Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

दोन धृवावर दोघे आपण.

Read Later
दोन धृवावर दोघे आपण.
दोन धृवावर दोघे आपण ..

मज उमेद क्षितीजास भेदण्याची ,
तू घट्ट रोवलेला जग रूढींपाशी .

वाटे विहरावे उंच गगनाशी ,
नाळ तुझी जुऴलेली मातीशी .

सलगी माझी नदीच्या प्रवाहाशी ,
तू स्थितप्रज्ञ उभा काठाशी .

भावे मज गुंजारव सानुल्या फुलांशी ,
मैञ तव बोचर्या काट्यांशी .

स्वैर वाटे कधी उधऴावे वार्याशी ,
सुर जुऴती तुझे हिशेबी व्यवहाराशी .

तू तसा अन् मी अशी ,
जणू पाखरे दोन ध्रुवावरची .

तरीही आपुल्या कश्या,
 जुऴणार्या राशी .

तू सूर्य अन् मी व्हावे शशी ,
नेण्या चिञ संसाराचे पूर्णत्वाशी.

सौ.दीपाली सुधीर कुलकर्णी
संघ -संभाजीनगर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//