आईवडिलांनी आणि महेशने खूप समजून सांगितल्यावरही,आपल्या स्वभावाप्रमाणे मनिषाने शेवटी घटस्फोट घेतलाचं. आर्यहीला घेऊन ती एकटी राहू लागली. आर्यहीला सांभाळण्यासाठी मनिषाने घरी एक आया ठेवली आणि ती तिचे जीवनातील ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वच्छंदपणे यशाची भरारी घेऊ लागली.
तिच्या आईवडिलांना लेकीचा असा संसार पाहताना खूप वाईट वाटत होते.मनिषाने आपल्या गुणांनी मिळवलेले यश,तिची प्रगती हे सर्व खूप कौतुकास्पद होते. पण त्यासाठी नात्यांचे तुटणे ..हे त्यांना आवडले नव्हते.
घटस्फोटाचा मनिषाच्या आयुष्यावर काही परिणाम दिसत नव्हता. पण घटस्फोटामुळे महेशचे आयुष्यचं बदलून गेले होते. अगोदरच शांत राहणारा महेश.. अजूनच खूप शांत व दुःखी राहू लागला. त्याची ही स्थिती पाहून मनिषाच्या आईवडिलांनाही वाईट वाटायचे. त्याचे कोणत्या शब्दांत सात्वन करावे. हे ही त्यांना समजत नव्हते. तो त्यांच्याशी पूर्वी प्रमाणेच आदराने, प्रेमाने वागायचा आणि आर्यहीला भेटण्यासाठी तो उत्सुक असायचा.
तो ही हुशार होता. चांगल्या पगाराची नोकरी करणारा होता. जीवनात पैसे असणे गरजेचे आहे , पण नात्यांना जपणे हे ही महत्त्वाचे असते. असे त्याचे मत होते.
जीवनात आपण जितकी प्रगती कराल तितक्या आपल्या अपेक्षा वाढतचं जाणार आणि यशाच्या मागे धावता धावता आपण आयुष्यात खूप पैसा,प्रसिद्धी जरी मिळवत असलो तरी खूप काही गमवत असतो आणि नंतर वेळ निघून गेल्यावर उरतो तो फक्त पश्चाताप!

मनिषाने माझ्यावर जे प्रेम केले आणि संसाराची जी स्वप्ने दोघं मिळून पाहिली होती...ते सर्व खोट होतं का ? मनिषाला आयुष्यात नात्यांपेक्षा तिची ध्येय महत्त्वाची होती ..तर मगं तिने लग्न तरी का केले ?आणि आर्यहीला जन्म तरी का दिला? यामागेही तिचे काही कारण , उद्दिष्ट असावे का ?
या विचारांनी महेशला खूप त्रास व्हायचा. त्याला मनिषाच्या गुणांचे कौतुक होते. तो तिच्या प्रगतीच्या आड येणार नव्हता. पण घटस्फोटाचा एकतर्फी विचार करत घटस्फोट घेऊन ती आनंदाने राहू लागली. पण महेशचा आणि आर्यहीचा विचार तिने केलाच नाही.

काळ कोणासाठी थांबत नाही.तो पुढे सरकतच असतो.
महेशही आपले दुःखी जीवन जगतच होता. अधूनमधून आर्यही ला भेटायचा. ते आनंदाचे क्षण पुढच्या भेटीपर्यत तो जपून ठेवायचा. मनिषाचीही त्याला आठवण यायची. तिला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी तिला फोनही करायचा. पण ती आपल्या कामात बिझी असायची आणि बोलली तरी पूर्वीसारखे प्रेम तिच्या बोलण्यात नसायचे. नात्यातील प्रेम जाऊन फक्त शिष्टाचार राहिला होता.
क्रमशः
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा