Dec 01, 2021
कथामालिका

दुर्गा ... 26

Read Later
दुर्गा ... 26

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


दुर्गा 26

मागच्या भागात : तीन वर्ष नंतर दुर्गा प्रशिक्षण घेऊन एक मोठी पोलीस ऑफिसर बनून घरी परत येते. आर्या आणि दुर्गाची आई घरी तिचं स्वागत करतात. दुर्गाला आर्या आर्मी ऑफिसर आहे असे सांगते . आर्या ला तिच्या बोलण्यावरून कळते की तिला सगळ कळलेले नाही , त्याचं टेन्शन कमी होते . दुर्गा आर्याला काहीतरी सरप्राइज देणार असते. आता पुढे …..

भाग 26

घर ते घरच असते , दुर्गाला घरात येऊन फार छान वाटत होते, त्यात तिची आवडीची , मायेची , महत्वाची दोन व्यक्ती घरात होती , तिला एकदम हलकं आणि शांत वाटत होते . तिची आई तर तिला बऱ्याच म्हणजे जवळपास 5-6 वर्षानंतर भेटली होती , त्यामुळे आईसोबत किती बोलू असे तिला झाले होते. दुर्गा घरी परत येतेय जेव्हा आर्याला कळले , तेव्हा तो दुर्गाच्या गावी जाऊन तिच्या आईला इथे घेऊन आला होता . दुर्गाला तिच्या गावाला जायचं तरी इथूनच जावं लागणार होते , त्यात ती मोठा प्रवास करून आली होती , तिला आराम मिळावा , आणि पहिल्यांदा भेटायचं तर \" आई किंवा तो \" असे पण नको व्हायला , एकाच वेळी दोघेही भेटता यावे , तिच्या या स्पेशल दिवशी तिच्या मायेची माणसं तिच्या सोबत असावी , असे आर्याला वाटत होते आणि त्याला माहिती होतं दुर्गाची पण हीच इच्छा असेल , आणि त्याने हा योग जुळवून आणला होता .

" दुर्गी , या जेवायला !", दुर्गाच्या आईने आवाज दिला.

" भारीच ! " … दुर्गा डायनिंग टेबलच्या बाजूला खाली मांडलेली बैठक पंगत आणि वाढलेले ताट बघून म्हणाली.

" साधंच जेवण बनवली दुर्गी , मला काय ते तुमचं शहरासारख जेवण बनवत न्हाई इत . म्या नको म्हणलं , पण हे साहेब म्हणले तुमच्याच हातचं खायचं , तिकडे गावाकडे जेवत होतो तस . म्हणून बनवलं !", आई . दुर्गाची आई आर्याचे घर बघून तसेच खूप बावरली होती , पूर्ण उभ्या आयुष्यात तिने असे घर , अशी श्रीमंती बघितली नव्हती , त्यामुळे तिला स्वयंपाक करायला खूप अवघडल्यासारखं झाले होते . पण आर्या च्या आग्रहाखातर तिने जेवण बनवले होते.


" अरे मेरी माई , दुनिया के सारे पकवान , छप्पन भोग एक तरफ और मेरी माय के हाथ का बना खाना एक तरफ . अमृत कशाला म्हणत असेल तर ते हे आहे . बरं गप्पा नंतर , मला खूप भूक लागली आहे , मी तर जेवते !", म्हणतच दुर्गा खाली पाटावर फत्कल घालून बसली , आणि अगदी अधाश्यासारखी जेवू लागली. जेवता जेवता तिला ठसका लागला .

" दुर्गे हळू जीव की , कोण मेलं आताचं आठवण काढीत हाय ? ", दुर्गाच्या आई तिच्या हातात पाण्याचा देत बोलली.

" आज्जी असेल , तिला नाही आणली तू ?", दुर्गा

" तुझा बाप जाऊ दिईल का ? मीच तर कसं तरी आली !", आई

" ना ना त्या नाही , शान बाबू आठवण काढत आहे , हो ना दुर्गा ?", बाजूला बसलेला आर्या दुर्गाची मस्करी करू लागला .

" शान बाबू ? हे कोण म्हणायचं ? मानलेला भाऊ काय ? ", आई प्रश्नार्थक नजरेने बघत होती .

" आपल्या दुर्गादेवीचे आशिक !", आर्या हसत बोलला.

वर्तमान ….

