Mar 01, 2024
वैचारिक

द्रौपदी वदते जेव्हा..

Read Later
द्रौपदी वदते जेव्हा..

            द्रौपदी शब्दाचा अर्थ आठवला की काय विचार येतात तुमच्या मनात ? महाभारताला कारणीभुत स्त्री..

पाच पुरूषांची पत्नी.. असे की

एक निर्भय अग्निशलाका असे ? 

महाभारतातील पात्र, घटना खऱ्या होत्या अशी वैज्ञानिक पुष्टी कुठेही मिळालेली नाही. तरीही आपण वर्षानुवर्षे महाभारत पाहत आहोत. लहान असताना दूरदर्शनवर लागणारी ‘ महाभारत ’ ही मालिका आपण सर्वांनीच पाहिली आहे. अनेक पुस्तकं, मालिका यांतून महाभारत हे कौरवपांडवांना केंद्रित ठेवून लिहिण्यात आलेलं आहे. अशा वेळेस मला वाटलं की कदाचित आपण द्रौपदी च्या दृष्टिकोनातून थोडं लिहिलं तर.. ? अर्थातच ते वावगं ठरणार नाही ना ? महाभारतात प्रत्येकाचा दृष्टिकोन काही वेगळा असेल. तसंच द्रौपदीचाही काही वेगळा दृष्टिकोन होता असेलच ना ? मी वाचलेली द्रोपदी एक निर्भय परखड व्यक्तिमत्व आहे. जिने वेळप्रसंगी नवऱ्यांना आणि साक्षात मार्गदर्शक कृष्णाला,भीष्म पितामह ह्यांना प्रश्न विचारले आहेत.


कधी कधी प्रश्न पडतो जर व्यासांनी तिला अजुन मुक्त लिहलं असतं तर ? तिने अजुनही प्रश्न विचारले असते प्रत्येकाला. काय असते तिचे प्रश्न .तिची घालमेल हेच कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न ह्या सिरीजमध्ये करतेय.कुणीही ह्याला चुकीच्या अर्थाने घेऊ नये. तर ह्यातुन द्रौपदीचा चरित्रपट मांडण्याचा अल्प प्रयत्न आहे. यात कोणताही मुद्दा खरा आहे किंवा असंच घडलं असेल हा मांडण्याचा प्रयत्न नाही. हा केवळ एक काल्पनिक दृष्टिकोन आहे ह्याची नोंद घेऊनच सिरीज वाचावी ही नम्र विनंती. 


______________

क्रमशः. 


(प्रिय वाचक, 

थोडा वेगळा विषय आहे. तुमचा सपोर्ट अपेक्षित आहे.

टीप :- यामुळे obsessed चे भाग उशिरा येणार नाहीत. हा ड्राफ्ट आधीच लिहिलेला आहे. 

वाचून एक दोन शब्दांत का असेना नक्की कळवा कशी वाटतेय सिरीज. ) 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//