शीर्षक - दिवाळी भाग 2.
स्वरा - दुसर्या दिवशी सकाळी सकाळी आजी तू काल दिवाळी विषयावर सांगत होती. सांग ना.
आजी - काल लवकर झोपली होती. पडल्या पडल्या लगेच डोळा लागला होता. दमली होती.
आधी सगळे आवरून घे. दुध आणि नाश्ता झाला की सांगते.
स्वरा सगळे आवरून आजीच्या मागे आता सांग. काल ना सगळ्यांना कपडे झाले.
आजी - अगं. हो. सांगते की. सगळ्या नवीन कपड्यांचा सुंदर सुंगध.. अत्तर आणायचे आण्णा दिवाळीत.
असे पहाटे चार वाजता सगळ्यां भावंडांना तेल लावणे.रांगोळी समोर छोटीशी. शास्त्र म्हणून माई दोन बोटे जमिनीला तेल लावून सगळ्यांना तेलाने चोळायची. दिवाळीत सुगंधी वासाचे तेल मिळायचे लावायला. नंतर सगळ्यांना उटणे चोळून चोळून अंघोळ. गरम गरम पाणी अंगावर घ्यायला पहाटे छानच वाटायचे संपूच नये वाटायचे. चुल नाहीतर तांब्याच्या बंबावर तापवलेले पाणी. आहाहा.... नंतर मोती साबण आला. दिवाळी आणि मोती साबण हे ठरलेले. सगळ्यांना औक्षण माई करायची.
भल्या पहाटे काकू इकडे झाडलोट, शेणाने सावरणे, शेणाचे सडे..अंगणात काकूच्या रांगोळ्या छानच, मोठ्या असायच्या. आम्ही दोघी बहिणी रंग भरायला मदत करायचो. काकू सांगेल तसेच भरायचे रंग.
दारात तुळशी वृंदावन तिथे पण रांगोळी.
दाराला झेंडूच्या माळा तोरणे सगळे भावंडे मिळून बनवायचो. जूना वाडा मोठ्ठा. मोठे दरवाजे. मोठी तोरणे थाटच न्यारा.
आजकाल फ्लॅटला ना सडा ना मोठी तोरण. तुळशीची कुंडी कोपर्यात. आता सगळे बदलले आहे. कोणी फराळ देत नाही. घेत नाही. फारशा ओळखी नाही. तो मोकळेपणाने शेजारी जाणे येणे ती आत्मीयता आता राहिलीच नाही.
स्वरा - आजी आत्मीयता म्हणजे..
आजी - आपुलकी.. आपलेपणा.
फटाके दिवाळी सुरू होण्यापूर्वी टिकल्या त्या चिमट्याने / सांडशीने फोडायला सुरूवात झाली असायची आमची भावंडाची. मग तडतड्या सुरसुऱ्या त्या चालू आहेत तोपर्यंत गोल फिरवून फिरवून गाणी..
"दिन दिन दिवाळी. गायी म्हशी ओवाळी.. गाई म्हशी कोणाच्या लक्षुमणाच्या.. लक्ष्मण कोणाचा आई वडीलांचा.. आई, वडील कोणाचे देवाचे" मग भुईचक्र, अनार, लवंगी फटाके.. वा छान आता फक्त आठवणी.
दिवाळी म्हणजे चार दिवस रोज काही नवीन पुरणपोळी.. बासुंदी.. श्रीखंड.. घरी दही बांधून. भरपूर मनसोक्त खा.. त्यात वेलदोडे, जायफळ दिवाळीत थाट. आता सारखे विकतचे डब्बे नाही. घरी भरपूर श्रीखंड मनसोक्त आनंद लुटला.. जूलाब लागेपर्यंत खाणे. घरचे दूध मनसोक्त बासुंदी वाटीवर वाटी.. फुरक्या मारत प्या. त्यात चारोळ्या, वेलदोडे भरपूर.. दिवाळी म्हणजे दिवाळीच..
स्वरा आजी जोरात हसतात. डॉक्टरांनी दिलेली जूलाबाची गोळी ठरलेली ती सगळ्यांना भावंडांना.. हा.. हा..
इकडे लग्न झाल्यावर आले तर दिवाळी म्हणजे तुझ्या आजोबांना दिवाळी अंक वाचनाची आवड होती. दिवाळी पहाट म्हणून शास्त्रीय संगीत विठ्ठलाची गाणी ऐकायला आवरून पहाटे जायचे.. एकदा मलाही नेले होते. मी माई सारखा फराळ करायचे तयार सासुबाई सोबत मिळून नंतर लहान जाऊबाई आल्या.
माई सारखी मुलांना अभ्यंगस्नान, तेल चोळणे, उटणे लावणे, औक्षण करणे मी करायचे मुलांना सगळ्या. पिढ्यानपिढ्या दिवाळी आनंद घेऊन येते. तोच उत्साह घेऊन येते.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©® 18.10.2022
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा