1 नोव्हेंबर 2021- वसुबारस..

Diwali Information

भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा हा दिवस..

हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही ही पूजा केली जाते.

आपला देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे.

या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. 

ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते.

गायीच्या पायावर पाणी टाकावे.

गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी.

निरांजनाने ओवाळून घ्यावे.

गायीच्या अंगाला स्पर्श करावे.

गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा.

नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.

अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी -  हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो,  बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते, असे मानले जाते.

दिवाळी चा पहिला दिवस वसुबारस, 

गाय आणि वासराच्या अंगी असणारी

उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी

आपणास लाभो. ही दिवाळी तुम्हा सर्वांना

सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.

नमस्कार... सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )