दुनिया का सबसे बडा रोग

This is the the thoughtful article

दुनिया का सबसे बडा रोग:-...........

'विनय' कायमच सगळ्यांशी मितभाषी राहायचा. कोणाला दुखवायचा नाही. सगळ्यांशी जमवून घ्यायचा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा.

एके दिवशी ऑफिसमध्ये असताना त्याला दिसले की ऑफिसचे 2 लोक त्याच्या कडे बघून काहीतरी बोलत आहेत...तो ते काय बोलत असतील हा विचार करत राहिला...

थोडयावेळाने त्याला दिसले की अजून काही जण त्याच्या बद्दल काही बोलत आहेत...आज नक्क्की आपल्या हातुन काय घडलंय की सगळे जण माझ्या बद्दल बोलत असतील हा विचार त्याला त्रास देऊ लागला!

जेवण्याच्या वेळेस नेहमीच्या लोकांनी त्याला टाळले त्यामुळे त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे रसातळाला गेला...

त्यावेळेस त्याला जाणवले की आपण काहीतरी मोठी चूक केली आहे आणि म्हणून आपल्या बाबतीत असे घडत आहे. 

तो प्रचंड अस्वस्थ झाला होता..मनापासून दुसऱ्यांना आनंदी ठेवणारा विनय आज मात्र स्वतः दुःखी झाला होता...

का असे झाले असेल?

नक्की काय घडले असेल विनय च्या बाबतीत?

मी असंख्य लोकांशी बोलत असताना मला एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे लोक स्वतःचे आयुष्य नीट जगत नाहीत..याचा अर्थ काय? तर याचा अर्थ हाच कीं अनेक जण इतर लोकांच्या नजरेतुन जगतात!

आता विनय चे पहा ना, त्याने स्वतःच्या आयुष्याचा आनंद हा दुसऱ्यांच्या रिऍकशन वर अवलंबून ठेवला होता...रिऍकशन चांगली तर आंनद निश्चितच... रिऍकशन वाईट तर दुःख ठरलेले!

जी माणसे आपल्या प्रत्येक कृतीवर,  सतत लोक काय म्हणतील याचाच विचार करत असतात ते सुखी होण्यापूर्वीच दुःखी होत असतात.

लोक काहीतरी नक्की म्हणतात..कधी चांगले..कधी वाईट!

कधी आपल्या बाजुने तर कधी आपल्या विरुद्ध!

या सगळ्यात आपण स्वतः नक्की कोण आहोत,  आपलं अस्तित्व कशावरती अवलंबून आहे? या रिऍकशनस् नी आपल्याला नक्की किती फरक पडतो हे जाणणे खूप गरजेचे आहे...

जर आपण दुसऱ्यांच्या भावनेने स्वतःचे मूल्यमापन करणार असू तर ते चुकीचे आहे..

प्रत्येक क्षणाला लोक काहितरी म्हणणारच हे मान्य करणे जास्त सोपे नाही का? एकदा हे स्वीकारले की दुःख कशाचेच राहणार नाही.

आणि म्हणतात ना, लोकांचे काय आहे- पेरू घेताना ते गोड आहेत का म्हणून विचारतील आणि कापल्या नंतर त्याला मीठ लावून खातील!

हीच रीत असते जीवनाची! 

 दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग...

मग ह्या रोगापासून लांब राहणार ना?

©®अमित मेढेकर