Login

डू ऑर डाय _ खेळ मृगजळाचा ( भाग २)

यशाच्या खडतर मूल्यांची शिकवण देणारा एक रहस्यमय खेळ
मागील भागात आपण पाहिले की अमित वर्तमानपत्रातील लॉटरीची जाहिरात पाहून त्या ठिकाणी आला पण अचानक गायब झाला. आता पाहूया पुढे..

थोड्या वेळातच अमित शुद्धीवर आला.

अचानक त्याला खूप जोरदार ठसका लागला आणि तो जीवाच्या आकांताने खोकू लागला. तेवढ्यात एका व्यक्तीने त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने घटाघट पाणी पिले आणि वर पाहिले.

एक विचित्र पेहराव असलेला व्यक्ती त्याच्यासमोर उभा होता. त्याचा चेहरा देखील एका विशिष्ट मास्कने झाकलेला होता.

त्याने इशाऱ्यानेच अजून एका व्यक्तीला बोलावले. ती व्यक्ती देखील अशाच पेहरावात होती. अमित काही बोलणार तोच त्याला शांत राहण्याचा इशारा केला गेला. ते वातावरण जणू काही एक भयानक परिस्थिती दर्शवत होती. अमितला चाकूचा धाक दाखवून एका वेगळ्याच खोलीत आणले गेले. तिथे अमितसारखेच जवळपास दहा जण होते आणि विशिष्ट पेहरावात असलेले मास्कधारी असे ७-८ जण होते. शिवाय अमितसारखेच भांबावलेल्या अवस्थेत हे १० जण होते.पण कोणालाही बोलण्याची मुभा नव्हती.

अचानक एक आवाज आला.

"पैशाचे मृगजळ माणसाला आंधळे बनवते.हा हा हा..तुम्ही इथे आलाच आहात म्हणून क्यो न एक अच्छा सा गेम हो जाये? ज्याचे नाव आहे डू ऑर डाय_ खेळ मृगजळाचा! "

सगळे एकमेकांकडे बघू लागले.खेळाचे नाव ऐकताच सर्वांचा थरकाप उडाला.

" अरे हो हो. मी तर तुम्हाला सांगायचं विसरलो की या खेळात प्रत्येक पायरी सचोटीने,मेहनतीने,जिद्दीने पार पाडणाऱ्या एका मनुष्याला मिळणार आहेत ७ कोटी. हा एकच नियम तुम्हा सर्वांना पाळायचा आहे.लक्षात ठेवा काहीही घोळ किंवा बेशिस्तपणा आढळला तर परिणाम गंभीर होतील.म्हणजे काय होईल हे तुम्हाला खेळाच्या नावावरून लक्षात आले असेलच."

अमितसह लॉटरीच्या अमिषाने आलेले लोक गोंधळले.
त्यातील एक जण म्हणाला,

" नाही. मला नाही खेळायचा हा खेळ.मला सोडा इथून.मला घरी जायचं आहे."

तेवढ्यात एक मास्कधारी व्यक्ती पुढे आली अन् त्याने त्या बोलणाऱ्या व्यक्तीला धाडधाड गोळीबार करत निपचित पाडले.आता मात्र हा प्रकार आपल्या आवाक्याच्या बाहेर असून हा खेळ खेळल्याशिवाय कोणालाही गत्यंतर नाही असे जमलेल्या लोकांना लक्षात आले.

पुन्हा एक आवाज आला.

" आळस माणसाचा शत्रू आहे. कमाल आहे पैसा पाहिजे आणि खेळ खेळायचा नाही? तुमच्यातील मोह तुम्हाला इथे घेऊन आला आहे हे लक्षात ठेवा तुम्ही ९ जण.त्यामुळे इथून जिवंत जायचे आहे की नाही हे आता तुम्ही ठरवा."

अमितने एक नजर फिरवली तेव्हा त्याच्या लक्षात आले की हे ८ जण आणि मारला गेलेला मुलगा जवळपास एकाच वयाचे होते.तेवढ्यात तोच आवाज पुन्हा आला.

" चला तर मग आता खेळूया हा अद्भुत खेळ.पहिल्या फेरीत तुम्हा ९ जणांना मी काही नावे देईल.त्यांना तुम्हाला पहिल्या अक्षरानुसार चढत्या क्रमाने लावायचे आहे.खूप सोपे आहे.फक्त १०० नावे मी तुम्हाला देईल आणि वेळ असेल दीड तास.त्याच्या आत तुम्हाला खेळ खेळायचा आहे.समजले?"

खेळाला सुरूवात झाली.अमित पटापट नावे क्रमानुसार लावत होता.इतर मुलेही पटापट कामाला लागली.पण गोंधळ होऊ लागल्याने १ तास झाला तरीही बऱ्याच जणांचे हे काम रखडत चालले होते.

आता पुढे काय होईल? ही पहिली फेरी अमितला पार करता येईल?पाहूया पुढील भागात..

भाग २ समाप्त
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

0

🎭 Series Post

View all