दोन ध्रुवांवर दोघे आपण
सहप्रवासी दोघे आपण
सागराची सैर करू
थंड हवा गार पाऊस विजांचा कडकडाट
ओलेचिंब होऊन चालू प्रेमाची वाट
तो गार शांत वारा
आणि त्यावर चांदण्यांचा पहारा
पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब
आणि त्यात आपण दोघे चिंब
वाळूत उमटतील प्रेमाची पाऊले
जीव कसा तुझ्यात गुंतला रे
कोण मी अन कोण तू
दोन ध्रुव दोन किनारे
मंद या लाटेवरी
स्वार होऊनी तुजसवे
प्रेमाच्या आणाभाका अन वचनांमध्ये
सामावेल हे जग सारे
कधी संयमी कधी अनावर आपण दोघे
कशास हा अहंकार आपल्यामध्ये
सोबत असुनी अंतर आले
दोन ध्रुवांवर आपण दोघे...
-मनाली पाटील (ठाणे जिल्हा)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा