पांच वाजले तसाच मी,उर्फ सदानंद ऑफिस मधून घरी यायला निघालो,
वाटेतआईची औषधे , मनू चा दूध पावडर चा डब्बा असे किरकोळ सामान खरेदी करून निघालो.
एक गजरेवाली च दुकान असतं बरेच दिवस ते बंद होतं. आज तेही उघड दिसलं एक गजरा घेतला सुमी साठी, व घरी आलो .
.जुन्या सवयीप्रमाणे दारात पाच मिनिटे थांबून घराच्या हवामानाचा अंदाज घेतला.
घरातले वातावरण कसे आहे गरम की समशीतोष्ण? तुम्ही म्हणाल की माझ्याजवळ कोणते थर्मामीटर आहे की फोरकास्ट पाहतो ?
घरातले वातावरण कसे आहे गरम की समशीतोष्ण? तुम्ही म्हणाल की माझ्याजवळ कोणते थर्मामीटर आहे की फोरकास्ट पाहतो ?
पाहतो तर काय दारात दोघी.
अंदाजापेक्षा पारा फारच खाली पडलेला दिसतोय, अगदी मायनस झिरो च्या खाली की काय?
अंदाजापेक्षा पारा फारच खाली पडलेला दिसतोय, अगदी मायनस झिरो च्या खाली की काय?
दोघी?, म्हणजे मी लग्न एकीशिच केले हो दुसरी माझी आई..,तर बायको ला हाsय जानू म्हणत घरात शिरलो .
आई व बायको दोघी इतक्या पुढेमागे करू पाहायला लागल्या कि, मला परत टेन्शन आलं.
"तुम्ही ते सामान बाहेरच ठेवा व आधी अंघोळीला जा बरे, कुठ्ठे हात लावू नका आज काल तो मेला कोरोना परत आलाय असे कोणी तरी म्हणत होते”,बायको ने फर्मान सोडले.
नेहमी मध्येच बोलणारी आई पण” हो रे बरोबर म्हणते ती” असे ऐकून मी जरा आश्चर्य पडलो.

,, “जी हजूर म्हणत बाथरूम मध्ये शिरलो.
आंघोळ करता करता विचार करत होतो, आज असे काय घडले ?दोन विरुद्ध पक्ष म्हणजे आई वर्सेस बायको एक जूट म्हणजे, अगदी काँग्रेस-भाजपा नाही तरीs भाजपा समाजवादी म्हणा, ही बिन बादल बरसात कशी काय ?
नेहमी विळ्या भोपळ्या प्रमाणे वागणाऱ्या या दोन्ही स्त्रिया अचानक एका गटा मध्ये कशा काय सामील झाल्या?
मला काय चांगलेच आहे, पण तरीही पचनी पडत नव्हते कारण नेहमी मी घरी येतो तेंव्हा आई दारात दिसली की समजावे सुमो फायटर सुमी फायटिंग करून हरलेली आहे पण जर स्वागत सुमती ने केले तर सर्व आलबेल आहे असे समजावे .
म्हणजे तेव्हा आईने माघार घेतलेली असते.

