

कितीवेळ तरी सीमा रडली
स्वप्ना तिची समजूत काढत म्हणाली
"जाऊ दे ताई माझं ऐक, आता उद्या मामा मामी आले ना की स्पष्ट बोल आणि काय आहे हे जसे सगळे आहे ना तशी तू रहा सगळ्यात महत्वाचे, फक्त आणि फक्त सारंग भाऊजींचा ऐक "
सीमा ने डोळे पुसले आणि म्हणाली
"आज प्यायला होता म्हणून तो बेबी आत्याला असं म्हणाला नाही तर काल मी मशीनवर टॉवेल विसरला म्हणून वर आले
तू गेली होतीस वर पण मी ऐकलं. तो बेबीला म्हणत होता सकाळी
की
काळजी नको करु बेबी बघू आपण मी सांगेल, सरांना तुला साडी दे,कसली ग ही घाणेरडी प्रवृत्ती, माहेरी रहायचं, अगं काल तिच्या नवऱ्याचा फोन आला, आमच्या लग्नासाठी म्हणून राहिली ही बाई आता महिमा झाला
संगीता तर इथे च आहे, ती माई पण आहे च मला तर वाटत, स्वप्ना, उगच जॉईन फॅमिली बघितली बाई, इतक्या बायका आणि सासरे तर तुला माहिती सिगरेट ओढतात मला संजय म्हणाला, की त्या दुकानात तो रिचार्ज करायला गेला मेसेज पॅक मारायला व्होडाफोनच तर पप्पा सिगरेट ओढायला माचीस मागितली तर त्या बाईने पन्नास पैसे जास्त घेतले का तर रोज फुकट माचीस वापरतात, मग झाल्या तितक्या काड्या आणि हे तर संजयचा मित्र म्हणाला मी सांगू शकतो कुठल्या कुठल्या हॉटेल मध्ये बसलेले असतात
सारंग मोठ्याने घोरत होता
स्वप्ना हळूच उठली व तिने धार्यातून डोकावलं
तिचा अंदाज बरोबर होता
साधना बाई, खाली उभ राहून दोघीना म्हणत होत्या
"काय बडबड करते कोण जाणे?",
बेबी म्हणाली,"वहिनी मला ही नादिष्ट वाटत्व, तालातच असते
माई म्हणाली,"मम्मी जप बरं का, काही बोलेल फटकन मागेल तर देशील लगेच
संगीता म्हणली,"मला तर वाटत, अर्धवट आणि वेड्सर आहे, ही मुलगी "
सुजय पण ड्रिंक्स केलं होत
श्यामल त्याला म्हणाली, "जय मी म्हणलं तिला काम वाटून करायचे तर मला स्पष्ट म्हणाली मी हाताने कपडे धुणार, आणि दोघांचेच धुणार,"
तस सुजय म्हणाला
"साऱ्याच डोकं ऑफिस मध्ये कस खराब करायच मी बघतो, हिच तू खराब कर कसली नोकरी ना लाथ मारून हाकलतील असं कर घरात. मी संगीताला सांगतो",
श्यामल काय बोलली सीमाने स्वतः ऐकलं
पण. तिला माहिती होत की, या सगळ्या एकत्र आहे
आपण एकट्या पडणार
दुःख असं दाटून आलं सीमाला
परत वर आली
रविवार होता
श्रावणातला रविवार होता
सीमा सोडली तर कोणीही लवकरच उठलं नाही
सीमाच्या वडिलांचा काकांनी सांगितलं होत
ते दहा वाजता आले
साधना बाई अजून अंथरुणात होत्या
शेजारी दामोदर राव
आत संगीता आणि बेबी बसल्या होत्या
सीमा बाहेर आपलर कपडे वाळत घालत होती
पूजा म्हणाली मामा लोकं रविवारी अकरा वाजता उठतात मामी पण नाही उठत
दहा वाजता पूजा म्हणाली ही मामी का लवकरच उठते कोण जाणे
सीमाच्या बाबांनी दारातून ऐकलं
"लोकांच्या झोपा मोडायला दुसरं काय स्वतः घरात बसून आयते तुकडे तोडायचे काय समजणार कष्ट काय असतात पैसे कसे मिळतात
आता सीमाच्या आईला मोबाईल मिळाला होता तो तिने बाबांना दिला आणि खुणावलं बोला
नुसतं
तस बाबा म्हणाले
"अरे ते नरेंद्रजी, तुमच्या घरात अजून झोपच चालल्यात. अरे सगळे कामाचे लोकं आहे, आम्ही काय, रिकामटेकडे, आमची मुलगी फुकट तुकडे तोडती इथे जाऊ दे चल निघतो आम्ही कशाला यांच्या झोपा पहाटे पहाटेच साखर झोपा मोडायच्या ठीक आहे, ऑर्डर काढली की दे पोस्टाने पाठविवून निघतो आम्ही
