दिवाळी फराळ - लाडू Recipe In Marathi

अगदी अचूक प्रमाणात मस्त फराळ बनवा

बेसन लाडू


साहित्य : अर्धा किलो हरभरा डाळ, १५० ग्रॅम साजूक तुप, पावकिलो पिठीसाखर, एक चमचा वेलची जायफळ पुड, बदाम काजू पिस्त्याचे काप आणि तुम्हांला आवडत असेल तर मनुके पण लावू शकता लाडू बांधल्यावर वरतून.

कृती : सर्वप्रथम डाळ एका सुती कपड्याने स्वच्छ पुसून मग खरपुस गुलाबीसर १५ मिनिटे भाजून घ्यावी. नंतर डाळ थंड झाल्यावर ती मिक्सरमध्ये रवाळ बारीक करुन घ्यावी. आता एका मोठ्या कढईमध्ये तुप घालून डाळीचे पिठ घालून भाजून घ्यावे. पिठ भाजायला साधारणपणे २० ते 25 मिनिटे लागतात. खमंग वास सुटतो पिठ भाजताना.
पिठ भाजून घेतले की ते थंड करायला मोठ्या ताटात पसरवून ठेवायचे. गरम पिठात पिठीसाखर घातली तर लाडू कडक होतात. १५ ते २० मिनिटानंतर  पिठ थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची जायफळ पुड घालून छान एकत्र करुन घेणे. आता त्याचे छान छोटे छोटे लाडू वळून घेणे. त्यावर आवडीनुसार काजू बदाम पिस्त्याचे काप लाऊन सजवायचं.


रव्याचे लाडू

साहित्य : एक किलो बारीक रवा, अर्धा किलो साखर (थोडी मूठभर जास्तच घ्यायची), पावकिलो बेसन, वेलदोडा जायफळची बारीक पूड एक मोठा चमचा, साजूक तूप पावकिलो पेक्षा थोडंस जास्त.

कृती : सगळ्यात पहिले बारीक रवा कढईत चांगला भाजून घ्यायचा अगदी थोडंस तूप घालून. कारण रव्याला जास्त तूप लागत नाही भाजायला. आता त्याच कढईत बेसन पीठ घालायचं आणि त्यात चांगलं तूप घालून छान खरपूस भाजून घ्यायचं. तुमच्या लक्षात आलेच असेल की रव्या पेक्षा बेसन भाजतांना त्याला जास्त तूप लागते.

आता रवा आणि बेसन पीठ एका परातीत काढून घ्यायचे, त्यावर पिठी साखर घालायची आणि वेलदोडे जायफळ पावडर घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे. आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात भरून एक गरका मारून घ्यायचा. म्हणजे काय होत, ते सर्व मिश्रण एकदम एकजीव होऊन लाडू बांधायला एकदम सोपं होतं. आता त्या मिश्रणाचे छान छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे.

हे लाडू इतके मस्त होतात की तोंडात टाकल्या बरोबर जिभेवर विरघळून जातात. एकदा करून बघा नक्की, खूप आवडतील तुम्हांला.

किचन तुमचे आणि रेसिपी माझी. 

खात रहा आणि अशाच छान छान रेसिपी साठी मला वाचत रहा, आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. 


धन्यवाद 

🎭 Series Post

View all