दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 11

Drushti, Drushtikon, sight, vision, perspective, viewpoint, Rujuta, Viraj, Rohit, Marathi, katha, kathamalika, story


मागील भागात आपण पाहिले ...

वीणाताई आणि विधी रेखाताईंना भेटायला घरी आले. ऋजुताच्या हातची भजी आणि चहा आवडून विणाताईंनी ऋजुताचे कौतुक केले.  विधी आणि रजतची ओझरती नजरभेट झाली. काही वेळाने विराजसुद्धा तिथे आला. विराज तेथे गेल्यावर अचानक विराजला बघून ऋजुता चकित झाली आणि आई अन विधीला तिथे पाहून विराज आश्चर्यचकित झाला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ...

"ऋजुता इकडे ये लॅपटॉप घेऊन , प्रेझेंटेशन आणि आणखी काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत", विराजने डेस्कवर फोन करून ऋजुताला केबिनमध्ये बोलवले.

आता पुढे ...

विराज आणि ऋजुता केबिनमध्ये प्रेझेंटेशन वर चर्चा करत होते. सगळं झाल्यानंतर विराज म्हणाला, " ऋजुता, या वेळी डीलबद्दल बोलणी आणि प्रोसेसेस सुद्धा तुला करायच्या आहेत".

"काय? मी कसे करणार ते? कधीच केले नाही मी ते आतापर्यंत", ऋजुता .

"ऋजुता, मला सांग ... आता तू टीम लीडर आहेस .. वेगवेगळ्या क्लाएन्ट्सशी बोलणे, वेगवेगळ्या टीमशी बोलून सहकार्याने प्रोजेक्ट पूर्ण करणे इत्यादी ... छान सांभाळतेस ना सगळं ? ", विराज.

"हो", ऋजुता.

"पण जन्मतः च तर तू टीम लीडर नव्हतीस ..... म्हणजे मला तरी असं वाटतं", विराज डोळे मिचकावत, गालात हसत म्हणाला.


"विराज ... तुला गंमत सुचते आहे? इथे मी एवढी टेन्शन मध्ये आहे", ऋजुता खट्टू होऊन म्हणाली.

"अग वेडू, टेन्शन मध्ये आहेस , म्हणून तर हसवण्याचा प्रयत्न करतो आहे ना.  यात टेन्शन घेण्यासारखे काही नाही. हे बघ, कधीतरी पहिली वेळ असणारच ना? तुला जी काय अडचण असेल ते विचार ना आता मला. मी सांगेन. But if you have to grow in your career, you have to grab the opportunities which come in your way. Isn't it?",  विराज तिला समजावत म्हणाला. 

"हं , खरं आहे. ठीक आहे . मी करीन या वेळी आणि व्यवस्थित करीन ", ऋजुता.

"Yes, thats the spirit ! ", विराज आनंदित होत म्हणाला.

"तुला माहीत आहे ऋजुता, I know your potential. तू लवकरच शिकशील हे सुद्धा. मी आहेच ना सोबत ", विराज तिला आश्वासन देत म्हणाला.

"हं, बरं थोडा विचार करू दे मला. काही अडचण आली तर विचारते", ऋजुता.

काही वेळ ऋजुताने आपल्या पद्धतीने अभ्यास केला . स्वतः सगळे समजून घेतले आणि शेवटी विराजकडून एक दोन गोष्टी समजून घेतल्या.

"हं , now I am ready ", ऋजुता.

"हं , गुड. दुपारी जायचं आहे आपल्याला. लंच वगैरे करून घे आता.

"बाय द वे, काय आणलं आहेस आज डब्यात? आजही तूच बनवला असेल ना?", विराज.

"हो ", ऋजुता.

"I am fan of your dishes  now. काय मस्त होती कालची भजी ! अजूनही चव रेंगाळल्यासारखी वाटतेय जिभेवर. आणि चहा ... आ हा हा", डोळे मिटून चव आठवत त्यात बुडून गेल्यासारखा चेहरा करत विराज म्हणाला.

"विराज , बस कर आता नौटंकी हं? ", ऋजुता खळखळून हसत म्हणाली.

"अग खरच ना , घ्या, आता खरं बोलावं तर नौटंकी म्हणतात लोक ", विराज हसून म्हणाला.

"आज मी साधंच बनवलंय, भरली भेंडी आणि पोळी वगैरे. पण तुम्ही कुठे आम्हा पामरांबरोबर जेवायला येणार? तुमची उठबस तर मोठमोठ्या सर लोकांमध्ये आहे बाबा !",  ऋजुताही आता मिस्कीलपणे आणि नाक मुरडत म्हणाली.

"तुझा हात लागल्यावर तेही स्पेशलच होणार" , विराज.
"अन भरली भेंडी तर फेव्हरेट आहे माझी  . चलो तुम भी क्या याद करोगे, आज 'हम' तुम लोगों के साथ खाना खाएंगे", विराज आधीच ताठ असलेल्या कॉलरला अजून ताठ करत हसून म्हणाला.

ऋजुता ने हसून त्याच्या नौटंकीला प्रतिसाद दिला.
"तो फिर चलें? मी बोलवते टीमला ", ती  उठून केबिनच्या बाहेर जागेवर जात म्हणाली.

"हो, मी आलोच सरांना सांगून", विराज.

ऋजुताने टीममधल्या सर्वांना जेवणासाठी बोलावले आणि विराजही सोबत येतोय असे सांगितले. सर्वांना जरा आश्चर्यच वाटले. आज हे कसे काय घडले बुवा?

"ऋजुता, तू है तो सबकुछ मुमकिन है", निकिता म्हणाली.

"ए , चला आता लवकर", ऋजुता सर्वांना म्हणाली .

सर्वजण आपापला डबा घेऊन निघाले. जे कोणी कॅन्टीन मधून जेवण घेणार होते तेही पुढे जाऊन रांगेत उभे राहिले.
सर्वांना निघालेले बघून विराजही आपला डबा घेऊन आला.
सर्वजण कॅन्टीन मध्ये एका मोठ्या टेबलाभोवती बसले.

"ए मला जरा चटणी दे तू आणलेली"

"अरे वा, ही तर माझ्या आवडीची भाजी आहे. दे जरा थोडीशी मला"

"पराठा मस्त आहे तुझा"

सर्वांचं असं शेअरिंग चाललं होतं.

"ऋजुता,  हे घे  ", निकिता तिच्याकडे आपला डबा सरकवत म्हणाली. "अग पण इतक्या सकाळी घाईघाईमध्ये भरली भेंडीसुद्धा केलीस तू? म्हणजे काकूंचं पण बघायचं असतं ना तुला म्हणून म्हटलं".

"हं, काल तयारी करून ठेवली थोडीशी, सुका मसाला वगैरे. मग झालं सकाळी नीट".

"Wow, management गुरू ! ", निकिता तिला सॅल्युट करत म्हणाली.

ऋजुताची भरली भेंडी तर हातोहात संपली सुद्धा. सर्वांनी आणि विराजनेसुद्धा घेतली.

"ऋजू, मस्त झालीय ग भेंडी", निकिता.

"हो ना, बढिया", विराज भेंडी खाताना म्हणाला.


असे सर्वांना एकमेकांशी डब्यातले पदार्थ वाटून खात मजेने जेवताना बघून " जेवणसुद्धा सोबत जेवताना किती छान एन्जॉय करतात हे, आय रिअली मिस धिस. आम्ही तर जेवतानाही ऑफिसचेच  प्रॉब्लेम डिस्कस करत असतो अन फक्त आपापला डबा संपवतो. खूपच फॉर्मल असतं सगळं. ऋजुताने छान पायंडा पाडून ठेवलाय , संपूर्ण टीम एकत्र जेवण्याचा. त्यामुळे किती छान बॉंडिंग झालं आहे टीम मध्ये . अध्येमध्ये तरी आपल्या टीमबरोबर यायला हवे. तेवढीच चांगली बॉंडिंगसुद्धा राहील त्यांच्याशी आणि मी एन्जॉयही करेन ", विराजला वाटून गेले.

तेवढ्यात एकाने जेवण झाल्यावर आपला एक डबा उघडून सर्वांसमोर धरला.

"व्वा, स्वीट डिश सुद्धा आहे आज ! बघा विराज सर, तुम्ही आलात म्हणून आम्हाला स्वीट डिश पण मिळाली आज", प्रसाद.

"अरे वा! असे असेल तर नेहमीच येईन मी... तेवढीच मलाही स्वीट डिश मिळेल न", विराज हसून म्हणाला.

"हो ना, नेहमी कोणी ना कोणी काहीतरी छान आणतच असतं आमच्यामध्ये", प्रसाद.

जेवण आटपून काही वेळात सर्वजण आपापल्या जागेवर आले. विराजही केबिनमध्ये जाऊन कामाला लागला.

काही वेळात त्याने ऑफिसमधले आजचे काम संपवले . आणि मीटिंगच्या आधी थोडं शांतपणे बसावं म्हणून तो डोळे मिटून खुर्चीवर मागे टेकून बसला. तेवढ्यात काहीतरी आठवून त्याने त्या कालच्याच व्यक्तीला फोन केला.

"येतो मी संध्याकाळी ऑफिस संपल्यावर", विराज.

"ओके" , तो.

"शक्यतो रोजच येईन संध्याकाळी तासभर तरी. आणि सुट्टी च्या दिवशी सकाळी येईन", विराज.

"गुड, सी यू देन", तो.क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

संपूर्ण कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

🎭 Series Post

View all