तुरुंगात दुर्गा बसली हे सगळं ॲड. ईशानला सांगत होती आणि \" शान मानलेला भाऊ \" हे दुर्गाच्या आईचे शब्द ऐकून ईशानला ठसका लागला. त्याने हवालदार कडून पाणी मागवले आणि गटागटा प्यायला.

" हा तोच शान आहे ना , जो कॉलेज मध्ये तुमच्या मागे लागला होता ?", ईशान

" मागे वगैरे काही नाही , तो लहान मुलगा होता. त्या वयात मुलं भरकटत असतात , अट्ट्रॅक्शन ला प्रेम समजू लागतात , नाहीतर उगाच सगळ्यांचं बघून मला पण एखादी गर्लफ्रेंड असावी असे फंडे असतात त्यांचे. त्या वयातली ती फ्यांटसीच असते , स्वप्नवत जगत असतात .", दुर्गा

" मला नाही वाटत ते त्या मुलाचं अट्ट्रॅक्शन असावं , तुमच्या सारख्या वाघिणीच्या मागे लागणं , हे नक्कीच सोपं नव्हतं !", ईशान

दुर्गा त्याचाकडे अजब प्रश्नार्थक नजरेने बघत होती.

" मला म्हणायचं की त्या मुलासाठी ते सोपं नसावं , म्हणजे कोण स्वतःचे हातपाय तोडून घेईल !", ईशान हसत बोलला.

" आर्या सुद्धा असेच म्हणायचे !", ईशानचे बोलणं ऐकून दुर्गाला सुद्धा थोडं हसू आले.

" त्यांना माहिती होते शान बद्दल ?" , ईशान

" हो , एकदा त्यांच्या समोरच त्याचा फोन आला होता. तेव्हा मी त्या शान वर खूप चिडले होते , त्याला चोप द्यायचं ठरवलं होते. उगाच फोन करून माझं डोकं सटकवायचा आणि स्वतःचा पण वेळ वाया घालवायचा !", दुर्गा

" तुम्ही मारलं होतं त्याला ?" , ईशान

" नाही , त्याच्या बोलण्यावरून तो चांगला मुलगा वाटत होता , आर्याने अडवले होते , वारनिंग देऊन सोड म्हणे आणि जमल्यास योग्य मार्ग दाखव म्हणाले. ", दुर्गा

" मग ?", ईशान

" बोलले त्याचासोबत , बापाची ओळख सोडून स्वतःच नाव करून दाखव , काहीतरी बन , स्वतः ची वेगळी ओळख निर्माण कर . मला जमलं तसे समजावले त्याला .", दुर्गा

" समजला तो ", ईशान

" हो तर म्हणाला होता. काहीतरी बनून मग माझ्या समोर येईल !", दुर्गा.

" आला काय मग तो समोर ?", ईशान

" नाही ! नसेल जमलं त्याला मला केलेलं प्रॉमिस पूर्ण करणं , बोलणं सोपी असते , पण तसे वागणे तितके सोपी नसते ", दुर्गा

" पण कठीण पण नसते. आला पण असेल , पण तुमच्या पुढे नसेल येऊ शकला , काही कारण पण असू शकतात !", ईशान

" असेल !", दुर्गा

" त्याने तुमचं बोलणं खरंच मनावर घेतले आणि तो खरच तुमच्यापुढे आला तर ? ", ईशान

" त्याचे यशस्वी आयुष्य बघून मला आनंदच होईल !", दुर्गा

" तो तुम्हाला इतका इंपॉर्टन्ट का वाटत आहे ? त्याला बघितले नव्हते तरी आर्यांना सुद्धा तो आवडायचा ! मला नेहमी त्याचा नावाने चिडयवायचे , म्हणायचे तुझ्यावर प्रेम करायची जो हिम्मत करू शकतो तो ग्रेट च असणार ! मस्करी ठीक , पण तो काही माझ्या आयुष्यात महत्वाचा नव्हता . ", दुर्गा

" आयुष्यात कोणी उगाच भेटत नसते, काहीतरी ऋणानुबंध असतात ! प्रत्येक व्यक्ती युनिक असतो , आयुष्याने प्रत्येकासाठी काहीतरी ठरवले असते अँड I believe in destiny ", ईशान

" तुम्ही एक वकील त्यात पुरुष असून असे भावनिक बोलत आहात ?" , दुर्गा

" एक आयपीएस ऑफिसर जर प्रेम करू शकते तर मग वकील का भावनिक बोलू शकत नाही ? आणि मर्द को भी दर्द होता है , मॅडम !", ईशान

दुर्गा हलकेच हसली , " ऑफिसर व्हायच्या आधी मी प्रेमात पडले होते !"

