दुनिया

Its a story of that boy, who are sacrifice in korona pandemic.

                दुनिया

                ऑफिसमधून घरी जाताना घाई असते तशी पण आज आरामात मुंबईचे रिकामटेकडे रस्ते बघत चाललेले. लॉकडाऊनमध्ये आपली मुंबई लंडन, अमेरिकेपेक्षा कमी सुंदर दिसत नाही. शक्य तेवढं डोळ्यात साठवत चाललेले. तशीही फॉरेन टुर नशिबात नाही, नशिबाची टुरटुर बाकी काय? 
                "बिसका एक, बिसका एक", म्हणणारा रस्त्याच्या कडेला 16 वर्षाचा मुलगा दिसला. हातात हातमोजे, मास्क आणि बरेच काही विकत असलेला. ओळखीचा वाटला. अरे हा तर पेपरवल्याचा मुलगा. वडिलांबरोबर पैसे घ्यायला येतो पेपरचे आणि कधी कधी पेपर टाकायलाही. 
                जवळ जाऊन प्रश्नमंजुषा सुरू.
:- काय रे इकडे कसा?
तो- अरे मॅडम आप. वो पेपर अभी बंद है इसलीये ये सब. आपको क्या मंगता है? (सामान दाखवत)
मी- (मास्क बघत ) तुझे वडील काय करतात आता?
तो - मॅडम ये कोरोनाने सब खल्लास करदीया. धंदा बंद, पैसा बंद. इसलीये अपुन फादरको बोला रेलक्सनेको. अपुनने ये नया धंदा चालू कीयेला है.
मी - अच्छा. मास्क कितीला दिलेत?
तो - वैसेतो बिसका एक देता है, पर आप पेचांनके हो इसलीये 50 के 3 दे देगा.
मी - चल खोटारड्या. हा तुझा मार्केटिंग फंडा आहे मला माहित नाही काय? आला मोठा पेहचांनवाला.
तो - (बुजल्यासारखा हसला) ले लो मॅडम.
मी - 3 मास्क दे मला. शाळेत जातो की नाही.
तो - जाता है ना मॅडम. दसवीका एक्झाम दीयेला है पर अभि कोरोना का घोटाला आपको मालूमीच होगा.
मी - होशील पास. हुशार दिसतोस. सर्वाना पास करणार आहेत असं समजलंय.
 तो- वैसा होयेगा तो अच्छा होयेगा. 
मी - ( हातमोजे बघत) हातमोजे कसे दिले? दहावि नंतर काय करणार आहेस?
 तो- एक जोडी 50 का और दो जोडी अस्सी का देगा. दसवीके बाद क्या वहिच ग्यारावी- बारवी और बादमे फादरका पेपरका बिझनेस संभालेगा.
मी - काही व्ययसायिक शिक्षण नाही घेणार तू? काही कोर्स वैगेरे नाही करणार.
तो - वो तो अपुनकोभी करणेका है पर पैसा कौन देगा? इरादातो पेपर छापणेका है पर किसमतमे पेपर बांटनेका काम है. .
मी - कुठे राहतोस? 
तो - आपके कॉलनिके बाजूमे जो झोपडपट्टी है उसीमेच अपुन रेहता है.
मी - अच्छा. आणि हे काय अपुन अपुन, नीट बोलता येत नाही तुला?
तो- I can speak every language, but people think I apply fullish trick for marketing. They laught and neglect to me. And I want to do something special  for my 'Aaibaba'. but my fate is not allowe to me.
मी- तू मराठी आहेस? ( मला दोन शॉक लागलेले.)
तो - हो. माफ करा.
मी - केव्हाची मी तुझ्याशी मराठी बोलतेय नि तू टपोरी बोलतोस.
तो - इथे मराठी कळते कुणाला ? 10 मधून 9 लोक मराठी न कळणारे. विकणारेही हिंदी घेणारेही हिंदी. पन्नासला एक म्हटलं तर लोक वेड्यासारखे बघतात तोंडाकडे. पुन्हा पुन्हा explain करतो मग. माझ्याकडून सामान घेणारे श्रीमंत नसतात ते ऑनलाईन मागवतात. So I apply my marketing fanda to attract people.
मी - भन्नाट आहेस रे तू. काही गरज वाटली तर बिनधास्त घरी ये. आणखी 3 मास्क दे.
तो - हे घ्या ताई.
पैशांची देवाणघेवाण झाल्यावर,
तो - मॅडम अगर कूछ मंगता है तो ये अपुनका कार्ड है अपुन उधरिच आयेगा. और सबको बतानेका अपुनके मास्क के बिझनेस्के बारेमे.
मी - I am not going to tell anything to anyone, अगर तुम एसेयीच बोलेगा तो. 
दोघेही दिलखुलास हसलो.
               दहावीतल्या पोरांना 'दुनियादारीची' समजदारी नसते म्हणतात पण याने दहा मिनिटात ' दुनिया' दाखवून दिली.