Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

दोन ध्रुव...

Read Later
दोन ध्रुव...

कवितेचे नाव = दोन ध्रुव...

कवितेचा विषय=दोन ध्रुवावर दोघे आपण 

राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी -2भरलेल्या डोळ्यांनी
बघत होते मी त्याला
मनात हसत डोकावून
बघत होता तो मला...

ओघळणारे टिपूस
मी अलवार सावरले,
मनाच्या जखमेचे बांध
मनातच घट्ट आवरले...

मन वाळवंट बनून
चिता त्याची बघत होतं,
आणि ओल्या डोळ्यासमोर
प्रेत त्याचं जळत होतं...

सांभाळणारा तो मला
अर्ध्यात डाव मोडला,
ऐन तारुण्यातच त्याने
माझा हात असा सोडला...


प्रेम मनी साठवून चढवेल 
आता त्याच्या फोटोवर हार,
दोघेही सोबत असू मनाने
पण दोन ध्रुवांच्या पार...
पण दोन ध्रुवांच्या पार...

✍️पल्लवी चरपे

टीम = अहमदनगर 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//