दोष कुणाचा तिचा..त्याचा की परिस्थितीचा.? भाग 2

Dosh kunacha

दोष कुणाचा तिचा... त्याचा की परिस्थितीचा .?

भाग 2

क्रमशः भाग 1

मुक्ता घरी गेली, तिने सुमितला मॅडमचा निरोप दिला.

चार-पाच दिवसात सुमित डॉक्टरांकडे गेला.
“बसा.. तुम्हाला मुक्ताने सर्व सांगितलं असेल.

“नाही..नाही तिने काहीच सांगितलं नाही.

“तुमची पत्नी मुक्ता एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह आहे, माहिती आहे तुम्हाला?"

“नाही..डॉक्टर." लांब श्वास घेत तो बोलला.


“ओके... मग मला आता सगळं खरं काय आहे ते सांगा...”

“मॅडम मी एच.आय.व्ही.पॉझिटिव्ह आहे.. आणि हे मुक्ताला आणि तिच्या घरच्यांना माहीत आहे.

आमचं साखरपुडा झाल्यानंतर मी तिच्या घरी सगळं सांगितलं, त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता त्यांनी निमूटपणे लावून दिल लग्न.
डॉक्टर संताप व्यक्त करत.
“तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंत, एका निष्पाप मुलीचं आयुष्य उध्वस्त केलंय, आणि आता त्यात तो निष्पाप जीव.. तो तर या जगात आलाही नाहीय.
आता तुम्ही एकटे का आलात तिला का आणलं नाही...असो.. तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन उद्या पुन्हा या...निघा आता."

सुमित तिथून निघून गेला..डॉक्टरांच्या मनातले मुक्ता विषयीचे विचार जात नव्हते...
'अस काय झालं असेल की सगळं माहीत असूनही मुक्ताने लग्नाला होकार दिला असेल.'

पंधरा दिवसानंतर मुक्ता एकटीच दवाखान्यात गेली.
“मॅडम येऊ का?"

“ये मुक्ता... तुझा नवरा नाही आला सोबत?”
“नाही मॅडम.. तो कामाला गेलाय मी एकटीच आली.”
“ठीक आहे बस... घे पाणी घे.”

“नाही मॅडम.. मी बरी आहे."

“मुक्ता आता मी तुला जे काय विचारणार आहे, त्याची नीट विचार करून उत्तर दे. तुझा नवरा पॉझिटिव आहे हे तुला लग्नाआधी माहित होतं?..” 
मुक्ता शांत बसून होती..
“मुक्ता अस शांत बसून नाही चालणार.. काय झालंय सांग मला.. तुला सगळं माहिती असूनसुद्धा तू हे पाऊल का उचलले?..का स्वतःचा जीव धोक्यात घातलास? याच कारण मला कळायला हवं. बोल मुक्ता."
 
 डॉक्टरने मुक्ताच्या खांद्यावर धीराचा हात ठेवला, तिच्या जवळ बसल्या. मुक्ताला धीर वाटला आणि तिने मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
 मुक्ता ढसाढसा रडायला लागली, खूप रडल्यानंतर ती थांबली. डॉक्टरनी तिला पाणी दिलं, तिला शांत केलं त्यानंतर मग मुक्ताने बोलायला सुरुवात केली.
 
"मॅडम आमची परिस्थिती खूप हलाखीची होती. चार बहिणी आणि एक भाऊ, आई-वडील असा सात जणांचा कुटुंब..बाबा हमालीचे काम करायचे आणि आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन जाऊन कपडे- भांडे करायची... त्याच्यावरच आमचं घर चालायचं...
कित्येक रात्री आम्ही उपाशीच काढल्या, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मी शिकू शकले नाही, दहावी झाले त्यानंतर घरच्यांनी माझे शिक्षण बंद केले, शिक्षण अर्धवट राहील.
 
 
घरात मी मोठी असल्यामुळे पोरगी दहावी झाली आता तिचं लग्न लावून देऊ या विचाराने त्यांनी माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली..
 दोन-तीन स्थळ आल्यानंतर सुमितच स्थळ आलं... सुमित कामाला आहे, घरदार चांगल आहे, शेती चांगली आहे, असा विचार करून घरच्यानी माझं लग्न पक्क केलं, साखरपुडा झाला...
 
 
 त्यानंतर सुमित आणि त्याच्या घरच्यांनी माझ्या घरच्यांना सगळं सांगितलं.
 
सुमित वाईट धंद्याला लागला होता त्यातूनच त्याला हा रोग झाला,  ही गोष्ट त्याने आधी नाही सांगितली साखरपुडा झाल्याच्या नंतर सांगितली मला यातलं काहीच माहिती नव्हतं.

क्रमशः

🎭 Series Post

View all