Dr. Nikola Tesla

निकोला टेस्ला....पुढच्या शतकातला विचार करणारा एक हुशार, तेजस्वी पण सनकी शास्त्रज्ञ! जगातील सगळ्?

निकोला टेस्ला....पुढच्या शतकातला विचार करणारा एक हुशार, तेजस्वी पण सनकी शास्त्रज्ञ! जगातील सगळ्यात श्रीमंत देशातला एक अवलिया! एक असा शास्त्रज्ञ, ज्याने इतकं उत्तम कार्य करून ठेवलेलं आहे, जे आजही आपल्याला अगदी रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतंय, त्याच्याबद्दल बऱ्याच जणांना 'एक सनकी शास्त्रज्ञ' हे सोडता फार काही माहितीच नाहीये!  

एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती विस्मयकारक आणि चढउतारांनी भरलेलं असावं आणि शेवटी त्या व्यक्तीची हुशारी तिच्या उध्वस्त होण्याचं कारण व्हावं....

टेस्लासारखी आसामी शेकडो वर्षांमध्ये एखाद्यावेळी जन्माला येते परंतु तिचं कार्य मात्र शतकानुशतके टिकून राहतं!

आज एकविसाव्या शतकातल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगती मध्ये डॉ.निकोला टेस्लाचा सिंहाचा वाटा आहे.

Death rays, Remote Control via radio control, Electric Motor via Induction Motor, Tesla Coil (High Voltage-Low Current-High Frequency), Robotics, Radio, Tesla Tower (Wireless Communications), X-Rays, Fluorescent Bulbs

इतक्या अनेकाविध क्षेत्रातलं त्याचं संशोधन आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतरही स्वतः त्यातून कुठलाही मोबदला न घेता पुढल्या संशोधनात स्वतःला गुंतवणारा खराखुरा संशोधक म्हणजे डॉ.निकोला टेस्ला!

सुरुवातीला ज्याच्या कंपनीमध्ये आपल्या संशोधनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली त्या एडिसन सोबत नंतरच्या काळात अनेक बाबतीत झगडावं लागलं आणि यामध्ये त्याच्या पाठीशी उभा राहिला जॉर्ज वेस्टिन्गहाऊस. एडिसन आणि त्याच्या पाठीशी उभी असणारी जनरल इलेकट्रीकल्स नावाची कंपनी एडिसनच्या डीसी करंट (DC Current) च्या प्रसारासाठी बरेच प्रयत्न करत होते आणि धंद्याच्या दृष्टीने यशस्वीही ठरत होते. वीज तयार करणे आणि वापरणे हि त्याकाळी घडलेली किंबहुना एडिसनने घडवलेली खूप मोठी घटना होती पण यामध्ये एक मोठी अडचण होती.

DC Current चा प्रसार आणि घरोघरी वापर हि कठीण गोष्ट होती आणि त्याचं कारण म्हणजे हि वीज एका जागेवरून दुसरीकडे नेण्यासाठी मोठ्या म्हणजे तुमच्या दंडाएवढ्या मोठ्या केबल्स ची गरज असायची, एका पॉवर स्टेशन मधून केवळ एक मैल अंतरापर्यंतच हे विद्युत वाहन करता यायचं आणि त्यात भर म्हणजे याच वाहन करताना आणि प्रत्यक्ष उपयोग  करताना त्यातून धोकादायक स्पार्क्स होत असत, या अशा गोष्टींवर तोडगा काढून हा धंदा वाढवण्यात एडिसन मग्न होता आणि याच वेळी एडिसन च्या कंपनी मध्ये टेस्ला काम करण्यासाठी रुजू झाला.

वालडॉर्फ मधील रोज रूम मध्ये एका रात्री एकोणसाठ वर्षाचा एक माणूस मृतावस्थेत आढळून आला.गेली अठरा वर्ष तो त्याचं खोलीत राहत होता,त्या खोलीतील त्याचं टेबलवर बसून जेवत होता आणि विशेष म्हणजे खिडकीत येणाऱ्या कबुतरांशी गप्पा मारत होता.त्याचं वय त्याच्या डोळ्यातून जाणवत होतं! त्याची सगळी निराशा त्याच्या डोळ्यात दाटलेली होती.त्याच्याकडं बघून तो इतकं विस्मयकारी आयुष्य जगला असेल हे कुणालाही पटलं नसतं!

या सनकी पण अत्यंत हुशार अवलियाबद्दल जाणून घेण्यासारखं बरंच काही आहे जे आपण येणाऱ्या काळात करूच!

🎭 Series Post

View all