पण
शेजारच्या जयश्रीने हाक मारली नाईलाजाने सीमाचे आई बाबा तिकडे गेले
इकडे सुयोग वर जाजन मोठ्याने ओरडला
मामा मामी म्हणाली उठ, तिचे आईबाबा आलेत
सुया ओरडू नको फोडून काढीन तुला सारंग चिडून ओरडला
सीमा गचचीतून केस पुसून आली
सारंग ओरडला
ए तुझ्या बाबाला सांग रविवारी तरी जावयाला सुखाने झोपू देत जा म्हणावं आठवडा भर मरतोच नामी
इतक्यात दामोदरराव पण खालून हाका मारायला लागले
चडफडत सारंग उठला चिडून मागच्या जिन्याने आला
आता
पप्पा ममी, सगळे उठले
बेबीने चहा दिला सीमाच्या आईला
तिने विचारायचं म्हणून विचारले
कशा आहे बेबी आत्या
लगेच बेबी म्हणाली
"जायचंय पण सारंग म्हणाला रहा सोळा दिवस मग सत्यनारायण झाला की जा नाही तरी तुमच्याकडून मला साडी मिळालीच नाही आहे ना म्हणलं आलं लक्षात तर द्याल नाही का तुम्ही
सूचकपने आईने बाबांकडे बघितलं
असं की मी म्हणलं नव्हतं
कारण बेबीची आणि मोठया मामीच्या मनाच्या साड्या अनुक्रमे झालीला बसल्यावर सुचेता आणि जयश्रीला दिल्या होत्या
आता सारंगला बाबा म्हणाले
, "ते सीमाला तासिका तत्व वर....
आता श्यामल आलेली होती
सुजय पण सोफ्यावर बसला
कसे आहे काका तुम्ही श्यामल पाया पडून म्हणालक
तस समजलं दात पण नाही घासले
11.15 वाजून गेले होते
आता सुजय म्हणाला
बेबी पोहे कर आपल्याला
बाबा आणि आई म्हणे नाही निघतो पोर आई घरीच आहे
पण पोहे खायला लागले
शिवाय सीमा कडून तिच्या आई वडिलांसमोर कबूल करून घेतलं
एकवेळ भांडे, एक दिवस धुणं, आणि सकाळी संध्याकाळी पोळ्या इतकं करायच
बाबा म्हणाले,"बरं झालं सीमा, तू आली गड्या लग्न करून नाही तर पोळ्या भाकरी कोणी केल्या असतंय ना घरात दोन टाइम एक टाइम भांडे, एक दिवस सगळे धुणं, मी आपल्या बेबी मावशीला म्हणलं, तिघाच असलो तरी काम नका सोडू बरं झालं आमच्यकडे बेबी मावशी आणि इथे सीमा चल, निघू उद्या पासून जा सीमा तुझ्या मंगळगौरीला रजेचे अर्ज दे उद्या गेली की
तस आठवलं
मुंबई ला जायचंय
आईने आपल्या गच्च भरलेलंय प्लेट्स काढई मध्ये रिकाम्या केल्या
तिथले भांडे वगैरे घासले
संगीता म्हणाली,"राहू द्या काकू ",
तस आई म्हणली,"माझ्या मुलीचं काम हलक केलं नाही तर उद्या शाळेतून आल्यावर तिला आमच्या या ताटल्या घासाव्या लागल्या असत्या
आता सीमाने आईला कुंकू लावल
साधना बाई माग गेल्या होत्या
संगीता आणि बेबी व श्यामल सुजय आणि सारंग पण शेजारी बसले होते
बाबा घरी आल्यावर आपल्या आईच्या हातात डोकं टाकून म्हणाले
"फसलो ग आई कसले लोकं आहे आई श्रावनातल्या रविवारी अकरा वाजता उठतात आणि माझं लेकरू सहा वाजता उठत
जावई तर बोलला नाही आमच्याशी
आणि
तिथे त्या बेबी ते त्यांच्याशी गुलीगलू बोला
आजी म्हणाली,"आता जाऊ दे बरं कळल का बाळ, आता विचार नको तुला तेव्हा सगळ्यांनी सांगितलं
मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे असल्या बायल्या घरात मुलगी देऊ नको पण तुला वाटत आपली मुलगी वेडी आहे...
सीमा आईने आणलेली बॅग कपाटात ठेवली होती
परत आईने घरातल पण ज्वेलरी च सामान दिल होत पैसे दिले होते आणि खाऊ भरपूर दिला होता, फरसाण चकल्या जिलेबी सीमाने छोट्या पिशव्या काढून ठेवल्या, बाकी सगळे वर कपापाटात ठेवलं
विचारच करत राहिली
उद्या शाळेग शिकवायला जाताना कोणती नेसावी साडी...
समिधा