" वकील व्हायच्या आधी पण मी भावनिक होतो ! Anyways , तुम्ही या तुरुंगासाठी बनलेल्या नाही .", ईशान

दुर्गा चूप होती , परत त्याच विषयावर बोलणं तिला नको वाटत होते .

" तुम्ही त्याला कधी बघितले नाही ?", ईशान

" ह्मम !", दुर्गा

" मिस्टर आर्यविर खूप कूल होते , ", ईशान

" हो !" , दुर्गा

" त्यांच्यासमोर तुम्ही दुसऱ्या मुलासोबत बोलत आहात, आणि ते चिडत नाहीये ग्रेट ! ", ईशान

" प्रेमाचा एक अर्थ विश्वास सुद्धा आहे ! आणि प्रेम एकदाच होते , आणि मी फक्त त्यांच्यावर प्रेम करते हे त्यांना माहिती होते ", दुर्गा

" प्रेम एकदाच होते ! ", ईशान अजब हसला.

"तुम्ही कधीच त्यांचं पहिलं प्रेम नव्हता , फर्स्ट प्रायोरिटी नव्हता ! नाहीतर…..",

" तुम्ही मला हे सांगायची गरज नाही !", ईशान बोलायच्या आधीच दुर्गा थोड्या कडक आवाजात म्हणाली.

" आणि शान बद्दलच हे काय फालतू घेऊन बसले आहेत? तुमचे महत्वाचे प्रश्न झालेत विचारून ? झाले असतील तर तुम्ही जाऊ शकता !", दुर्गा

" सॉरी मॅडम , पण माझा प्रत्येक प्रश्न महत्त्वाचाच आहे , तुमच्या आयुष्यातला एक एक क्षण जाणून घेणे माझ्यासाठी गरजेचे आहे ! तुम्ही काय सरप्राइज देणार होते ?की त्याच सरप्राइज ने तुम्हाला इथे तुरुंगात आणून सोडले ?", ईशान

" सांगते !", दुर्गा
आणि दुर्गा परत भूतकाळात गेली.

भूतकाळ ….

मजा मस्करी मध्ये जेवणं आटोपले. दुर्गा आपल्या आई सोबत बोलत बसली होती. सगळ्यांसाठीच बालपण खूप महत्वाचं , आनंदाचा , आणि नेहमी आठवण काढून बोलवे असा गोड काळ असतो. बालपण घालवलेली जागा सुद्धा खूप महत्वाची असते , प्रत्येक कानाकोपऱ्यात तिखट गोड पण हव्याहव्याशा आठवणी असतात. ती तिच्या गावच्या एक एक व्यक्तीची आठवण काढत सगळ्यांबद्दल विचारात होती आणि तिची आई तिला सगळं सवित्सर सांगत होती. तिला सुद्धा माहिती होते दुर्गाचा गावात सगळ्यांसोबत लळा लागलेला होता, गावातली भटकभवणीच होती ती.
आर्या दोघींच्या गप्पा ऐकत बसला होता पण ऐकू मात्र त्याला काहीच येत नव्हते , त्याचं सगळं लक्ष दुर्गाच्या चेहऱ्यावर होते, तिचे बोलतांना होणारी ओठांची , डोळ्याची हालचाल , क्षणाक्षणाला बदलणारे हावभाव , ते बघून त्याला ती सतरा वर्षाची दुर्गा आठवत होती , जेव्हा तो पहिल्यांदा तिला भेटला होता. तेव्हाची दुर्गा आणि आताची दुर्गा , जमीन आसमानचा बदल झाला होता , पण चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास , काही करून जाण्याची जिद्द जशीच्या तशी होती. तो तिला टिपत बसला होता . त्याला काही फोन आला तसा तो तिथून उठून चालला गेला.

" माय , तिकडे चाळीत आजी वाट बघत असेल , घरी जाऊ !", दुर्गा

" हो , मी का म्हणते दुर्गी , मी पण आता गावाकडे निघते. ", आई

" हो जाऊ आपण !" दुर्गा

" नाय म्हणजी , आता तुला लय कामं आसतील, मी जाते आपली ", आई

" काय माय , एवढी तरणीताठी झाली तुझी पोरगी , माझ्या लग्नाचं वगैरे काय बघायचं नाय काय ?", दुर्गा आपल्या आईची मस्करी करत बोलली.