बाबांना जाऊन बरीच वर्ष झाली. मी ताई नंतर बऱ्याच वर्षाने झालेला शेंडेफळ, कुलदीपक, आईचा नंदू म्हणून तिच्या सर्व अपेक्षा माझ्याकडेच.
तिच्याच पद्धतीने माझे सर्व झाले पाहिजे असा तिचा हट्ट.
तिच्याच पद्धतीने माझे सर्व झाले पाहिजे असा तिचा हट्ट.
सुमू ने कौतुकाने केलेल्या पदार्थात पण तिच्या सूचना असतात अग जरा अजून थोडं अमुक घातल असतं किंवा ते कमी हवं होतं “मग कधी कधी दोघींमधे वाद-विवाद होतात ,माझी मुश्किल.
तशा दोघी चांगल्या आहेत म्हणजे दोघी माझ्यावर भरपूर प्रेम करतात आणि आपले प्रेम दाखवायसाठी नव्या नव्या रेसिपी मला करून खाऊ घालतात
आता तुम्ही म्हणाल तुझी तर चंगळ लेको,,,ते ठीक आहे हो. पण एक तर वजन खूप वाढलं व मग परीक्षक म्हणून माझी पंचाइत! अगदी कैरीचे लोणचे ,पण ते दोन पद्धतीचे त्यात पण कुठले बेस्ट..
आता तुम्ही समजू शकता माझी अवस्था !
पण आता मीही तरबेज झालो आहे, इशाऱ्याने सुमी ला, तर खांद्यावर प्रेमाने हात ठेवत आईला मार्क देऊन मोकळा होतो झालं.
आता तुम्ही समजू शकता माझी अवस्था !
पण आता मीही तरबेज झालो आहे, इशाऱ्याने सुमी ला, तर खांद्यावर प्रेमाने हात ठेवत आईला मार्क देऊन मोकळा होतो झालं.
तर--- मग असे दोन विरुद्ध गुट एक झाले ते कसे? याचा विचार करतच बाहेर आलो ,कपडे बदलून चहा घेतला .
बायको अगदी जवळ तर आई दूर सोफ्यावर मनू ला घेऊन,
सुमीदिवसभराचे ऑफिसमधले हालहवाल विचारू लागली
बायको अगदी जवळ तर आई दूर सोफ्यावर मनू ला घेऊन,
सुमीदिवसभराचे ऑफिसमधले हालहवाल विचारू लागली
"अगो लहान आहे का तो? किती प्रश्न विचारशील?"
मला वाटले आतापरत बिनसले,
बरं -"- नाही विचारत .पण तुम्ही च तर",
“तू नीट घरी पोचला ना बाबा त्यातच सर्व मिळवले आजकाल ट्रेफिक किती वाढलाय? काहीबाही बातम्या ऐकायला येतात”.
.आईने असे म्हणताच मला तर कुठल्यातरी महायुद्धा तून विजयी होऊन परत आलेल्या सैनिकाप्रमाणे फिल व्हायला लागले ,
.आईने असे म्हणताच मला तर कुठल्यातरी महायुद्धा तून विजयी होऊन परत आलेल्या सैनिकाप्रमाणे फिल व्हायला लागले ,
मी चहा पिऊन जरा वेळ खोलीत जाऊन बसलो
आई आणि सुमी कुठलास मराठी सिरीयलअगदी मन लावून पाहत बसल्या. मधून मधून आईचे आणि सुमती ची डायलॉग बाजी चालली होती. मी एक दोनदा बाहेर येऊन पाहून गेलो मधून डोळे पुसण, मालिकेतल्या सासू किंवा सुनेला वाईट वाईट बोलण चालू होतं.
मला खरं तर खूप भूक लागली होती पण या बायांना मध्ये कोण डिस्टर्ब करणार म्हणून मी पाणी पिऊन चुपचाप खोलीत जाऊन बसलो.
मला खरं तर खूप भूक लागली होती पण या बायांना मध्ये कोण डिस्टर्ब करणार म्हणून मी पाणी पिऊन चुपचाप खोलीत जाऊन बसलो.
साधारण तासाभराने आम्ही जेवायला बसलो
रात्रीचे जेवण बिना कटकटीच्या शांतपणे पार पडले.
“काय बाई शोभत कां ह्या बाईला एवढं वय झालंय ? असं वागतात का कोणी?
हो आणि त्या सुनेला तरी काही धेर- बंध नाही केव्हा येते केव्हाही जाते आणि सारखी कचाकचा भांडत असते सासूशी मग काय होणार ते ?नवऱ्यान कंटाळून जीव दिला. बिचारा! हे असले संवाद माझ्या कानावर मधून मधून पडत होते .
आवरावरी चालू असतानाही दोघीजणी दोन पक्ष घेऊन कशावरून तरी वाद घालायला लागल्या.
आश्चर्य म्हणजे आई सासूला नाव ठेवत होती तर सुमती सुनेला दोष देत होती .
आज ऑफिसमध्येही लेडीज स्टाफ मध्ये ह्याच मालिके बद्दल गोष्टी चालल्या होत्या नवर्या ने कंटाळून जीव दिला वगैरे , सगळ्या बायांची सहानुभूती पुरुष जातीकडे पाहून मला आश्चर्यच वाटलं.

त्याच मालिके वरुन आमच्या घरात वादविवाद चालला होता आणि बहुतेक म्हणूनच दोघीजणी माझ्याशी इतक्या प्रेमाने वागत होत्या. त्यातल्या नवर्या प्रमाणे मी भांडणाला कंटाळून —--आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला..
काही का होईना दोघी प्रेमाने राहो.
संध्याकाळपासून आणलेला गजरा केव्हा एकदा सुमीला देतो असे वाटत होते.
अग आता पुरे कर काम जा झोपायला आई ने दटावले म्हणून सुमी लवकर खोलीत आली.
अग आता पुरे कर काम जा झोपायला आई ने दटावले म्हणून सुमी लवकर खोलीत आली.
रात्री मनू चे दुध करायसाठी म्हणून दुधाचा डब्बा पिशवीत होता तो आणायला म्हणून मी गेलो तेव्हा आईचे औषधं काढले .
"तुम्ही मनूला झोपवा मी आईना औषध देऊन येते". वाटले सुमती आईची किती काळजी घेते. मनू ला झोपवून गजरा घेऊन खोलीत हळूच नेऊन ठेवला.
सुमी झोपायला खोलीत आली तेव्हा," ए डोळे बंद कर म्हणत मी गजरा काढला ,"
गजर्याचा सुगंध येताच डोळे उघडून इश्श्ss म्हणत सुमी लाजत माझ्याजवळ सरकली नि मी लाईट बंद केला.
--------------------------------------------
लेखन… सौ प्रतिभा परांजपे