दिवाळी नात्यांची...रोषणाई आनंदाची ( भाग 5 )

संध्याकाळ पर्यंत सगळं घर भरून गेलं होतं , डेकोरेशनच सामान , आकाश कंदील , लायटिंग आणि काय काय.. फराळाच्या पदार्थांचा सुगंध अगदी मस्त दरवळत होता.मुलांचा उत्साह बघून विजय रावांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले !सगळ्या मुलांना त्यांनी जवळ घेतले " किती कराल रे पोरांनो ! या म्हाताऱ्याला अगदी धन्य करून टाकताय अगदी.कधी मोठे झालात आणि या बापाला अगदी प्रेमाच्या बंधात बांधून टाकलत..."" बाबा पुरे आता आम्ही का परके आहोत.आणि आमच्या सारख्या अनाथ मुलांचे बाबा झालात याचे उपकार आम्ही आयुष्यभर नाही फेडू शकत.काय काय केलंय तुम्ही आमच्यासाठी .एक बापही स्वतःच्या मुलासाठी करणार नाही इतकं तुम्ही आम्हा परक्या मुलांसाठी केलंय..."मुलांचाही बांध फुटला.वत्सलाबाई सुद्धा डोळ्यातील अश्रू थांबवू नाही शकल्या..." आता पुर आणताय का दिवाळीत..." प्रियमच्या बोलण्याने सगळे हसले "आणि हे प्रिया साठी सरप्राइज आहे हे विसरू नका बरका कोणी.आणि मी आणि प्रिया पण सगळ्यांना एक सरप्राइज देणार आहोत .चला मी आता पळतो..."

©® स्मिता भोस्कर चिद्रवार.

दिवाळी नात्यांची...रोषणाई आनंदाची ( भाग 5 ) 



दिवाळी जवळ आली होती. लेकीचा पाहिला दिवाळसण माहेरी होतो.विजयरावांना लेकीची पहिली दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करायची होती.पण "आपण एकटे कसे काय करणार ? प्रियाच्या घरची माणसं तर खूप जुन्या विचारांची , सगळं काही रीतीला धरून व्हाव अशी आपेक्षा असणारच त्यांची .त्यांचाही एकुलता एक मुलगा आहे ना .काय करावं ?

वत्सला बाईना सांगून करूया जमेल तसं..." अश्या विचारात असतानाच त्यांची तंद्री भंगली.दारात प्रियम उभा होता...
" बाबा कसे आहात तुम्ही ? दिवाळी जवळ येतेय आणि मुलीचा पहिला दिवाळसण तिच्या माहेरी असतो ना त्यामुळे आमचा दिवाळसण तुम्ही इथे करावा अशी माझ्या आईची इच्छा आहे पण तुम्ही आजिबात काळजी करू नका.मी सगळी मदत करेन आणि आपली गँग तर आहेच.वत्सलाकाकू आणि सगळेजण येतीलच आता.मी बोलावलंय सगळ्यांना .सगळं ठरवूनच टाकू..."

प्रियमच बोलणं संपायच्या आतच सगळे गोळा झाले.सगळ्यांनी मिळून दिवाळसण दणक्यात साजरा करायची प्लॅनिंग केली.
वत्सलाबाईंनी दिलेल्या लिस्ट प्रमाणे सामानाच्या खरेदीला मुलं पळाली.वत्सलाबाई मुलींना घेऊन किचन मध्ये गेल्या.प्रियम आणि विजयराव आहेर आणि बाकीच्या गिफ्टच्या खरेदीला गेले.
संध्याकाळ पर्यंत सगळं घर भरून गेलं होतं , डेकोरेशनच सामान , आकाश कंदील , लायटिंग आणि काय काय.. फराळाच्या पदार्थांचा सुगंध अगदी मस्त दरवळत होता.
मुलांचा उत्साह बघून विजयरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले !
सगळ्या मुलांना त्यांनी जवळ घेतले " किती कराल रे पोरांनो ! या म्हाताऱ्याला अगदी धन्य करून टाकताय अगदी.कधी मोठे झालात आणि या बापाला अगदी प्रेमाच्या बंधात बांधून टाकलत..."
" बाबा पुरे आता . आम्ही का परके आहोत ? आणि आमच्या सारख्या अनाथ मुलांचे बाबा झालात याचे उपकार आम्ही आयुष्यभर नाही फेडू शकत.काय काय केलंय तुम्ही आमच्यासाठी .एक बापही स्वतःच्या मुलासाठी करणार नाही इतकं तुम्ही आम्हा परक्या मुलांसाठी केलंय..."
मुलांचाही बांध फुटला.वत्सलाबाई सुद्धा डोळ्यातील अश्रू थांबवू नाही शकल्या...
" आता पुर आणताय का दिवाळीत..." प्रियमच्या बोलण्याने सगळे हसले "आणि हे प्रिया साठी सरप्राइज आहे हे विसरू नका बरका कोणी.आणि मी आणि प्रिया पण सगळ्यांना एक
सरप्राइज देणार आहोत .चला मी आता पळतो.कधीपासून फोन करतेय तुमची लाडकी ."
सगळे जण मस्त तयार होऊन बसले होते , घर सुद्धा अगदी स्वागतासाठी सज्ज होतं.गाडीचा हॉर्न वाजला तसा सगळे बाहेर धावले.
प्रिया , प्रियम आणि त्याचे आई बाबा गाडीतून उतरले...

🎭 Series Post

View all