फार काही नको..

Love Poem


फार काही नको...
फार काही नको...
सुकलेला मोगरा हवा..
आठवणीत तरी रमता येईल......
फार काही नको...
गंधाळणारी बकुळी हवी...
मनाच्या कुपीत जपता येईल.......
फार काही नको....
खिडकीतला निशीगंध हवा....
रात्री मनाला मोकळ करता येईल....
फार काही नको....गं
थोडा तुझ्या हृदयाचा कोपरा हवा...
तुझ्या जखमांना मलाही बिलगता येईल......
बस् फार काही नको....!!


कु.हर्षदा नंदकुुुमार पिंंपळेे