ज्ञान आले जन्माला

ज्ञानेश्वर महाराजांची जन्मकथा
•••••ज्ञान आले जन्माला••••

संतांची भूमी हि महाराष्ट्राची ओळख आहे . गुरुग्रन्थसाहिबामध्येही संत नामदेवांचा उल्लेख आढळतो . ज्ञानेश्वर म्हणजे संतश्रेष्ठ . अमृताची गोडी ,ज्ञानाचा कळस म्हणजे त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी. .ज्ञानापासून कोसो दूर असलेल्या बहुसंख्य समाजावर त्यांनी मोत्यांचा पाऊसच पाडला . रुसून बसलेल्या ज्ञानदेवांना मनविण्यासाठी गेलेल्या बहिणीला ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी विनवणी करावी लागली . पण अज्ञानाच्या अंधःकारात वर्षानुवर्षे कितपत पडलेल्या समाजाने कुठलीच विनवणी न करताही ज्ञानदेवाने त्यांच्यावर ज्ञानमोत्यांचा वर्षाव केला . ज्ञानदेव माऊलीचा जन्म आळंदी येथे सन ११९३साली झाला . वडील विठ्ठलपंत आणि आई रुख्माबाई यांच्या चार अपत्यांमध्ये ज्ञानदेव दुसरे . पहिले निवृत्ती , दुसरे ज्ञानदेव , तिसरे सोपान अन चवथी मुक्ताबाई . विठ्ठलपंत अतिशय धार्मिक वृत्तीचे सदाचारी स्वरूपात ख्यातनामच होते . त्यांच्या पनाज्याच्या पणज्यांकडे आपेगावचे कुळकर्णी पद होते . घराण्यावर नाथ सम्प्रदायाचा प्रभाव होता . ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत वेद , व्याकरण , काव्यात अतिशय निपुण होते . ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी हे नाव मराठी मनात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे .ज्ञानदेवांच्या आईचे नाव रुख्माबाई . सिद्देश्वरपंत कुळकर्णी यांनी आपली लाडकी लेक रुख्माबाई हिला विठ्ठलपंतांचे गुण पाहून दिले . आजकाल मुलाचे गुण सोडून त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे पाहून लेक देतात . धन आज आहे उद्या नाही . मुलाचे गुण प्राधान्यावर ठेवावे . ज्ञान संपदा तपासून नातेसंबंधांचा मार्ग निश्चित करावा मी सुद्धा माझ्या दोन्ही मुली ज्ञानवंतांना दिल्यात . कुणाकडे किती प्रॉपर्टी हा विषयच नव्हता . . सिद्धेश्वरपंत यांना तीर्थाटनाला आलेले तेजपुंज चेहऱ्याचे विठ्ठलपंत दिसताच त्यांनी त्यांना घरी भोजन करण्यास निमंत्रित केले . तीर्थाटनाला आलेल्या विठ्ठलपंतांनी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला . त्या दिवशी विठ्ठलपंतांचा मुक्काम सिदेश्वर पंत कडेच होता . अवघे झोपी गेल्यानंतर रात्री पंढरीनाथ सिद्धेश्वर पंत यांच्या स्वप्नात आले अन म्हणाले तुझी मुलगी मुक्कामी असलेल्या .या पाहुण्याला दे . ज्ञानदेवांच्या जन्माची मुहूर्तमेढ इथेच रोवल्या गेली.. 

© धनराज गावंडे