दुर्गा ... भाग 1

दुर्गा ... आर्या

     (काल्पनिक रहस्य कथा )   

( सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. याचा, व्यक्ती, वस्तू, स्थळ,  ...इत्यादी कुठल्याही गोष्टींशी संबंध नाही. जर तसे काही आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा, ही विनंती.  धन्यवाद ) 

दुर्गा ....

भाग 1

          " नाही मिळाली ना काही माहिती, मी तुला आधीच सांगितले होते , कैदी नंबर आठशे बारा काहीच बोलत नाहीत, तू गेल्या एक वर्षापासून प्रयत्न करतो आहे, पण आम्हाला माहिती आहे , आम्ही गेले तीन  वर्ष बघत आहोत, आठशे बारा कोणासोबत बोलत नाही. तुझ्या आधी पण बऱ्याच वकिलांनी प्रयत्न केले आहेत त्यांना बोलतं करायचा, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांनी त्यांचा गुन्हा मान्य केला आहे , आणि त्यानुसार कायद्याने त्यांना  शिक्षा सुनावली आहे." ....इन्स्पेक्टर विनय

"आठशे बारा?? विनय नाव आहे त्यांचं काहीतरी, इथे बघितले त्यांना सगळे आठशे बाराच नावाने हाक मारतात . एखाद्याच्या नावाचे, ते पण इतक्या मोठ्या वक्तीच्या नावाचं  अस्तित्वच मिटवले तुम्ही , हे त्या व्यक्तीसाठी किती दुःखद आणि त्रासदायक असते, तुम्हाला याची काही कल्पना तरी  आहे ?"  .... ईशान

" एडवोकेट ईशान , हे जेल आहे. इथे फक्त कैदी आहेत, कोणी मोठा, कोणी छोटा, कोणी श्रीमंत, कोणी गरीब नाही, ते फक्त गुन्हेगार आहेत,  त्यांची ओळख फक्त त्यांचा नंबर असतो . पोलिसांना आणि वकिलांना असे भावनिक होऊन चालत नसते, नाहीतर केस सुटणार नाही" ..... विनय

"तुम्ही बरोबर असू शकता, पण मला अजूनही वाटते त्या गुन्हेगार नाही . म्हणून जोपर्यंत मी माझ्यापरीने तपास पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी त्यांना गुन्हेगार मानू शकत नाही." ..... ईशान

"ईशान , तू विसरतो आहेस , कोर्टाने त्यांना आधीच शिक्षा सुनावली आहे . नाद सोड त्यांचा, त्या काहीच बोलणार नाही . आणि त्या जोपर्यंत काही बोलत नाही , ही केस पुढे जाऊ शकत नाही. तुला काय वाटते पोलिसांनी तपास केला नसेल? जेवढे पुरावे होते, ते सगळे तपासून झाले आहेत. सगळी केस फिरून परत त्यांच्यावरच येऊन थांबते. तू माझा मित्र आहे म्हणून सांगतो आहे, तू हुशार असा नावाजलेला वकील आहे, तू आज पर्यंत एकही केस हारला नाही आहे, का आता ही केस रिओपन करतो आहे?? का उगाच हरल्याचा ठप्पा आपल्या माथ्यावर लाऊन घ्यायचा प्रयत्न करतो आहे??" ....विनय

"विनय, नक्कीच काहीतरी फॅक्टर मिस होतो आहे. मला परत त्यांच्या सगळ्या फाईल बघायच्या आहेत. यावेळी मी ही केस  हारण्यासाठी वा जिंकण्यासाठी नाही तर,  मी स्वतःसाठी लढतो आहे, असे समज "..... ईशान

"काय मिस्टर ईशान, त्यांच्या प्रेमात वैगरे तर पडला नाही ना ?  तसेही त्यांचे व्यक्तिमत्त्व,   दिसणं ही आहेच तसे, कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं, पण लक्षात ठेव त्या व्यक्तीने खूप मोठा गुन्हा केला आहे ."......विनय

" प्रेम ????" ...... ईशान स्वतःच काहीतरी आठवत विक्षिप्तपणे हसला .

