Jan 19, 2022
नारीवादी

Divorce... ति आणि समाज

Read Later
Divorce... ति आणि समाज

समाज...तिन अक्षरांचा शब्द...पण धमक केवढी आहे या अक्षर समूहात...अगदी उच्चतम वर्गापासून मध्यमवर्गीय लोकांमधे याची धास्ती आहे..किंवा असते म्हणूयात...अमूक केल तर समाज काय म्हणेल, तमुक केल तर समाज नाव ठेवेल..बापरे!!!! केवढी ही भिती.....
मिरा आई वडिलांची दोन भावांमधे एकुलती ए्क मुलगी..देशपांडेंच एकटच कन्यारल असल्याने अगदी लाडा कोडात वाढलेल...जशी लग्नाच्या वयाला आली तशी देशपांडेंनी एक से बढकर एक स्थळ पाहायला सुरुवात केली....असंच देशमुखांच स्थळ चालून आल...स्थळ अतिशय देखण..हो देखणच म्हणेन मी..कुणाचीही नजर लागावी अस......देशमुखांचा स्वतःचा कापडाचा व्यवसाय होता...आणि स्वतःचा मोठा बंगला, गाडी, नोकर चाकर सार काही सुख त्यांच्या घरी नांदत होत....मिराचे वडील हे सर्व पाहून हरकूनच गेले होते..त्यांनी खानदान घरदार पाहून हो सांगितल...आणि मिराच अमित सोबत लग्न लावून दिले...मिरा ही खूप खूष होती..लग्नानंतर एक दोन महिने तिला अगदी स्वर्गात असल्यासारखं वाटल....पण हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या होत्या. अमित रात्र रात्र घराबाहेर रहायला लागला...आलाच तर अगदी दारुच्या नशेत यायच...मिरा ला काही कळत नव्हत कि अचानक हे असं का व्हायला लागलय??? तिने कंटाळून एक दिवशी बोलता बोलता सासूबाईं समोर हा विषय ठेवला. सासूबाईंनी उडवा उडवीची उत्तरे दिली आणि अगदी हळूवार विषय बदलला.....
आज तिनी ठरवल कि याबद्दल अमितशी बोलायचच...तिनी रात्रभर वाट पाहिली अमित आला नाही...सकाळीच आला...दारुच्या नशेत धुत्त..सरळ अंघोळीला निघून गेला. बाहेर आला मिरा हातात चहा घेऊन उभी होती..अमित आला अन तिने त्याला न राहावता लगेच विचारून घेतले कि तुम्ही असे का वागताहात??माझ काही चुकतय का?? तस असेल तर सांगा?? आज अमित ही बोलून गेला ,, मिरा मला माफ कर पण माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे...मि तिच्यावर खूप प्रेम करतो पण घरातल्यांचा दबाव आणि आत्महत्या करण्याच्या धमक्या यामुळे मला तुझ्याशी लग्न कराव लागल..पण मी तुला कधीच नवऱ्याच सुख किंवातुला कधीच आपल करु शकत नाही...मीराच्या पायाखालची जमिन सरकली होती...त्या दिवशी संध्याकाळी मिरा तिच्या घरी निघून गेली...आणि खूप विचार करून तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला....घरातून वडिलांचा या गोष्टीला पूर्ण विरोध हता...पण तिने घटस्फोट घेतला......

मीरा.... .घटस्फोटित शिक्का...घरी येईल जाईल तो पाहुना ( समाजच) पोरीच वाईट झाल हा...पण सासर तर चांगल होत..आपल्याच पोरीत काहीतरी चुक असेल..।घ्यायचा थोडा कमीपणा...आापली पोरीची जात, आता कोण करेल हिच्याशी लग्न..एवढा ताठरपणा पोरीच्या जातीला बरा नव्हे... राहायच तिथेचं झाल असत सरळ वगैरे वगैर....बरं येता जाता टोमणे ते वेगळेच.....मिरा...तिच्या आयुष्यातल हे मृगजळ आहे ते ति ओळखून होती, या नात्याला काही अर्थ नव्हता ना या नात्यात आपलेपणा नव्हता ना तो कधी येणार होता ...इ्थ घुसमटण्या पेक्षा स्वतंत्र राहव योग्य हा तिला योग्य वाटलेला निर्णय होता, तर यावर बोलणारा हा समाज आहे तरी कोण???

हे झाल मिराच, अशा अनेक मिरा आहेत ज्या सासरच्या जाचाला , नवऱ्याला कंटाळून , घटस्फोट घेऊन मुलांसोबत स्वतच आयुष्य धडाडीने जगायचा प्रयत्न करतात, पण समाजचा मात्र त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही वेगळाच असतो. स्वतःच्या परिवारान , ' मुलीला तू घटस्फोट घिऊ नकोस ,जा सासरी रहा, माहेरी येऊन राहिलीस तर समाज नाव ठेवेल अस बोलताना मी पाहिलय...मग मुलीच सासरी काही का होईना....
मला एक कळत नाही कोण हT समाज , काय हा समाज, जो सुखात सोबत असतो त्यातही नावे ठेवाय जाग शोधतो...दुखात मजा करायला येता..मजा घ्यायला येतो...त्यामुळे" वेगळ होण ही काही चुक नाही....कोणी मजा म्हणून घेत नाही...पण ज्या नात्यात एकमेकांबददल आदर नाही,,त्यास्त्रिला जर नात्यात किंमत नाही तर तिने स्वतच्या स्वाभिमानाला न कुचडता वेगळ अभिमानाने ताठ मानाने जगण केव्हाही चांगल..... प्रत्येक मुलिन स्वतचा पायावर उभ राहण गरजेच आहे...ताठ मानेन जगण्यासाठी शिक्षण घेण गरजेच आहे...
घटस्फोट या गोष्टीला मी मुळीच दुजोरा देत नाहीये, पण ज्या नात्यात विश्वास नाही, मुलाबाळांची घुसमट तिथे थांबण का योग्य हे मला समजत नाही.
 समाज काय ना ,,चांगलही म्हणतो अन नावही ठेवतो तेव्हा आयुष्य आपल आहे समाजाच नाही...आपल्या मर्यादा आपण राखायच्या अन बेधुंद जगायच...उडत्या पाखरासारख....।.स्वच्छंदी अन् मनसोक्त!!!!!

कल्याणी राजगे शिंदे.....
लेख आवडल्यास like आणि comment करा व नावासहित शेअर करा..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now