Jan 26, 2022
नारीवादी

डिव्होर्स पेपर -

Read Later
 डिव्होर्स पेपर -

संसाराकडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन :


संसार - म्हणजे दोन चाकं जी भरपूर वजन अगदी सारखं  वाटून घेतात. नवरा आणि बायको हीच ती  २ चाकं. कधी कधी एक चाक पंक्चर झालं कि दुसरं चाक गाडीचा लोड घेतं. आणि असं करत करत ते गाडी शेवट पर्यंत जाते.. हॅप्पिली एव्हर आफ्टर.. 

पण काही उदाहरणं बघितली तर असा वाटतं, " संसार हा एकाच चाकावर चाललाय, दुसरा चाक मात्र फक्त नावालाच आहे "
असच एक स्टोरी आठवली :


" अंकिता " - लहानपानासपुन अगदी चुणचुणीत- शाळेत पहिला नंबर - सगळ्यांची आवडती - फक्त अभ्यासात नाही तर गाण, नाच पैंटिंग ह्या सगळ्यात अगदी हुशार. पण अंकिता ची घरची परिस्थिती  आर्थिक दृष्ट्या मजबूत नव्हती. म्हणून शाळा संपल्या नंतर तिला दुसऱ्या शहरात असलेल्या कॉलेजात नंबर लागला असून देखील, तिथे गेल्या नंतर बाकीचा खर्च तिच्या आई=वडिलांना झेपणारा नव्हता. म्हणून  ती त्याच शहरात शिकली. ग्रॅज्युएशन  च शेवटचं वर्ष असतांना तिला एक छान  श्रीमंतघरातलं  स्थळ आलं. तिची मात्र पुढे शिकायची भरपूर इच्छा होती. तिने आपली इच्छा आई-वडिलांना सांगितली पण आई-वडिलांची इच्छा फक्त हीच होती कि " आपण ज्या गरिबी मध्ये दिवस घालवले ते दिवस आपल्या मुलीला बघावे लागू नयेत "
आणि अंकिता हे चांगला जाणून होती.. 

अंकिता दिसायलाही  सुंदर, रविवारी तिला बघण्याचा कार्यक्रम ठरला. काहीही मेकअप न करता ती सुंदर  दिसत होती.. आत्ताच धुतलेले ते लांब काळेभोर केस.. बाणेदार डोळे.. कोणताही मुलगा होच म्हणेल अशी मुलगी होती ती,,


मुलाकडचे २ कार घेऊन बघायला आले. अंकिता च्या चाळीत कोणाकडे कार नव्हती. २ कार येताच सगळे चाळीतले लोक बघायला आले. सगळ्याचा नाश्ता झाला. मुलगा पण रुबाबदार च होता. मुलाकडच्यांनी काही प्रश्न विचारले आणि मुलाची आई अंकिता ला म्हणाली - " बेटा , तुला स्वयंपाक बनवता येतो  ना"? 
अंकिता ने मान हलवली.  अजून काही प्रश्न विचारून मुलाची आई म्हणाली - " मुलगी आम्हाला पसंत आहे पण कुंडली बघून आम्ही होकार कळवू"


२ दिवसांनी अंकिता च्या वडिलांना फोन आला.. अंकिता चे वडील खूप खुश  झाले. 
१ महिन्याने लग्न पार पडलं आणि अंकिता चा संसार सुरु झाला. 
अंकिता चा नवरा " सुशांत " स्वभावाने खूप शांत म्हणून तो खूप कमी बोलत असे. पण अंकिता ची  पण अपेक्षा होती कि आपल्या नवऱ्याने आपल्याला कधीतरी सिनेमा ला न्यावं, कधीतरी सरप्राईस प्लॅन करावं. पण अंकिता ला कधीच ते सुख मिळालं नाही. 

अंकिता शिकलेली असल्यायले तिचे विचार मॉडर्न होते. तिची जॉब करायची इच्छा होती पण नवऱ्याच्या  धाकामुळे ती काहीच करू शकली नाही. तिने नवीन उपाय शोधला तिच्या नवऱ्याचा लॅपटॉप घरी असायचा.. तिने लॅपटॉप वॉर काही वर्क फ्रॉम होमी च्या साईट वरून काम घ्यायला सुरवात केली.. आणि तिच्यात आत्मविश्वास यायला लागला.. 
आणि तीला समजला की  आपल्याला स्वतःच च अस्तित्व च नाहीये.. सगळे जण सुशांत ची बायको म्हणून ओळखतात. 

तिने ठरवलं कि मला पण आत्मसन्मान मिळाला पाहिजे, कारण आमच्या संसारात जितका सुशांत च भाग आहे तेवढाच माझा. मी फक्त सुशांत चा स्वयंपाक बनवून द्यायला नोकर नाही,,,,,.. त्याचे कपडे धुवून द्यायला.... त्याचा बेड नीट करायला... त्याचे कपडे इस्त्री करायला त्याची नोकर नाही.. हा आमच्या दोघांचा संसार आहे म्हणून दोघांनीही सारखाच योगदान द्यायला हवं. ह्या संसारामध्ये जेवढा आदर त्यान्ना आहे तेवढा आदर मला सुद्धा मिळाला पाहिजे. 

