दिवाळी उत्सव नात्यांचा

Joy of diwali celebration

रावणाचा वध करून प्रभू राम जेव्हा अयोध्या मध्ये परतले होते तेव्हा अयोध्यावासियानी त्यांच्या स्वागता साठी हजारो दिव्यांची रोषणाई केली होती. म्हणून तेव्हा पासून दिवाळी हा दिव्यांचा सण आपण साजरा करतो.
       दरवर्षी दिवाळी ची आपण आतुरतेने वाट बघतो. दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, घराला आकर्षक आकाशकंदील, रोषणाई,लाडू,चिवडा,चकली, फटाके.मित्र मैत्रिणी, नातेवाईक भेटतात. सगळीकडे आनंदी वातावरण असते.
    तसेच प्रतीक ही दिवाळीच्या सुट्या कधी लागतील याची वाट बघत होता. शेवटचा सहामाही पेपर संपला आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. प्रतीक नाचतच घरी आला. "मम्मी , मला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. आता प्लिज मला उद्या पासून लवकर उठवू नको. मला झोपू दे सकाळी."प्रतीक मम्मी ला म्हणाला. "अरे हो बाळा झोप फक्त दिवाळी च्या दिवशी अभ्यंग स्नान असत तेव्हा फक्त लवकर उठ." मम्मी प्रतीक ला म्हणाली. प्रतीक -"अग हो मम्मी आता काही तरी खायला दे खूप भूक लागली आहे.मम्मी -"हे घे, शंकरपाळी बनवलेली आहे कशी झाली आहे सांग." प्रतीक -" खुप छान. आता मी खेळायला जातो."
           दुसऱ्या दिवशी प्रतीक आणि त्याची बहीण देविका ने मम्मी पप्पा सोबत दिवाळी छान साजरी केली. मम्मी ने खूप सारे दिवे लावले. छान रांगोळी काढली. देविका आणि प्रतीक ने फटाके फोडले. दोघांना खूप मज्जा आली. अजून दिवाळीच्या सुट्ट्या बाकी होत्या. म्हणून प्रतीक आई ला म्हणाला, मम्मी मामा कडे कधी जायचं आहे? हो, उद्या जाऊया. देविका आणि प्रतीक मामा कडे जायचं आहे म्हणून अजून खुश झाली. तिकडे त्यांचे मामाची मुला भेटतील म्हणून ते खुश होते. कारण त्यांची मिळून धमाल मस्ती मज्जा असते 
      दुसऱ्या दिवशी मम्मी पप्पा प्रतीक देविका मामा कडे जायला निघाले. मामा कडे पोहोचल्या वर आजी आजोबा मामा मामी आणि त्यांची दोन मुलं रोहन आणि काव्याला भेटून प्रतीक आणि देविकाला खूप आनंद झाला. 
        आता दुसऱ्या दिवशी पासून च प्रतीक आणि देविका च मामाच्या मागे लागन चालू झाला. मामा आम्हला कुठे तरी फिरवायला ने ना. घरात बसून कंटाळा आलाय. मामा म्हंटला हो नक्की. 
     मग मामा ने फिरायचा प्लॅन ठरवला. मुला ही मामाच्या मागे,मामा कुठे नेतोय फिरायला सांग ना. मामा- " तुमच्या साठी सरप्राइज आहे. मुला आणि मामा गाडीत बसून निघाली फिरायला. रोहन आणि काव्या पण सोबत होते. 
         सगळे एका ठिकाणी पोहोचले. ती एक शाळा होती. अंध मुलांची शाळा. मुलं मामा ला, " मामा हे कुठे आणलाय तू?" मामा -"चला आत सांगतो." मुलं निघाली मामा च्या मागे. आतमध्ये अंध मुला त्याची काम करत होती. कोणी पेटी वाजवत होता. कोणी गाणं म्हणत होत. तर कोणी त्यांच्या ब्रेल लिपी मधून अभ्यास करत होते. मामा मुलांना म्हणाला, "ही अंध मुला आहेत. त्यांच्या जीवनात देवाने अंधकार दिला आहे. पण तरी त्यांच्या कडे बघा ते किती आनंदी आहेत." मुलं त्यांना बघतच राहिली. मामा ने त्या अंध मुलासाठी दिवाळी ची मिठाई आणली होती. ती मुलांच्या हाताने वाटप केली. 
     प्रतीक मामा ला म्हणाला, " मामा आपण दिवाळी दिवा लाऊन उजेड करून साजरी करतो. पण ह्यांना तर काहीच दिसत नाही. त्यांना दिवाळी ची काय मजा वाटत असेल ?"
 तेवढ्यात एक अंध मुलगा येतो. तो सांगतो, हो देवाने आमच्या जीवनात अंधार केलंय. पण आमच्या मनात प्रकाश आहे. आम्ही नाचतो, गाणे म्हणतो आम्ही आमची दिवाळी अशी साजरी करतो."
मग प्रतीक,देविका, रोहन आणि काव्या ने ही त्या मुलान सोबत डान्स केला. आणि अश्या प्रकारे प्रतीक आणि देविका ची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी झाली.