Login

डॉक्टर तुमच्या सेवेला सलाम

Doctor Mhanje Mansatil Dev.

अलक:

प्रसंग पहिला-

     आपले बाळ तापाने फणफणतय त्याला मी सोडून कशी जाऊ म्हणणारी तिच्यातील आई आज दुःखी होती. पण एका फोनवर धावत जाऊन क्रिटिकल आवस्थेत असणाऱ्या स्त्रीला आज तिचं बाळ सुखरूप हातात देऊन, तिच्यातील डॉक्टर आई आज सुखावली होती.

प्रसंग दुसरा-

     जवळपास आठवडाभर रात्री उशिरा घरी येणारी ती, कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हती.आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून नवरा आणि मुलं तिची वाट पाहून झोपी गेली होती.ती मात्र रुग्णसेवा करण्यात तत्पर होती.घरी थकून आल्यावर नवऱ्याकडे पाहताना,तिच्यातील बायको आज नकळत नाराज झाली होती.


प्रसंग तिसरा-

        तिच्या हाताने तिने कित्येक डिलिव्हरीच्या अवघड केसेस सोडवत,बऱ्याच स्त्रियांना मातृत्वाचा आनंद मिळवून दिला.पण ती मात्र मातृसुखापासून वंचित राहिली.तिने शेवटी निर्णय घेतला अशीच स्त्रियांची सेवा करायचा आणि तो निर्णय तिला कित्येक बालकांची आपसूकच माऊली बनवून गेला.

प्रसंग चौथा-

 आज तिच्या जवळची व्यक्ती ह्या जगाचा निरोप घेऊन गेली होती.तिला इमरजन्सी आहे मॅडम,असा फोन येताच तिने आपले आश्रू आवरले आणि ती आपले कर्तव्य पार पाडायला सज्ज झाली.


     असे कित्येक प्रसंग डॉक्टरांच्या आयुष्यात रोज येत असतात.पण ते क्षणभरही आपल्या स्वतःचा किंवा बाकी गोष्टींचा विचार न करता आपले रुग्णसेवेचे कर्तव्य चोख पार पाडत असतात.अश्या ईश्वरी रुपाला माझे त्रिवार वंदन.

धन्यवाद.

©®सुप्रिया शिंदे महादेवकर