संध्याकाळी सुशांत घरी आला... आपली बॅग त्याने सोफ्यावर फेकली.. आणि म्हणाला 
" अंकिता. .. पाणी आण ग "

अंकिता ने पाण्याचा ग्लास दिला/. 

सुशांत ने आपले सॉक्स सोफ्यावर फेकले आणि पाणी प्यायला लागला.. 

" तुला समजत नाही का? उन्हाळा चालू झालाय मला थंड पाणी आणून दे  एवढा पण समजत नाही का तुला ?

अंकिता च्या मनात प्रचंड राग होता तरीसुद्धा ती शांततेनें म्हणाली " एक काम करा ना, तुम्हीच उठून पाणी घ्या.. फ्रिज मध्ये बाटली आहे ,,

हे ऐकून सुशांत चा इगोला धक्का पोहोचला " सुशांत चा राग अनावर झाला तो एकदम रागात उठून किचन मध्ये गेला पाणी प्यायला आणि ग्लास  घेऊन हॉल मध्ये आला... 

आणि  हो.. आज पाण्याची बाटली मी भरून ठेवली, उद्या पासून रोज रात्री भरून ठेवत जा... 

सुशांत चा राग अनावर झाला. आणि तो तसाच पाय आपटत आपल्या रूम मध्ये गेला. 

रात्री जेवणाच्या वेळेस सुशांत किचन मध्ये आला तेव्हा स्वयंपाक तयार नव्हता.'
तिथे एक पत्र लिहिलेले दिसलं 


प्रिय नवरा,

आपला लग्न झालं तेव्हा आपण दोघांनी शपथ घेतली " एकमेकांच्या सुख दुखात साथ देऊ " 
पण आजपर्यंत मीच तुला साथ दिली , आपण दोघं जण एकाच रस्त्यावरून जात आहोत पण तो रास्ता एकतर्फी आहे जिथे फक्त तूच पुढे चाललायस. 

लग्नानंतर मी तुमच्या साठी स्वयंपाक करत होते कारण मला तुम्हाला आवडीचे पदार्थ बनवून द्यायला आवडायचा.. 

ऑफिस मधून थकून घरी आल्यावर तुम्हाला पाणी देण्यात मला आनंद वाटायचा कारण तुम्हाला  आनंदी बघितलेला मला आवडायचं.
 
तुमचे असेच फेकेलेले कपडे मला इस्त्री करून कपाटात रचायला आवडायचं  कारण मला ते करण्यात आनंद वाटायचा. 

तुम्ही घरी आल्यावर मला खायला काय आहे आज हे विचारलेला आवडायच, कारण तुमच्या रुबाबामागे प्रेम आहे असा मला वाटायचं,. 

पण गेल्या काही महिन्यांपासून मला ह्यातला काहीच वाटत नाही. फक्त एकाच वाटत की तुम्ही मला एक मोलकरीण करून ठेवलंय आणि पगारा ऐवजी तुम्ही मला खाण्या-पिण्याचा खर्च  देताय.. 

संसार म्हणजे २ चाकं मान्य आहे मला.. हे पण मान्य आहे की  तुम्ही घराला आर्थिक आधार देताय.. आणि मी उरलेला आधार देतेय. पण गेल्या महिन्या  पासून तुम्ही ज्या प्रकारची वागणूक मला देताय ते मला अजिबात मान्य नाही.. 


मी तुम्हाला स्वयंपाक करून द्यायला तयार आहे, तुमच्या आई-वडिलांची सेवा करायला तयार आहे... जे सगळं सांगाल ते करायला तयार आहे.. पण फक्त एक नोकरानी नाही तर "राणी" बनून मला वागवलं तर मी सगळं करायला तयार आहे"

इतके दिवस माझा आत्मसन्मान मी विसरून गेले होते.. मी सुद्धा या संसारात सारखीच साठी आहे.. आणि आपण दोघांनीही एकमेकांना सारखाच आदर आणि सारखीच वागणूक दिली  तरच हा संसार पुढे टिकेल.. 

तुम्ही मला " ए अंकिता... पाणी आण  ग" हे म्हणण्या पेक्षा " अंकिता, पाणी देतेस का ग"? हे म्हंटलं तरी तुमचा आदर दिसतो.. पण ह्या पुढे  उद्धटपणे वागणूक दिलेली मला चालणार नाही.. 


माझा स्वाभिमान आज आपल्या संसारामध्ये आला आहे.. तुम्हाला वरील अटी मान्य असतील तर मला घ्यायला घरी या नाहीतर घटस्फोटाचे कागदपत्र तुमचा घरी लवकरच पोहचतील.. 

 

 

 


सुशांत डोक्याला हात लावून खाली बसतो .


 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Gigglemug

for sure.. not a Writer

Hello there..! I am no professional writer. but there is a voice inside this little woman which I feel should be Expressed on this beautiful platform IRA to provide hortatory thoughts to the strong ladies out there. Cheers !