाने आपोआप तिचे डोळे मिटल्या गेले, त्याने एक एक करत तिच्या डोळ्यांवर किस केले ,  तिच्या श्र्वासांची गती वाढली  होती, ...शरीराला कंप सुटला होता ,त्याला तो जाणवत होता .... तिच्या थरथरणाऱ्या शरीराला आपल्या हातांच्या मजबूत वेढामध्ये  पकडत शांत केले होते , तो तिच्या चेहर्यावून आपली नजर फिरवत तिला बघत होता.....आता त्याची नजर तिच्या ओठांवर .. तिचे ओठ थरथरत होते ...आता त्या ओठांना सावरण्याची गरज होती ......तो हळूहळू तिच्या ओठांजवळ जात होता.....

" आर्या sss  ........" ....त्याला जवळ येताना जाणवत   तिच्या ओठांतून हळूवारपणे अस्पष्ट असा आवाज निघाला होता. पहिल्यांदा त्याने त्याचं नाव तिच्या तोंडून ऐकले होते. तो गलातच हसला ....आणि ठरवलेला आपला कार्यक्रम पुढे नेत त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांचा अगदी बाजूला तिच्या गालांवर टेकवले....तिने लाजून आपले डोके त्याच्या छातीवर ठेवत त्याला बिलगली.

" I love you Durga ......." ..... तो तिच्या केसांवर डोक्यावर किस करत बोलत तिला मिठीत घेतले.

आता अंधार पडत आला होता . आर्याने तिला जेवण करण्यासाठी विचारले होते, पण तिने आजीसोबत जेवेल सांगितले होते. त्याने तिला त्याच्या गाडीतून आजीकडे पोहचवून दिले. आजीने तिला मदत केली, राहायला घर दिले त्यासाठी त्याने आजीचे खूप आभार मानले आणि आजीच्या पाया पडून नमस्कार करून घरी परत आला.

*****

ठरल्याप्रमाणे सोमवारी दोघेही दुर्गाच्या कॉलेज मध्ये गेले होते , सगळे उपयोगी कागदपत्रे गोळा केली होती.

मुंबईमध्ये एका प्रतिष्ठित नावाजलेल्या कॉलेजमध्ये दुर्गाची एडमिशन झाली होती. BA चे राहिलेले तिसरे वर्ष ती इथून पूर्ण करणार होती. त्यासोबतच आर्याने तिला पर्सनल ट्रेनिंग द्यायला सूरवात केली होती . रोज पहाटे पाचला तिला पिककप करून ग्राउंडवर घेऊन जात सगळे गरजेचे व्यायाम करवून घेत होता. तसेही दुर्गाला या सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळे ती सगळेच पटापट शिकत होती. तसे तर ती पोलिस फील्ड जॉईन करू शकत होती काही परीक्षा देऊन , पण तिला मोठं पोलिस ऑफिसर बनवायचे स्वप्न त्याने बघितले होते. त्यासाठी तो तिच्याकडून तयारी करवून घेत होता. दुर्गा पण आजीचे दुकान सांभाळत आर्या सांगेल तसे सगळे करत होती.  अधून मधून तो कामा निमित्त मुंबई बाहेर असायचा , पण जास्तीत जास्त तो मुंबईमध्ये राहायचा.

आता आर्याच्या घरी सुद्धा दुर्गाबद्दल माहिती पडले होते. आर्या कुठल्यातरी मुलीसोबत फिरत असतो हे सुद्धा कळले होते. आर्याची आई आर्यासाठी सर्वकाही होती . दुर्गाला आईसोबत भेटवून देत आईला दुर्गाबद्दल सगळं सांगून , मुंबईच्या आजीकडे जाऊन  दुर्गाला रीतसर लग्नासाठी मागणी घालावी असा त्याने प्लॅन आखला होता.  सुट्टीचा दिवस बघून त्याने दुर्गाला त्याच्या आईच्या घरी , मुंबईतच दुसरा बंगला होता तिथे यायला सांगितले होते. तो काही कामात होता, ते आटोपून तो परस्पर तिथेच येणार होता. 

*****

" मॅडम , कोणाला भेटायचं तुम्हाला?? " .... सिक्युरिटी गार्ड

" आर्यवीर सर " ......दुर्गा

" मॅडम , आपले नाव ?" ....सिक्युरिटी गार्ड

" दुर्गा " ........दुर्गा

" सॉरी मॅडम, तुम्ही आतमध्ये जाऊ शकता " .....सिक्युरिटी गार्ड

दुर्गा आतमध्ये आली. हा बंगला तर आर्याच्या बंगल्यापेक्षा चौपट मोठा होता. ते सगळं बघून दुर्गाला तिथे गोंधळल्यासारखे झाले होते. तेवढयात तिथे एक बाई आली...

" मॅडम , तुम्ही या आतमध्ये, मोठ्या मॅडम ला अचानक खूप महत्वाचे काम आले , म्हणून त्यांना बाहेर जावे लागले. वीर सर येतीलच , तुम्ही बसा आतमध्ये. बंगल्याचा वरच्या रूमच्या बाल्कनी मधून एक पुरुष सिगरेट चा धूर उडवत खाली चालेले सगळं बघत होता.  हातातली सिगार अश्ट्रे मध्ये विझवत आतमध्ये गेला.

" हरी, खाली आलेल्या मॅडमला वरती रूम मध्ये पाठव " ....

" त्या वीर सरांच्या पाहुण्या आहेत " ....हरी

" I said , send her in my room , आणि तुम्हा सर्वांना हाफ डे सुट्टी " .... तो जवळ जवळ ओरडलाच आणि नोटांची एक गठ्ठल त्याच्या पुढ्यात फेकली. हरी पैसे उचलत तिथून बाहेर निघून आला. त्याने दुर्गाला वरती रूम मध्ये बोलावले आहे असा निरोप दिला. आणि पूर्ण स्टाफ घरातून गायब झाला.

********


" सिक्युरिटी ssss .......... Call the police " ......... एक मध्यम वयाची बाई ओरडत होती.

********

 

ती बाई कोण होती? तो पुरुष कोण होता??? असे काय झाले होते की त्या बाईला पोलिसांना बोलावे लागत होते. ?? . 

 

क्रमशः 

*******

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️