Feb 24, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

"तू माझा श्वास"

Read Later
Pestराज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी 2
कवितेचा विषय_ दोन ध्रुवांवर दोघे आपण
कवितेचे नाव_" तू माझा श्वास"


भरलेल्या डोळयांनी
आतुरतेने वाट पाहते
कधी यायचा माझा साजन..
एकच सल हा उरी राहतो
दोन ध्रुवांवर दोघे आपण

आज समजला तु नसताना
शब्धाविन हा भाव मनाचा
प्रेम तुझे आहे माझ्यावर
हवा का विचार जगाचा?

आठवण येते राया तुमची
विरह असा हा छळतो
तुम्ही असावे सैदेव सोबत
भाव एवढा कळतो

तुझ्या विना छळे दुरावा
अश्रू माझे हाच पुरावा
तूच असावा जवळी माझ्या


सणवार ही सरले सारे
भेट आता होईल ना रे
तुझ्या माझ्या दुराव्याची
वाट ही संपेल का रे

तुझ्या आठवणीत माझा
आज भरुनी आला ऊर
तुझ्या आठवणींनी हा
जीव झाला आहे चुर


ये ना लवकर सख्या तू आता
ओवाळते डोक्यावरून भाकर
वाटते साऱ्यांना गोड साखर
दोन ध्रुवांवर दोघे आपण


© सविता पाटील रेडेकर नेसरी
तालुका_गडहिंग्लज
जिल्हा _कोल्हापूरईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//