Feb 28, 2024
डॉक्टर्स डे स्पेशल

डॉक्टर डॉक्टर

Read Later
डॉक्टर डॉक्टर

डॉक्टर डॉक्टर..
"सिस्टर काही इमर्जन्सी आहे का आता?" डॉ सिद्धार्थने विचारले..

" आता सध्था तरी नाही.." 

" मग मी थोडा आराम करतो.. दुपारपासून उभा राहून थकलो आहे.."

" चालेल डॉक्टर.."

"हॅलो प्रिया.."

" हाय सिध.. थकला आहेस खूप.."

" हो ग.. हि लोक ना आरएमओ म्हणवतात आपल्याला, पण जबर काम करून घेतात.."

" एवढे काम होते तुला?"

" हो ना.. आज आमचे डॉक्टर आले नाहीत.. त्यांची ओपीडी मलाच घ्यायला लागली.. त्यानंतर रोजचे पेशंट.. या सगळ्यात तुझ्याशी बोलायला वेळच मिळाला नाही.. म्हणून सिस्टरला आराम करतो सांगून इथे आलो आहे.."

" एक विचारू सिध?" प्रिया सिद्धार्थला हेडमसाज करत म्हणाली..

"बोल ना.." डोळे मिटून सिद्धार्थ म्हणाला..

" आपली इंटर्नशिप आता पूर्ण होईल. तू पुढे काय करायचे ठरवले आहेस?"

" पुढे काय? बाबांचे क्लिनिक आहे, ते जॉईन करणार.. तू आहेस ना माझ्यासोबत?"

" मला तेच बोलायचे होते तुझ्याशी.. माझे बाबा पाठी लागले आहेत.. युएसला जाऊन पुढे शिकण्यासाठी.. तू जर येणार असशील तर तुला सपोर्ट करायची त्यांची तयारी आहे.."

" प्रिया आपले आधीही या विषयावर बोलणे झाले आहे.. मला इथेच राहून इकडच्या लोकांची सेवा करायची आहे.."

" अरे पण त्यात किती पैसे मिळतील?"

" चांगले आयुष्य जगता येईल एवढे नक्कीच.. माझे मोठे घर आहे, गाडी आहे, अजून काय लागते माणसाला?"

" तुला समजणारच नाही.."

" प्रिया, माझे तुझ्यावर प्रेम आहे.. मला तुला सोडायचे नाही.. पण मला आपला देश पण सोडायचा नाही.. तू लग्नानंतर तुझ्या बाबांचे हॉस्पिटल जॉइन कर मी माझ्या बाबांना.. आपण दोघेही असं करून एकत्र राहू शकतो ना?"

" मला विचार करायला हवा सिध यावर.." प्रिया तिचे हात काढून घेत म्हणाली..

    इंटर्नशिप संपल्यावर लगेचच प्रिया सिद्धार्थला काहीच न सांगता युएसला निघून गेली.. त्याला खूप मोठा धक्का बसला. पण त्याने कर्तव्याला महत्त्व देत तिथे आपले लक्ष केंद्रित केले.. हळूहळू त्याचा वडिलांच्या क्लिनिकमध्ये जम बसू लागला.. लोक त्याच्यासाठी तिथे येऊ लागले.. नाव व्हायला लागले.. एक अतिशय उमदा, विश्वासू डॉक्टर म्हणून तो ओळखला जाऊ लागला.. लग्नाचा विषय सोडल्यास तो कोणाशीही कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलायचा.. अजूनही कुठेतरी त्याच्या मनात प्रिया होती...

      प्रियाने तिकडेच कोणाशी तरी लग्न केल्याचे सिद्धार्थला एका कॉमन फ्रेंडकडून कळाले.. तिने भारतात परत येऊन वडिलांचे हॉस्पिटल जॉइन केल्याचे त्याला कळले.. पण तो तिला भेटायला नाही गेला.. तिला जर वाटले तर ती येईल असे त्याला वाटत होते.. आणि ती एक दिवस आली.. सिद्धार्थचा दवाखाना नेहमीसारखा पेशंटने भरला होता.. समोर एका आलिशान गाडीतून प्रिया उतरली.. अंगावर भारीतली साडी, हिऱ्यांचे दागिने, डोळ्यावर गॉगल.. तिला बघूनच मरगळलेले पेशंट ताजेतवाने झाले.. ती थेट आत चालली होती. तिला कंपाऊंडरने थांबवले..

" मॅम आत पेशंट आहेत. तुम्ही आत नाही जाऊ शकत.."

"डॉक्टरांना सांगा, प्रिया आहे म्हणून. " प्रिया आढ्यतेने बोलली..

" मी सांगते, पण मला नाही वाटत डॉक्टर पेशंट संपल्याशिवाय तुम्हाला भेटतील असे."

आणि खरेच सगळे पेशंट संपल्यावरच सिद्धार्थने प्रियाला आत बोलावले. 

त्याला बघून प्रियाला आत तुटल्यासारखे झाले.. तो अजूनही तसाच दिसत होता.. तेच चेहर्‍यावरचे हास्य तोच तजेलदारपणा.. तिला तिचा नवरा आठवला.. सतत पैशात बुडालेला आणि चेहर्‍यावर आठ्या घेऊन वावरणारा..

" ये बस.." सिद्धार्थ हसत प्रियाला म्हणाला..

" इतका वेळ बाहेर बसलेच होते." प्रिया रागाने बोलली..

" सॉरी.. पण ते पेशंट अपॉइंटमेंट घेऊन आलेले असतात.. त्रस्त असतात.. सो.. सोड.. तू कशी आहेस? खूप दिवसांनी भेटलीस.."

"मी बरी आहे.. मी तुला एक ऑफर द्यायला आले आहे.." प्रिया सावरत म्हणाली..

" अच्छा तू कामासाठी आली आहेस तर." सिद्धार्थच्या स्वरात निराशा होती.

" हो.. ते म्हणजे.. आमच्या हॉस्पिटलने एक नवीन पॅथॉलॉजी सेंटर सुरू केले आहे.. तुझ्याकडे पेशंट भरपूर येतात.. त्यांना जर तू आमच्याकडे पाठवलेस तर..." प्रिया अडखळत बोलत होती..

" सॉरी प्रिया.. मी अजूनही पहिलाच सिद्धार्थ आहे.. माझ्यासाठी माझे पेशंटच महत्वाचे आहेत.. त्यांना गरज असेल तर मी नक्कीच टेस्ट करायला सांगेन.. पण कुठे करायची हे त्यांना ठरवू देईन.."

काही न बोलता प्रिया उठली.. तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी अभिमान दिसत होता..

" निघते मी.. कधी जमले तर परत भेटू.."काही दिवसानंतर स्थानिक वृत्तपत्रात दोन बातम्या होत्या..

लोकांची निरपेक्ष सेवा करत असल्याबद्दल आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गरीब लोकांसाठी विनामूल्य शिबीर घेण्याबद्दल लोकांनी डॉ. सिद्धार्थचा सत्कार केला..


प्रिया हॉस्पिटल मध्ये अवैध अवयवतस्करी चालत असल्याच्या संशयावरून हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे..
डॉक्टर दिनानिमित्त लिहिलेली कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//