दृष्टीकोन कसा बदलतो

Drustikon




त्या सगळ्या जणी सकाळी सकाळी फिरायला आलेल्या...त्यात रुख्मिणी त्यांच्यातली एक आज आली नाही हे पाहून त्या सगळ्या तिच्याबद्दल काही वाही बोलत सुटल्या...

पण ती आली कशी नाही..एकीने हसत विचारले, एरवी तर रोज आपल्या आधी हजर असते..भारी सुखी आहे बाई ती...

दुसरी... अग तिच्या मुलाचे खूप कौतुक करते,लाड पुरवते.. आणि तो तर तिला रोज भांडत असतो..मारत ही असतो मी ऐकले..ते ही रोज..

तरी इतकी शान मध्ये येत असते बाई...चल जरा आपण पाहून येऊ, ते ही अचानक..निदान काय गम्मत आहे ते तरी कळेल..

त्या सगळ्या तिच्या घरी अचानक जातात आणि तिच्या घहरातील दृश्य पाहून त्यांना धक्का बसतो, तिचा मुलगा समोर असतो आणि ती त्याला तिच्या हाताने खूप घालत असते अगदी 4 वर्षच्या मुलाला खाऊ घातले जाते तसे... गळ्याभोवती एक कपडा ,आणि त्यावर पडलेले अन्न...त्याचे तोंड बरबटलेले....


त्यांना आता खरी हकीकत कळते....आणि त्या आईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो....