

मुंबई ला मंगळागौर होती
मुंबई च्या मामी सीमा बरोबर बोलायच म्हणत.
पण ती आत्ता तिथे नाही.
म्हणून सगळे सीमाला बोलूच देत नसत.
अजून तीन आठवडे होते आत्ताशी लग्नाला आठच दिवस झाले होते अजून आठ दिवसांनी जो सोमवार त्या दिवशी सत्यनारायण, मग जेजुरी, तुळजापूर अक्कलकोट करणार होते
मंगळवारी, पप्पा साधना बाईंना म्हणाले, "करा यादी सामान आणायचं, मुली शोधल्या का
साधना बाई गर्वाने म्हणाल्या,"कशाला मुली शोधायच्या, श्यामलच पाचव वर्ष आहे, जयश्री आहे सुचेता आहे माईच सातव वर्ष आहे पण मग सांगू, तिचं वाढवा वर्ष नाही केलं म्हणून ती बसेल आणि संगीता आहेच की तिला बसवायच झालं काय त्यात
आणि मग आई, ते मंगळगौरीला मुलींना प्रेझेंट द्यावं लागेल, श्यामलंच म्हणाली
तस दामोदर राव म्हणाले,"ते नवरा बायको ठरवतील आत्ता आपण सत्यनारायण ठरवत आहे, श्यामल
पपा बोलत होते की नितीन आई आई करत रडत आला
श्यामलने घाईने बाटली दुधाने भरली
आठ वाजून गेले होते
सारंग अजून आला नव्हता
सुजय आला होता
भिंतीजवळ श्यामल नितीनला घेऊन झोपली नितीनने बाटली तोंडाला लावली आणि श्यामलचे ओठ चुरगळायला सुरु केलं
काही वेळात दूध संपलं असत
पण श्यामल म्हणली झोपेल आता तो
सुजय लगेच म्हणाला, "झोपव मग त्याला
मम्मी म्हणाल्या,"महाराणीना हाक मारा, म्हणजे, त्या पोळ्या करतील
आता सारंग पण नव्हता आला
सीमा आलीच नाही खाली
सारंग साडे दहा वाजता आला
सीमा आली
दोघांनी बघितलं
तर फक्त दोन पोळ्या घरात शिल्लक होत्या
तो काही बोलणार इतक्यात, बेबी आत्या आत मिश्री थुंकायला आली आणि म्हणाली
"बाबा तुझ्या बायकोने, आई बाबा समोर कबूल केलं पण तिने ना भांडे घासले ना पोळ्या केल्या तिच्यासारखी निर्लज्ज कुठे बघितली नाही बाव
सारंगने दोन ताटात चटणी पोळी घेतली आणि म्हणाला
"उद्या पासून हजर व्हायचंय ना, तुझ्या पुरतं डबा करून घेऊन जात जा, मला जर नाही बनवल जेवण तर मो खानावळ लावेल
आजपण सीमा आणि सारंगने दूध प्यायला. स्वप्ना सीमाला म्हणालीच होती की ताई तुला उपाशी ठेवरील हे फराळाचं, हा खाऊ चल सगळे वर घे खा, नीट ठेव कारण मंजू ताईचा बघितलं होत आम्ही.
त्यामुळे सीमाला भूक भागलीच होती
सीमाचे आईवडील येऊन गेले
त्यांनी काही खायला प्यायला नाही आणलं याचा उद्धार रोजच व्हायचा.
सीमानव आईला सगळे सांगितले होत. आई पण नवल करत रहायची अशी माणसं असतात?
सीमाला लायब्ररी मेंबर शिप मिळाली तिने मठात जायची आणि येताना पुस्तक आणायची. तिला ते काका म्हणाले,"बाळ तुला काय हवी ती पुस्तक ने बेटा काही प्रॉब्लेम नाही. आठवड्यातून तीनदा जरी बदललं तरी हरकत नाही
स्वप्ना होती तर ती आणायची पुस्तकं.
श्यामल सीमाचं ज्वेलरी बनवणं वगैरे बघायची
पण नोकरी करत होती ना
अखेर मंगळगौरीच्या कार्यक्रम ला, फक्त सुजय श्यामल, सारंग सीमा आणि साधना बाई इतकेच जातील असं ठरल
सत्यनारायण किराणा यादी श्यामलने बनवली
त्यात डालडा तूप लिहिल होत
सीमा विचार करत राहिली
कितीतरी वर्ष झाली आपले वडील, दर पौर्णिमेनिमित्त सत्यनारायण करताय, पण आई एक किलोचा प्रसाद तुपावर तर चांगल्या तुपावर करते, शिवाय, काजू बदाम, मनुके दूध असत. इथे म्हणजे वेगळंच आहे
शिवाय मेन्यू जेवणाचा म्हणजे नैवेद्य पुरतं पुरण, फक्त, जेवताना नाही वाढायच
सीमा समोर माणसे मोजली गेली
शेजारचे दहा जण
माई कडचे नऊ जण
बाळा काका कडचे, चार जण एक बाळ
मुकुंद कडचे कोणी नव्हतं येणार
पप्पा म्हणाले,"मी प्रभाकर आणि राम ला पण सांगणार आहे.