" ते बघू नंतर, आधी तू मला सगळ्या फाईल्स दे ." ..... ईशान

" मला तर मामला गडबड दिसतो आहे , तू हार मानणाऱ्यातला नाही ." ....विनय

इन्स्पेक्टर विनय आणि वकील ईशान विनय च्या कॅबिन मध्ये निघून आले.

**

एडवोकेट ईशान , २७-२८ वर्षाचा हुशार आणि नावाजलेला वकील , दिसायला रुबाबदार, चाणाक्ष नजर , हुषारीचे तेज चेहऱ्यावर झळकत होते , आतापर्यंत एकही केस हारला नव्हता. गेल्या वर्षभरपासून तो या कैदी नंबर आठशे बारा  केस च्या मागे लागला होता. आतापर्यंत एकही पाऊल केस पुढे सरकली नव्हती, त्याला कारणही तसेच होते, ही केस आता पूर्णपणे कैद्याच्या बोलण्यावर अवलंबून होती, आणि कैदी, हो कैदी नंबर आठशे बारा आपल्या तोंडून एकही शब्द बाहेर काढत नव्हती , पण ईशान चे मात्र प्रयत्न सुरू होते, त्याने हार मानली नव्हती.

**

"या या ईशान साहेब, तुझीच वाट बघत होतो, दहा दिवस झाले,  आला नाही तू इथे? या वर्षभरात  हे पहिल्यांदा झाले,  की तू इतके दिवस इथे भेट नाही दिली. काय सगळं ठीक आहे ? "....विनय मस्करीच्या सुरात बोलला.

" केसची स्टडी करत होतो. मी भेटू शकतो त्यांना ? " ... ईशान

" हो, म्हात्रे साहेबांना आठशे बारांना भेटायला घेऊन जा "....विनय

" आठशे बारा, तुम्हाला वकील साहेब भेटायला आले आहेत ." ...म्हात्रेंनी आवाज देत दरवाजाचे लॉक उघडे, ईशान आतमध्ये गेला. परत म्हात्रेंनी बाहेरून दार बंद केले.

" Good morning आठशे बारा , आठशे बारा तुमचा आवडता नंबर दिसतोय?? L तुम्हाला सुद्धा या नंबरने मारलेली हाक आवडते,  नाही काय मिस आठशे बारा,   सॉरी की  येस....."

" Stay in your limits Mr Advocate " .... ईशान बोलतच होता की त्याचे बोलणे मधातच तोडत एक करारी आवाज गरजला.

" चला आज पहिला तिर व्यवस्थित लागला आहे " ... मनातच विचार करत तो स्वतःशीच हसला.  "Well done Mr. Advocate , well done " , त्याने स्वतःचीच पाठ थोपटली.

" Thank you Ms , आज पहिल्यांदा तुम्ही काहीतरी बोलले आहात, thank you very much ".... ईशान

" तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात " ... ती

" नाही, मी माझा वेळ वाया घालवत नाही आहो, आणि तुम्ही माझ्या वेळेची काळजी करू नका , माझ्याकडे भरपूर वेळ आहे . " .... ईशान

" मला तुमच्या सोबत काहीच बोलायचे नाही आहे , तुम्ही जाऊ शकता ." ....ती

" ठीक आहे, मी उद्या येईल ." ... ईशान

" उद्या पण माझं उत्तर हेच असेल ." ....ती

" No problem, मी परवा येईल ." .... ईशान

" वकील साहेब तुम्ही फार हट्टी आहात ."... ती

" एका वर्षापासून  येतोय मॅडम , चिकाटी आणि जिद्द,  तुमच्या जवळूनच शिकलो आहे ." .... ईशान

" मी माझा गुन्हा कबूल केला आहे, त्याची मला शिक्षा ही झाली आहे, आणि जे आहे त्यात मी ठीक आहे. ".... ती

"  तुम्ही हे जे काही करत आहात , त्यामागे नक्कीच काही कारण असेल, आणि मला ते जाणून घ्यायचे आहे ." ... ईशान

