दिवाळी भाग 4 अंतिम (जलद कथामालिका)

Diwali.


स्पर्धा - जलद कथामालिका
शीर्षक - दिवाळी भाग 4 अंतिम


स्वराचे बाबा - अगं तुझ्यासाठी गजरा आणला आहे.


स्वराची आई - इश्श्य.. आज काय अचानक.


बाबा -. हात, पाय, तोंड धुवून येतात.

स्वरा - स्वरा पाणी आणते. " बाबा पाणी घ्या" बाबा पाणी पितात.


आजी - स्वरा घरातील आई हि खरी लक्ष्मी आहे हि जर खुश असेल तर दिवाळीतील लक्ष्मी पुजन करून ती लक्ष्मी पण येते बरं का..

आई - बेसनाचे लाडू वळत असते. आई हसते गालात.

स्वरा - वा.. आई काय सुंगध पसरला आहे. मी सुवासाने पळत आले.


आजी - मग हे बघ आम्ही कसे एकसारखे वळतो आहोत दोघी. तोंडात टाकताच विरघळणार.. रंग वगैरे सगळे छान झाले आहे.


आई - स्वरा लक्ष्मी पुजन झाले की खायचे बरं नैवेद्य दाखवला की.


आजी -" हो स्वरा शहाणी आहे."


बाबा - "खाऊ दे ग.. लहान आहे. तिला चालते. नंतर आयत्या वेळी परत कर नवीन."


स्वराचा मोठा भाऊ - " बाबा चला ना फटाके, कपडे आणायला जाऊ आपण."

बाबा -" अरे आता आलो. जरा दमलो. जाऊ.. बाजार फुलला आहे खुप. खुप गर्दी. "


आई आणि आजी एकाच वेळी एकच वाक्य आले -" बाजारात खरेदी करण्याची मजाच वेगळी." दोघी हसतात. बेसनाचे लाडू वळून झाले आजी आणि आईचे. आईने आणि आजीने भरपूर फराळ बनवला. शेव, चकली, अनारसे, चिवडा, लाडूचे डब्बे भरले.


आजी - "माझे गुडघे दुखतात म्हणून तुम्ही जा मी आहे घरी. "


आजी - " सुनबाई.. दमून याल तुम्ही आज मीच खिचडी टाकेन चालेल का सगळ्यांना."


सगळे हो..


दादा - " बाहेर थोडे फार होईल आमचे तुला काय आणायचे आजी. "


आजी - " मला काय.. काही नको."


आई - " स्वरानी काय काय आणायचे यादीच केली आहे एवढी मोठी.. विसरायला नको म्हणून."


आजी -" अगंबाई.. "


सगळे खरेदी करण्यासाठी आनंदात, उत्साहात बाहेर पडले.


रात्री सगळ्यासाठी भरपूर खरेदी करून दमून भागून घरी आले सगळे.


स्वरा - आनंदाने केलेली खरेदी आजीला दाखवत होते. आजीचे पातळ छानच आजीच्या आवडीच्या जांभळ्या रंगाचे आईने निवडले. आत्यासाठी तिला आवडेल अशी साडी आणली. आईने निवडली.

आजी - खुपच खुश आजी चेहऱ्यावर आनंद होता.

आजी - आता प्रतिक्षा मोठा भाऊ येईल का नाही भाऊबीजेला. त्याच्याच वाटेकडे डोळे लावून बसले. आतपर्यंत नेहमी आला मोठा भाऊ आता वय झाले. भाचा घेऊन येईल अशी आजी पुटपुटली.

दिवाळीचे दिव्याने घर उजळून गेली. दिवाळीच्या आनंदात स्वरा ते आजी सगळे न्हाऊन निघाले. एक एक दिवस साजरा व्यवस्थित केला गेला. भाऊबीजेला आजीचे मोठे दोन्ही भाऊ आले. त्यांना भेटून आनंद अश्रूच आजीच्या डोळ्यात तरळले.


मामा आजोबा - "भावाने अगं पमा म्हणत ह्रदयाशी घेतले आजीला."


स्वराच्या दोन आत्या आल्या. 2 मामा, आत्ये भाऊ, बहीणी आल्या. नातेवाईकांनी घर फुलून गेले. फटाके आणि फराळ यांची लयलूट झाली. औक्षण आणि ओवाळणी मिळाली.


इतक्यात स्वराच्या आईचे 2 भाऊ आले. 3 भाचे, 2 भावजया आल्या. आई आनंदून आईचा जीव भांड्यात पडला.


सगळ्याचे स्वागत, फोटो सेल्फी झाल्या.


बिस्मिल्ला खॉं चे शहनाई वादन मंद सुरू होते. गप्पा सुरू झाल्या भरपूर. दिवाळी चा सोहळा झाला.


आजी गुणगुणते " आली माझ्या घरी हि दिवाळी.. सप्त रंगात न्हाऊन आली.."


आजीने नातीला स्वराला बेसनाचा लाडू भरवला आणि सांगितले - " दिवाळी आणि आनंद राजाला पण महिती नाही दिवाळी. कारण त्याच्याकडे रोजच असते हे लाडू त्यातला खरा आनंद सामान्य माणूस लुटतो.. सामान्यांची दिवाळी.. "


समाप्त


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®.

🎭 Series Post

View all