संगीता, सुयोग पूजा आणि वाड्यातले गल्लीतले
एकूण सत्तर धरले
अगोदर शारदा बाईला सैपाकच कॉन्ट्रॅक्ट द्यायच ठरल
पण
तिने एक किलो पुरण दोनशे रुपये
ताट शंभर रुपये जितके होरील तितके ताट मोजणार ते शिवाय
ताट घासून वगैरे नेणार सगळे त्यांच्या ते आणणार
आता खर्चाचा विषय निघाला
सुजय लगेच म्हणाला
दहा हजार होतात मी मय म्हणतो सारंग कडून घ्या, दहा हजार ठरवा
भडकला सारंग
सुज्या, बायकी बुद्धी नको चालवू,तुमचा सत्यनारायण तरी केला का, जागरण गोंधळ होऊ दिला नाही तू का लगी रात्रीच लग्न होऊन आलं की
समोरासमोर खोल्या असल्यामुळे सगळे ऐकायला जायच
ऐकत नव्हता सुजय अजिबातच
बेफाम ड्रिंक करून आला होता
श्यामल नको म्हणत होती तरी
आणि लगेच मग दिवसच राहिले...
श्यामल आणि सारंगची क्षणकाल नजराणाजर झाली पण सारंग भडकून म्हणाला
"मी इतके दिवस कंट्रोल केलं आणि कोणाला जर वाटत असेल ना की सीमाला आणि मला एकत्र येऊ दिल नाही तर मी तिला टाकेल, तिला सोडेल गैरसमज आहे कळल
आत्ता पण ती सकाळी पस्तीस पोळ्या करून जाते, स्वतः सोबत फक्त तीन पोळ्या नेते
तरी घरी आल्यावर भूक लागली तर, खायला पोळी नसते तिला, रात्रीचे भांडे घासते तर दुसऱ्या दिवस पर्यंत माझा दुधाचा ग्लास आणि ताटली कोपऱ्यात पडलेली असते काय लग्न झालं की मी अस्पृश्य आहे का काय संगिते, माझं लग्न झालं की भांडे बंद घासायचे, पोळ्या बंद करायच्या
पण लक्षात ठेवा माझ्या बायकोची नोकरी सुटली ना माझ्या इतकं वाईट कोण नाही
सीमा बोललीच नाही
संगीता चिडून म्हणाली
पण ती काही म्हणत नाही ना सारंग
काय करेक म्हणून तुम्ही तिच्या आई बापासमोर कबूल करून घेतलं आणि संगिते नाक ए ना या सुज्याच्या गोष्टीत खुपसयच कळल ना, हा, माझ्या गोष्टीत खुपसलं की ठेचेल मी आणि टांग अडवली तर डोक्यावर पाडेल
आम्ही गप्प बसतो तर जास्त करायला लागले, सीमा उद्या पासून भांडे घासायचे बंद कर, रोज आपले दोघांचे कपडे धुवायचे आणि लक्षात ठेव, कळल ना मी सांगतो तस नाही केलं ना बापाच्या दारात सोडेल नेऊन तुला.
असं म्हणून तो नितीनला उचलून बाहेर नेलं.
बेबी कुत्सित पणे म्हणाली,"आत्ता शुद्धीत आहे म्हणून आपल्याला शिव्या दिल्या
श्यामल म्हणाली, "पिऊन आले की सीमाला देतील, करु की आपण तस..
सगळ्या तस ठरवायला लागल्या.
समिधा.
ही कथा मधील पात्रे, विचित्र आहे असं एक वाचकच मत आहे
पण
ही एक पूर्ण पणे सत्यकथा आहे
घरगुती हिंसाचार मध्ये आमच्या मॅडम पी एच डी करतात, मी नेट पास आहे, त्यामुळे रिसर्च असिस्टंट म्हणून फेलिशिप आहे मला, आम्ही केसेस बरोबर चर्चा करतो आणि त्यांना काय अनुभव आले तर सांगायला किंवा लिहायला लावतो
तीन हजार डायरीज एकट्या आमच्या गावातून जमा झाल्या
आम्ही त्या स्टडी केलेल्या
टोटल पाच लाख डेटा कलेक्ट केलेला आम्ही
असे अजून इतकत केसेस आणि यापेक्षा विचित्र लोकं आहे
विद्या वहिनी व सरिता काकू, ही माझी आगामी व्यक्ती चित्रण मालिका वाचून बघा यापेक्षा भयानक परिस्थिती आहे त्यांची
तरी मी फक्त नाव लिहिते कोणाचही आडनाव लिहिल नाही
तेही कोणी दुखावलं असेल तर क्षमा करावी ?