Jan 22, 2021
कविता

झुरुमुरु पाऊस

Read Later
झुरुमुरु पाऊस

झुरुमुरु पाऊस झुरुमुरु पाऊस
नको दूर जाऊस नको दूर जाऊस

रानभर टपटप वनभर टपटप
पाखरांची लगबग वासरांची पळपळ

पाचुंची लयलुट मोत्यांची लयलुट
वाऱ्याची झुळझुळ फाद्यांची सुरसुर

सरींची सरसर लयीत झरझर
विजेची कडकड मेघांची गडगड

पानांची थरथर पाण्याची सळसळ
मनाची तगमग दिलाची धडधड

बिजली थडथड एकसुरी कडकड
मनात काहुर डोळ्यात पाऊस

धोधो पाऊस धोधो पाऊस
नको दूर जाऊस नको दूर जाऊस

------सौ.गीता गजानन गरुड.