कविता डोंबाऱ्याची पोर

A Poor Girl
कविता

डोंबाऱ्याची पोर


तुझे माझे स्वप्न पोरी
पोटातच मरतंय
चल उठ अगं!
कसरती ला जायचंय

पोटासाठी मी तुला कामाला लावतोय
कसं सांगू मी तुला
माझं काळीज फाटतंय

पोरी... तारे वरच्या कसरतीने
तुझे पाय रोज सांदिले
थोड्याशा बिदागी ने
पोटाला कापडाने बांधीले

अगं तू माझी लाडकी
आहेस मैना
तुझ्या शिक्षणाची होऊ
नये दैना

त्यासाठी मी काहीही करीन
माझे दुःख, अपमान, कढ
फाटक्या शेल्यात बांधीन

तरी तुझे भविष्य मी
सुरक्षित करीन
चिंता नको, तुझा बाप
तुला खूप मोठं करीन


छाया राऊत
अमरावती