" मला ही केस रिओपन करायची नाही आहे ." ...ती

" मला करायची आहे." ..... ईशान

" मग तुम्हाला माझ्याकडून काहीच माहिती नाही मिळणार , You may go now ." ... ती

" चींधिगाव , एका खेड्यातली मुलगी किती मस्त इंग्रजी बोलते, इम्प्रेसिंग." ... ईशान

" वकील साहेब, किती दिवस इथे अश्या चकरा मारणार आहात ? " ....ती

" तुम्ही जोपर्यंत मी विचारतोय, ते सांगणार नाही तोपर्यंत ." ..... ईशान

" तुम्ही प्रॉमिस करा, जोपर्यंत मी परमिशन देत नाही तोपर्यंत ही केस ओपन होणार नाही ? "...ती

" ठीक आहे , प्रॉमिस ".... ईशान

" विचारा जे विचारायचे आहे ते ? " .... ती

" तुम्ही माझ्या प्रॉमिस या एका शब्दावर विश्वास ठेवला ?"... ईशान

" वकील साहेब, आम्ही लोक पाऊलखुणा वरून आणि त्याच्या आवाजावरून ओळखतो , कोण कुठल्या हेतूने येत आहे. " ... ती

" Great, again impressed !" ... ईशान

" मॅडम, तुम्ही अशा पाठमोऱ्या बोलणार आहात काय ? " ... ईशान

तेवढयात ती,  जी ईशानला पाठमोरी उभी होती,  ती ईशानकडे वळली.

पांढरी शुभ्र साडी त्याला निळी बॉर्डर ,केसात मधून भांग पाडलेला केसांची तीन पेढी वेणी, ब्राऊन डोळे, डोळ्यांमध्ये आत्मविश्वास, चेहऱ्यावर करारीपणा , आणि साडीवर खांद्या जवळ बॅच , ८१२ आठशे बारा.

" दुर्गा ,  No change at all ! तेच तेज , तोच कॉन्फिडन्स, तोच करारीपणा , तेच सौंदर्य " ... ईशान मनातच विचार करत तिच्याकडे बघत होता. वर्षभर तो इथे येत होता, पण ती कधीच त्याच्यासोबत बोलली नव्हती, नेहमीच त्याला पाठमोरी उभी असायची. आज पहिल्यांदा ती त्याच्या सोबत बोलत होती, त्यामुळे त्याला बरेच आशेचे किरण दिसत होते .

*****
क्रमशः

*****

कोण आहे ही दुर्गा?? असा कुठला गुन्हा केला तिने??  का ती जेल मध्ये आहे ?? Adv ईशान या केस मध्ये का इंटरेस्ट घेत आहे???  .... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी , वाचत रहा ' दुर्गा ' . 

*****

नमस्कार मित्रांनो,

हा माझा रहस्यकथा स्पर्धेचा  पहिलाच प्रयत्न आहे. आपण सर्वांनी माझ्या इतर कथांना खूप भरभरून प्रेम दिले आहे. अपेक्षा करते ही कथा आपणा सर्वांना आवडेल. काही चुका असल्यास नक्कीच कॉमेंट्स मधून कळवा, आपल्या कॉमेंट्स मधून बरेच शिकायला मिळते, आणि आपल्या शाबासकी ची थाप आत्मविश्वास आणि उत्साह वाढवतो.

मला माहिती आहे तुम्ही सगळे नंदिनी आणि तुहिरे कथेच्या पुढल्या भागांची वाट बघत आहात.ही कथा स्पर्धेसाठी असल्यामुळे, वेळेत पूर्ण करायची आहे म्हणून ही लिहायला घेतली आहे, त्यामुळेच नंदिनीचे भाग टाकायल उशीर होतो आहे. तुहिरे चे भाग एक दिवस आड पोस्ट करेल आहे. स्पर्धांमधून लिहितांना , नियमांचे पालन करतांना लिखाण चांगले  होण्यात मदत होते, म्हणून मी हा प्रयत्न करत आहे. नंदिनीचे भाग थोडे उशिरा येतील. 

धन्यवाद 

🎭 Series Post

View all