कुछ ना कहो (भाग ११) नवी कोरी रंगतदार कथा

कुछ ना कहो


कुछ ना कहो ( भाग ११)

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कुठल्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)


पद्मनाभ तसाच पटकन घराच्या बाहेर पडला. रामच्या घरी जाऊन त्याने रामला बाहेर काढले, आणि दोघे फिरत फिरत बोलायला लागले. " तुझा झालेला आनंद तुझ्या चेहर्यावर दिसतो आहे पद्मा, काय झाले? "
" राम वीणा परत आली आहे. " पद्मनाभ.
"म्हणजे? अरे वीणा कुठून परत येणार ती घरातच तर होती ना?" रामला काही नीट उलगडा झाला नाही.
" अरे माझी छकुला वीणा नाही रे, माझी वीणा, जिच्यामुळे मला प्रेम म्हणजे काय हे समजले, जिच्यासाठी मी तळमळत होतो ती वीणा. " पद्मनाभ अती आनंदाने सांगत होता.
" कुठे? इथे, बेळगाव मध्ये? " राम ओरडतात जोरात.
" हो. तिलोत्तमाच्या मदतीला जी बाई येते ती दुसरी तिसरी कोणी नसून वीणाच आहे. " पद्मनाभने सांगितल्यावर राम आवाक होऊन त्याच्याकडे पहातच राहिला.
" तिला पाहिल्यावर मला काय बोलावे काही सुचलेच नाही. तिचे ही लक्ष नव्हते माझ्याकडे. " पद्मनाभ.
" पद्मा, किती लकी आहेस तू. अरे निदान ती तुला दिसली तरी. " राम म्हणाला.
" हं. पण आता पुढे काय? मला काहीच सुचत नाहीये. " पद्मनाभ.
" घाई करू नकोस पद्मा. सध्या तिला ओळखही दाखवू नकोस. तुला तिच्याशी बोलताना पाहिले तरी वहिनी तिला हाकलून देतील. मागच्या वेळी हीच ट्रेक आपण त्यांनी स्वयंपाकासाठी बाई लावू नये, म्हणून वापरली होती. पण आता तसे करून चालणार नाही. बिचार् या वीणाला कामावरुन काढून टाकतील वहिनी. पण तिची परिस्थिती कशी आहे कुठे माहिती आहे आपल्याला? तिला कदाचित खूप गरजही असेल कामाची. तेव्हा आता शांत हो. सावर स्वतःला. हळूहळू तिला वहिनीला विश्वास संपादन करू देत. मग बघू पुढे. " राम काळजीने म्हणाला.
" हो राम, मलाही आता सांभाळूनच रहायला हवे. मला आता वीणाचा ही विचार करायला हवा. आणि तिलोत्तमाला ही सांभाळायला हवे. तसे पण मी तिलोत्तमाशी प्रतारणा करणार नाही राम. जरी माझ्या मनात वीणाच असली तरी आता माझेही लग्न झाले आहे आणि वीणाचेही. वीणा माझे पहिले प्रेम आहे, तिला मी कधीच विसरणार नाही. तिलोत्तमा पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. तिला मी अंतर देणार नाही. मग भले आमच्यात नवरा बायकोच्या नाते नसले तरीही. " पद्मनाभ.
" काय? परत बोल पद्मा. " राम.
" हो. वीणाच्या जन्माच्या वेळी डोहाळजेवणाच्या वेळी ती जे काही वागली तेव्हापासून ती माझ्या मनातून पूर्ण उतरली. मी फक्त कर्तव्य म्हणून आणि वीणाची आई म्हणून पाहतो. ते सुद्धा माझ्या छकुलीसाठी, माझ्या लेकी साठी. ". पद्मनाभ.
" हे कसं शक्य आहे पद्मा? " राम.
" सगळे शक्य आहे राम. तुमच्या मनाचा निग्रह हवा. मी लग्नच करणार नव्हतो, तुला माहीत आहे. आव्वा आप्पांना बरं वाटावे म्हणून लग्न केले. पण मीही सुखी झालो नाही आणि आव्वा आप्पाही. तिलोत्तमाला मला अद्दल घडवायची होती. ती थोड्या प्रमाणात झाली. पण ती माझ्या मनातून उतरली. तिने माझ्या आव्वा आप्पांनी जी वागणूक दिली ती मी कधीच विसरू शकणार नाही. तिच्यामुळे आव्वा आप्पांनी गावाकडे जाऊन रहावे लागले. या वयात ही आव्वाला किती काम करावे लागते. " पद्मनाभ.
" हं. चला तुला भूक नसेल पद्मा, पण मला भूक लागली आहे. चल घरी जाऊ. तू पण जेऊनच जा. " राम.
"नको रे बाबा, घरी गेल्यावर मला परत जेवावे लागेल, छकुली थांबते माझ्यासाठी जेवायची. " पद्मनाभ.

