Login

स्वप्न कि समज

Women Never Independent.
मला एक मुलगी आहे. ती आत्ता फक्त ढीड वर्षाची आहे. मला आत्ता तिचा फुचरचा सारखा विचार येतो. तिचा साठी मी lic पोलिसी कडून ठेवली आहे मग sip करून ठेवला आहे. अजून कुठे काय काय करू शकते तिचा साठी. तिचा लाईफ व्यवस्थित करून ठेवाचा आहे. तिचे स्वप्न ती पूर्ण करू शकते. जसा पाहिजे तसा जगता यायला पाहिजे. उद्या कोण समोर हाथ पासऱ्याला नको. आजच युग बघून काय विचार करू शकतो.
पण काल रात्री ला एक विचाराने झोपून नाही दिला. तो असा कि मी इंटरकास्ट मॅरेज केला. त्या माझा लग्न ला 7 वर्ष झाली. पण अजून सुद्धा माझा सासूला मी आवडत नाही. ती अजून सुद्धा मला किचन मध्ये फक्त भांडी घासण्यासाठी जाऊन देते आणि माझा जाऊला सगळ स्वयंपाक शिकवला, ती समे कास्टची आहे म्हणून. मी गव्हर्नमेंट जॉबला आहे. चांगला पैसे कामावते तो सगळ पैसा घरात घेतला जातो. सेविंग प्रकार आहेच नाही ह्या घरात. धीर आणि जाऊ घरीच असतात पण सासू त्याचे खूप लाड करते. सासूला खुश ठेवाचा खूप प्रयत्न करते. आमचं आयुष्याचे निर्णय तीच घेते. मला कोणाला दुखवता येते नाही. प्रेम विवाह केला म्हणून मी स्वतः ची गुनेगार झाले का? का आई बाबांनी ठरवल्या मुला सोबत लागेल केला असत तर सुखी असते का?
उद्या माझी मुलगी पण मोठी होईल. तिचे पण स्वप्न असतील. तिचा करिअर असणार आहे. पण हे सगळ काय साकार होईल का? मी माझे स्वप्न वि आकांक्षा सगळे सासू आणि नवऱ्या मुळे धुलीत मिळून गेले. तिचा पण हेच होईल ना. कारण आज पण मुली स्वातंत्र्य नाही आहे. तिला शिक्षण देऊन काय होईल का? उद्या माझे सासरचे तिचा लग्न लावून देणार मग काय मुलं आणि चूल तेच माझा नशिबाचा चक्क तिचा कडे जाईन.

मला खरंच कळत नाही मी काय करू?