Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दुरावलेली प्रीत - (ट्रेलर)

Read Later
दुरावलेली प्रीत - (ट्रेलर)

 

कथेचे नाव:- दुरावलेली प्रीत..

विषय :- प्रेमकथा

फेरी :- राज्यस्तरीय करंडक कथामालिका             मोबाईलवर कोणाशी तरी कॉलवर बोलत त्याची पावलं वेगाने क्लासरूमच्या दिशेने पडत होती. आजूबाजूच्या मुलींच्या नजरा तर त्याच्यावर होत्याच. पण असं कोणीही नव्हतं ज्याचं लक्ष त्याच्याकडे जात नव्हतं. कारण तो खूप मनमिळावू आणि सर्वांशी मैत्री असणारा होता. निम्म्यापेक्षा जास्त कॉलेजमधल्या मुलांची नावं त्याला तोंडपाठ असायची. मोबाईल खिशात टाकून त्याने क्लासरूममध्ये प्रवेश केला आणि त्याचा नवा फ्रेंड्स ग्रुप त्याला हाय करत होता. टीचर अजून आले नाही हे नशीब ! तो आपल्या सीटवर जाऊन बसला. बाजूच्याच बेंचवर असणाऱ्या पूर्वाने त्याला 'गुड मॉर्निंग' विश पण केले. तो हसला आणि त्यानेही तिला रिप्लाय केला. 


"गुड मॉर्निंग..! " 


________


               आपले केस वेणीमध्ये घट्ट बांधत ती तयार होत होती. आधीच कॉलेजला उशीर झाला असल्यामुळे पहिलं लेक्चर चुकवावंच लागणार होत बहुतेक. सॅन्डल पायात अडकवत ती चटकन बाहेर पडली. तशी ती सर्वांमध्ये मिसळणारी, हसतमुख आणि बडबडी होती. पण नवीन कॉलेजला आल्यापासून ती तशी शांत शांत राहायची. तिचे जास्त मित्र मैत्रिणी नव्हतेच. कित्येक जणांना तिच्याशी मैत्री करायचीही होती. पण ती आपली क्लासरूम आणि आपलं हॉस्टेल सोडून इतरत्र भटकतच नव्हती. जवळजवळ धावत ती क्लासमध्ये शिरली. नुकतीच लेक्चरला सुरुवात झाली होती. 


"सॉरी सर..." म्हणत ती आपल्या सीटवर जाऊन बसली. 


              सरांनीही एकदा तिच्याकडे पाहून पुन्हा लेक्चरला सुरुवात केली. ती पहिल्यांदाच उशिरा आली होती. त्यामुळे तिला धारेवर धरायचं काही कारणच नव्हतं. 


__________         ही कथा आहे एकमेकांपासून फार दूर असणाऱ्या दोन जीवांच्या प्रेमाची ! लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप म्हटलं ते की प्रेमासोबत आले ते गैरसमज, इन्सिक्युरिटिज आणि संशय..! अंतर वाढल्यामुळे त्यांच्यातील प्रीत दुरावेल का ? दुरावलेल्या प्रीतीतून नवी प्रीत जन्म घेईल का ? 


Stay Connected..! 


©® तनुजा संतोष प्रभुदेसाई. 

जिल्हा - रायगड - रत्नागिरी. (प्रिय वाचक, 

ही कथा राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आहे. त्यामुळे याला तुम्ही सपोर्ट कराल अशी आशा. मी इरावर फार नवीन लेखिका आहे. अथवा अजून लेखिका म्हणण्यायोग्य नाहीच. माझी ही पहिलीच स्पर्धा आहे. तेव्हा तुमच्या साथीने हा अनुभव खूप चांगला असेल हीच अपेक्षा ! 

नक्की कळवा कथा कशी वाटतेय..! ) 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//