" मी काय तूया साठी तूज शोभेल असा पोरगा शोधू शकते , माझ्या पोरीला कसा तिला शोभेल असाच पोरगा पायजे न ? हायेत की हे सायेब , हे शोधतील चांगला पोरगा , तस बी मायापेक्षा तूयावर जास्त हक्क त्यायीचाच आहे , अन् तुझी त्ये आजी . मी तर जन्म दिला होता , माय म्हणून मी तर करणारच व्हते , पण सायेबाचं अन् आज्जीचं तुमचं नातं म्हाया रक्ताच्या नात्यावर वरचढ झालं पाय . लय जीव लावत्यात पाय तुला , तुजसाठी तेच चांगला जोडीदार शोधू शकतात !", आई थोडी भाऊक होत म्हणाली.

" बापरे बाप माय , तू तर मंत्री होऊ शकते !", दुर्गा तिची मस्करी करत बोलली

" बदमास कुटची , माय ची मजा घेते व्हय !", आई हसत म्हणाली.

" बरं माय , मी का म्हणते , हे आपले साहेबच कसे राहतील तुझे जावई व्हायला ?", दुर्गा

" हे ? पोरी आपण कुठं झोपडीतले , हे कुठे ? यायीचं घर पायल का , राजवाडा हाय. घरी काम करास पाय किती लोकं हायित , अन् आपण , आपण दुसऱ्याच्या घरी काम करणारे लोकं . नाय जमणार पोरी . पोरी , सपान पाहायचं , पण आपल्या हद्दितले , आपल्यास पुरे करता इल असे . असे मोठे मोठे सपान नग बगु , तुटले तर लय त्रास हुईल बग !", आई दुर्गाला समजवण्याचा सुरात म्हणाली.

" माय , स्वप्न तर मोठीच बघायची , आणि ती फक्त बघायची नाही तर पूर्ण करण्याची जिद्द आणि धमक पण ठेवयाची !", दुर्गा

" पण मालक, मालक म्हणजे खूप मोठी गोष्ट हाय …. आपण तर कधी सपणात बी ईचार नाय करू शकत असा !", आई

" मी ऑफिसर होईल , कधीतरी असे वाटले होते काय ? …… नाही ना ? पण झालं आहे ना पूर्ण ", दुर्गा

" ते येगळं हाय , हे येगळं हाय ", आई


" माय , जर मालकांनी तुझ्याकडे लग्नासाठी माझा हात मागितला तर देशील का ?!", दुर्गा

" काय ?", आई आश्चर्यचकित होत तिच्याकडे बघत होती

" हो , मालकाचे खूप प्रेम आहे माझ्यावर , आणि माझं पण . मी ऑफिसर बने पर्यंत ते थांबले माझ्यासाठी. आता त्यांना परत वाट बघायला लावणे बरे नाही ना ?", दुर्गा

" आता मालकच तुला झेलाया तयार झाले म्हणती तर म्या काय बोलणार मधीच !", आई

" माय sss " , दुर्गा हसतच आपल्या आईच्या गळ्यात पडली.

" माय , तुला मालक आवडले ना ?", आईच्या तोंडून आर्याचे कौतुक दुर्गा उगाचच बोलली.

" व्हय तर , आता ज्यांनी तुला फुलापरी जपलं , तो माणूस कसा नाय आवडणार ! हा म्हणजी तू फुल नाय दगड हायीस , पण तरी बिचाऱ्यांनी जपलं तुज !", आई

" तू लय मजाक करास शिकली आजकाल , हा माय ? आता कशास घाबरत नाय हा तू ?", दुर्गा

" ज्या माय ची पोरगी तुया सारखी असल , तिच्यात शंभर वाघिणीच बळ येती. मी त म्हणती , तूया सारखी पोरगी प्रत्येक घरात पायजे !", आई

" काहीही हा माय !", दुर्गा

" तू माय बंशील , समजिल मग !", आई

ते ऐकून दुर्गाला खूप लाजल्यासारखे झाले होते.

" बरं , मी मालकाला सांगून येते , माय लग्नास तयार हाये म्हणून , आणि मग आपण तिकडे आजीकडे जाऊ !", दुर्गा बोलतच वरती आर्याच्या रूम कडे पळाली.


" ही तर माझी गाय माय होती, कशीही पटलीच असती , ते तिकडे इंग्लिश गाय बसली आहे … त्यांचं काय करू !", दुर्गा स्वतःशीच बोलत आर्याच्या रूम मध्ये दार उघडून जाणार तोच बोलायचा आवाज ऐकून ती तिथेच थबकली.

******

क्रमशः

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "