Feb 24, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

दोन ध्रुवावर दोघे आपण...

Read Later
दोन ध्रुवावर दोघे आपण...


इकडे मी न् तिकडे तू
असं कुठंवर चालायचं
तुझ्या संगतीने हे सारं
आयुष्य व्यतीत करायचं

जीव गुंतला तुझ्यात
कसं समजाऊ त्याला
सांग ना मी तुझ्याशिवाय
काय अर्थ या जगण्याला

तू दिसे अवतीभवती
माझा श्वास आहेस तू
असं अचानक सोडून
दूर कधी नको जाऊस तू

तुझ्या मिठीत हरवून,
प्रेमात आकंठ भिजायचं,
प्रेमाचं बीज होऊन मला,
तुझ्या मनामध्ये रुजायचं.

तुझ्याविना आता करमेना,
विरहाची कल्पना करवेना,
भास होती तुझे सदा,
भेटीची आस लागली मना.

सौ. पल्लवी स्वप्निल ढवळे
इचलकरंजी, कोल्हापूर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

@swapallu

Blogger

✍️Intention is very important in every action in my life ✍️

//