… … … … … … …


हळूहळू वीणा आणि तिलोत्णमाचे चांगले जमू लागले. तिला कामाची खूप गरज आहे हे पद्मनाभला तिलोत्तमा कडून समजले. पद्मनाभ मुद्दामच तिच्याशी बोलणे टाळत होता. सुरवातीला ती फक्त धुणे भांड्याच्या काम करत होती. मग तिचे काम बघून तिलोत्तमाने तिला लोटून काढणे, लादी पुसणे ही कामे ही सोपवली. तिचे काम खूप व्यवस्थित होते, ती स्वतः खूप स्वच्छ आणि नीटनेटकी होती. तसेच तिचे कामही होते. त्यामुळे तिलोत्तमा आता वीणावर अवलंबून होती. आधीच कामाची सवय नसलेल्या तिलोत्तमाला वीणा सारखी बाई कामाला मिळाल्यामुळे ती खूप खूश होती. ती वीणावर सगळे काम टाकून निर्धास्त होत होती. बाकीच्या कामाबरोबरच ती कधीतरी पोळी भाजीही करू लागली होती. तिलोत्तमाची तब्येत ठीक नसली की ती वीणाकडून करून घेई. पोळ्या खाल्यावरच ते पद्मनाभला कळत असे. वीणा म्हणजे छकुलीला सांभाळायचे कामही वीणा आनंदाने करत होती. छकुलीही आता वीणाच्या खूप सवयीची झाली होती.

एक दिवस तिलोत्तमा वीणा म्हणजे छकुलीला घेऊन दोन दिवसांसाठी माहेरी तिच्या आईआप्पाकडे गेली. ती जाताना पद्मनाभसाठी स्वयंपाक करायची जबाबदारी वीणा वर सोपवून गेली होती. वीणा कामाला आली आणि घरात पद्मनाभला बघून घाबरली. मग पद्मनाभ मुद्दामच गाणे गुणगुणू लागला. " उपयोग शिकायत है के हम… . "
" ओळखले नाहीस मला? " पद्मनाभने वीणाला विचारले.
" वळखल की जी, तुमास्नी कसं इसरीन, तुमच्यामुळं तर वाईच लिवायला शिकलो नवं. आव्वा कुठं हायत जी. " वीणा.
" आव्वा आणि आप्पा गावाकडे असतात. " पद्मनाभ.
" तरीच, दिसल्ये न्हाईत हत. " वीणा
" तू आम्हाला ओळखतात हे तिलोत्तमाला सांगितले का? " पद्मनाभ.
" न्हाय जी. तसा काय नाही सांगितलं. " वीणा.
" तुझ्या बाईसाहेबांना आव्वा आप्पांनी आणि त्यांची माणसे नको आहेत. म्हणून आव्वा आप्पा गावाकडे आहेत. तू त्यांना सांगितले तू आम्हाला ओळखतेस, की तुला सुद्धा ती कामावरून काढून टाकेल. तू तिला अजिबात कळू देऊ नकोस की तू मला ओळखतेस. … … नाही ना सांगणार? " पद्मनाभ.
" नाय जी. म्या नाय बोलत. " वीणा.
" आम्ही आम्हाला खूप शोधले. आक्का कुठे गेली. " पद्मनाभने विचारले.
" आक्का गेली. रुद्राच्या दादल्याने मारलं तिला. " वीणा.
" अरे बापरे, फार वाईट झाले. चांगली होती तुमची आक्का. आणि तू एवढ्या लांब कशी आलीस? का तुझ्या नवर्या बरोबर आलीस? " पद्मनाभ.
" ते लई मोठी कहानी हाय. नसीब माझं." उसासा टाकत वीणा म्हणाली आणि तिचे काम करायला लागली.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all