दोन ध्रुवावर दोघे आपण - कविता

खूप प्रेम केलं होतं तुझ्यावर मी
कवितेचे नाव - दोन ध्रुवावर दोघे आपण

विषय - दोन ध्रुवावर दोघे आपण

जिल्हास्तरीय कविता स्पर्धा फेरी -२

खूप प्रेम केलं तुझ्यावर मी
मला वाटलेलं
मला जगातलं सगळं सुख मिळालं
खूप जपलं तुझं मन
तुला जपण्यात
माझंही अस्तित्व विसरले रे मी
जगातली सगळी सुखं तुला मिळावी
यासाठी खूप धडपडले रे मी
तुझं मन मला
नाही ओळखता आले
भरकटलेलं, अस्ताव्यस्त
मानसिक गुंतागुंतीचं
खूप प्रयत्न केला
त्या गुंत्यातून तुला सोडवायचा
पण सगळे प्रयत्न
निष्फळ ठरले माझे
मी एकतर्फी प्रेम
करत राहिले तुझ्यावर
आणि तुझी केवळ
औपचारिकता
असं वाटलेलं तुला प्रेमाने जिंकेन
तुझ्या मनातील मळभ दूर करेन
माझे प्रेम कळलेचं नाही रे तुला
खूप वाट बघितली तुझी
वाटलं तू येशील परतून
पण तू नाही आलास
भूतकाळातल्या भोवऱ्यात
फिरत बसलास
जीवनात कितीही वादळे आली असती
तरी खंबीरपणे तुझ्यामागे
उभी राहिले असते मी
पण तू माझी कधी पर्वाचं नाही केलीस
दोर तुटलेल्या पतंगासारखी
दिशाहीन झाले मी
तुला काय वाटलं
तुझा हात सोडून जाताना
माझ्या मनाला
नाही झाल्या यातना ?
खूप घट्ट केलं आहे
मी माझं मन
आता कुठलेच पाश नकोत मला
तुझ्यासाठी मला भविष्यात
अंधारमय आयुष्य नाही जगायचे
हा स्वार्थपणा नाही माझा
पण तू माझ्याकडे
तनाने, मनाने परत येशील
ही खात्रीचं नाही आता
दोन ध्रुवावर आता दोघे आपण
अशक्य आपले पुनर्मिलन

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग