दोघी

बहिणींची कथा

एक गाव होत..त्या गावात एक कुटुंब राहत होत. दोन मुली त्यांची आजी आणि आई बाबा. एवढी जण त्यात राहत होती. इतर घरांमध्ये जस वातावरण होत तसच या घरात होत. त्या दोन मुली कायम एकमेकींना धरून असायच्या, बाजरात फिरताना किवा कुठे बाहेर जाताना त्या दोघी कायम असायच्या. त्यांची जोडी मस्त होती.
वयामध्ये अंतर असलं तरी सुद्धा त्या जुळ्या मुलींसारख्या दिसायच्या. वाचन,कविता किवा आणखीन काही सगळं सेम असायचं. इतर वेळी अभ्यास, क्लास यामध्ये इतक्या गुंतून जायच्या की त्यांना एकमेकाशी बोलायला किवा भांडायला वेळ मिळत नसायचा... पण सुट्टी असली की नुसतं तु तु मै मै सारख करत सगळं मीच का करायचं अस म्हणत आई कडे जाऊन भांडायच्या.... त्या इतक्या भांडायच्या की बघणाऱ्या लोकांना वाटेल की या एकमेकांच्या वैरी तर नाहीत ना....
आई आणि आजी मज्जेने म्हणायच्या आता काठ्या देऊ का हातात दोघींच्या.....आणि आजी म्हणायची तु या ठिकाणी बस, तु त्या ठिकाणी बस. दोघी एकमेकांपासून लांब राहा आणि गप्प राहून आपापलं काम करा. तशा दोघी धुसफूस करत जरा गप्प बसायच्या.. कुणी आवाज करायचं नाही... आणि मग थोडा वेळ जायचा.. दोघींपैकी एक कुणीतरी हळूच एक शब्द बोलायला चालू करायची तस दोघी मिळून नंतर कधी गप्पा मारायला लागायच्या ते कळायचं नाही..  आणि मग वाक्य ऐकायला यायचं आता तर भांडत होता ना... तेव्हा सगळे मिळून हसायचे आणि म परत गप्पा ना उत यायचा. 


दोघींचं शाळा, कॉलेज व्यवस्थित सुरू होत. प्रत्येक मुलींचौ आयुष्यात तो एक क्षण येतो तो आला. त्यातल्या एकीच लग्न झालं. म्हणजे तिने लग्न केलं ते ही घरच्यांच्या जरा विरुद्धच जाऊन.. 
आता ही जोडी एकत्र फिरत नाही की गप्पा मारत नाहीत की भांडत नाहीत. त्या दोघी सुद्धा आपल्या जुन्या आठवणींवर आणि कधीतरी आपल्याला बोलता येईल या विश्वासावर आता राहत आहेत. आपली बहीण खुशीत आहे हे तिला समजत आहे आणि त्यामुळे तिला आता कुठलंही दुःख नाही आहे. 
हा पण एक मात्र आहे की दोघीना ही परत एकत्र यायचं आहे. हा विरह आता कमी करायचा आहे... येतील ना एकत्र त्या...???


म्हणतात ना काही गोष्टीसाठी वेळ यावी लागते त्याप्रमाणे त्या दोघी पुन्हा एकत्र यायची एक वेळ आली... आणि आधी सारख म्हणता येणार नाही पण आता त्या दोघी आणि घरव्हे सुद्धा एकत्र असतात.... समाधानी असतात...