Login

दोन ध्रुवांवर दोघे आपण...

दोन ध्रुवांवर दोघे आपण...सांग कधी भेटू का...

शीर्षक : दोन ध्रुवांवर दोघे आपण

विषय : दोन ध्रुवांवर दोघे आपण

स्पर्धा : राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा


दोन ध्रुवांवर दोघे आपण,सांग कधी भेटू का,

बंध तोडूनी दोघे आपण,क्षितिज कधी होऊ का…।।धृ।।


तुझ्या सादांचे तीव्र झंकार, माझ्या हवेत उमटती…

तुझे हरवलेले शब्द, माझ्या कवितेत भेटती…

तुझ्या गुपित कथा, माझ्या कळ्या सांगती…

तुझ्या ओढीची आस, माझ्या डोळ्यात दिसती…।।१।।


तुझ्या तारसप्तकाची लय,माझ्या शब्दांत उमटती…

तुझे विरलेले सुगंध, माझ्या श्वासात भेटती…

तुझ्या मनीचे विचार, माझ्या चांदण्या सांगती…

तुझ्या प्रसन्नतेचे तरंग, माझ्या बागेत दिसती…।।२।।


तुझ्या हास्याचे रंग,माझ्या चित्रात उमटती…

तुझे भरकटलेले मन, माझ्या श्रावणसरींत भेटती…

तुझ्या हृदयाची हाक, माझ्या पापण्या सांगती…

तुझ्या केसांची भुरभुर, माझ्या फुलपाखरांत दिसती…।।३।।


तुझ्या दुःखाची छटा,माझ्या डोळ्यात उमटती…

तुझे लपलेले हसू, माझ्या प्रतिबिंबात भेटती…

तुझ्या डोळ्यांची झिलाई, माझ्या खळ्या सांगती…

तुझ्या स्पर्शाचे शहारे, माझ्या पैंजणात दिसती…।।४।।


सिद्धी घाडगे

जिल्हा - सातारा, सांगली