रमाला त्यादिवशी देवळात ऐकलेल्या गाण्याचे शब्द आठवले आणि तिने काहीतरी निश्चय केला आणि ती तिची रुग्णाला तपासायची साधनं घेऊन बाहेर पडली. तिच्या परीने तिने उपचार केले आणि लोकं बरी व्हायला लागली. सुरुवातीला लोकांनी विरोध केला पण प्रश्न जीवाचा होता. हळूहळू आजारी पडणं कमी झालं. रमाने काळजीने सांगितलेल्या सूचना लोकांना पटायला लागल्या. त्याप्रमाणे लोकं काळजी घ्यायला लागली. त्यांना रमाच्या शिक्षणाचं महत्व पटलं.
आज तर रमेने सगळ्यांच्या विरोधात जाऊन डॉक्टर व्हायचं शिक्षण घेतलं नसतं तर आज गावातल्या कितीतरी घरचे दिवे विझले असते, पण या पणतीने तसं होऊ दिलं नाही. गावकऱ्यांनी तिचा जाहीर सत्कार करायचा ठरवला. त्यांनी रमाला बोलावलं. सत्काराच्या वेळी त्यांनी तिला तिचं मनोगत व्यक्त करायला लावलं. तेव्हा ती म्हणाली, "सर्वांना प्रेम आणि आदरपूर्वक नमस्कार. तुम्ही माझा आज जो सत्कार करताय तो खरंतर माझ्या आईचा व्हायला हवा होता. तिने जर मला सकारात्मकतेचं महत्व कधीच पटलं नसतं. माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तिचं कार्य अपूर्ण राहिलंय. ते पूर्ण करण्यासाठी तुमचं साहाय्य आवश्यक आहे. इथे जमलेल्या सवाष्ण गृहीणीनी उद्या घरी यावं, अशी मी त्यांना विनंती करते."
तसं तिच्या तोंडावर दार बंद करणाऱ्या बायकांची मान शरमेने खाली गेली.
गावकऱ्यांनी तिच्या आईच्या स्मरणार्थ पुतळा बांधायचा प्रस्ताव रमेपुढे ठेवला. रमेने त्यावर शांतपणे उत्तर दिलं. "आईच्या स्मरणार्थ जर काही करायचंच असेल तर गावात असंख्य डॉक्टर्स तयार होतील असं विद्यापीठ तयार करा. त्यात तुमच्या मुलांना शिकवा आणि त्यांच्या आयुष्याला उंच भरारी घेऊद्या."
रमेचे शब्द ऐकून गावाकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आणि विद्यापीठ तयार होण्याची पायाभरणी झाली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा