दिसतं तसं नसतं - 61

Taniya rising back. Witness her journey. A marathi story of two little girls. One is from a poor family and the another one is from a rich family. Both of the girls think that their life sucks. They are very unfortunate. They are very unhappy. They look at each other and think that the next person is more happy than them. But in realty they both were equally happy and unhappy. Both have problems in their lives and sources of happiness as well. Many times in our lives we too think that others have better life than ours but who knows they may have more sufferings than us.

पुर्वावलोकन


अर्नवला एका सीरिअल च्या पटकथा लेखणाचं काम मिळालं आहे. तानियाचे बाबा त्यांची म्युसिक कंपनी लॉस मध्ये जात असल्याने टेन्शन मध्ये आहेत. तानियाने स्वतःला सावरून तिच्या उज्वल भवितव्याकडे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे.




आता पुढे


तानिया खुश दिसू लागली होती. ती सर्वकाही विसरण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या आईलाही तिला आनंदात बघून समाधान वाटत होतं. तिच्या रूममधून गाण्याचा आवाज येऊ लागला होता. तिने संगीताचा सराव सुरु केला होता.


बऱ्याच वेळा जीवनात जर आपली ध्येयावर नजर नसेल तर आपण नको त्या गोष्टींना महत्व देतो. परत परत त्याच गोष्टी आठवून दुःखी होतो. त्यामुळे जीवनात ध्येयावर नजर असणं व त्याकडे वाटचाल करणं महत्वाचं असतं.


ते सर्वजण जेवायला बसलेले होते. तेव्हा तानिया तिच्या बाबाला म्हणाली.


"बाबा मला संगीतक्षेत्रात पदार्पण करायचं आहे आणि आपली म्युसिक कंपनी पण आहे तर मी तेथूनच सुरुवात करते. तसंही माझ्या कानावर पडलं की आपली कंपनी लॉसमध्ये आहे. त्यामुळे आपण मोठे सिंगर तर अफोर्ड नाही करू शकत; पण आपण नवीन टॅलेंट ला संधी देऊ शकतो. माझ्याबरोबरच ईतर गायकांना देखील आपण लाँच करू शकतो."


तिच्या बाबांनी क्षणभर विचार केला.


"ग्रेट तानिया. ही कल्पना माझ्या डोक्यात आलीच नाही. खरंच खुप छान आयडिया आहे. म्हणजे जरी अल्बम फ्लॉप झाला तरी आपलं जास्त नुकसान होणार नाही आणि जर हिट झाला तर मंग तर चांगलंच आहे. यु आर जिनिअस तानिया."


"कशाची जिनिअस, आई तर नेहमी कमी मार्कांसाठी माझ्यावर रागवायची."


"अगं तानिया मार्कांच्या पलीकडे पण खुप मोठं जग आहे. तू तयारीला लाग. सुरुवात तुझ्यापासूनच करुत."


"हो तानिया बरोबर आहे मला अगोदर फक्त परीक्षेतील मिळालेले मार्क महत्वाचे वाटायचे पण मलाही हे नंतर जाणवलं होतं की त्यावतिरिक्तही भरपूर गोष्टी महत्वाच्या असतात. त्यानंतर कुठं रागावले मी तुझ्यावर?"


"हो."


त्यांच्या परिवारात आनंद परतला होता. ती तयारीला लागली. तिचं स्वप्न साकार होणार होतं.


********************************************


अर्नव चांगलं कमावू लागला होता. तसेच अनुनेही शिलाईचं दुकान चालू केलं होतं. तिच्या या उपक्रमातून बऱ्याच गृहिणींना काम मिळालं होतं. त्यांची परिस्थिती सुधारू लागली होती. त्यांनी एक चांगलं घर पण किरायाने घेतलं. लग्नाविना सोबत राहणं त्यांना बरं वाटू लागलं नाही त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसंही त्यांची परिस्थिती बऱ्याच अंशी चांगली झाली होती.


अनुचे आईबाबा खुप खुश झाले. ते उत्साहाने लग्नाच्या तयारीला लागले. ज्या क्षणाची त्या दोघांनी ईतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट बघितली होती तो क्षण म्हणजे त्यांच्या लग्नाचा क्षण, जवळ आला होता. ते सात जन्माच्या बंधनात अडकणार होते. दोन प्रेमी जीवनसाथी बनणार होते.


लग्न साध्या पद्धतीनेच पण रितिरिवाजानुसार पार पडलं. सर्वांनी त्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. सर्व विधी आटोपून ते घरी परतले.


अर्नव रूममध्ये आला. त्यांचा बिछाना छान सजलेला होता. बिछाण्याच्या बाजूला सुगंधित पुष्प लावलेले होते. त्याची नजर अनुवर पडली. ती लग्नाच्या जोड्यात, तिचे पाय जवळ घेऊन व पायांभोवती हात गुंडाळून बसलेली होती. दोघांची नजर भिडली. दोघांच्या गालावर हास्य आलं. तो तिच्या जवळ जाऊन बसला व त्याने तिचा हात हातात घेतला.


"अनु, मी कुठल्याही परिस्थितीत जगायला तयार आहे पण मला सोबत तू हवी आहेस. जीवनात कितीही चढउतार आले तरी चालतील पण आपल्या नात्यात मात्र कधीही दुरावा आला नाही पाहिजे."


ती क्षणभर त्याच्याकडेच बघत राहिली. किती प्रेम होतं त्याचं तिच्यावर. एक क्षण असा होता जेव्हा तिला वाटत होतं की त्यांचं लग्न होणं अशक्य आहे पण आज ते दोघे पतीपत्नी झालेले होते.


"नाही येणार आपल्या नात्यात कधीच दुरावा. आपण कोणत्याही परिस्थितीला मिळून नक्कीच मात देऊ."


त्याने मान हलवली. रूममध्ये अंधार होता. एक मेणबत्ती तेवत होती. फक्त तिचा तेवढा प्रकाश होता. ते एकमेकांकडे बघू लागले. अर्नवने तिचे गालावर आलेले केस तिच्या कानामागे लोटले. तिच्या गजऱ्याचा व तेथे लावलेल्या फुलांचा सुगंध हवेत दरवळत होता. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला. त्यांच्यातील अंतर हळूहळू कमी झालं. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात, ते दोघे प्रितीच्या मधाळ सागरात बुडाले होते.


********************************************


तानियाचा अल्बम लाँच झाला होता. तिने त्या अल्बमवर खूप मेहनत घेतली होती. गायणाबरोबरच ती तिच्या बाबांना कंपनीच्या ईतर कामातही मदत करू लागली.


तिच्या पहिल्या अल्बमला खुप चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर तिचे आणखी अल्बम लाँच झाले. ती हळूहळू एक गायक म्हणून नावारूपाला येऊ लागली. तिच्या चाहत्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली. त्यांची कंपनी प्रॉफिट मध्ये आली व पहिल्यापेक्षा जास्त उंचीवर जाऊन पोहोचली. नंतर तिने एका चित्रपटासाठी देखील गीत गायलं.


तिचे बाबा तिला शोधत होते.


"तानिया बाळा कुठे आहेस तू?"


"काय बाबा?"


"अगं तुला रायसिंग सिंगिंग स्टार चा अवार्ड मिळाला आहे. तसेच तुझ्या सर्व परफॉर्मन्सेस मुळे आपल्या कंपनीला अनेक ऑफर्स मिळू लागले आहेत."


ती बाबांच्या गळ्यात पडली. सर्वजण खुप आनंदात होते.


"अरे वाह, अशीच यशवंत हो तानिया."


ती आईच्याही गळ्यात पडली.


"आता तुझ्या लग्नाचं एकदा बघितलं पाहिजे म्हणजे झालं."


हे शब्द ऐकताच ती थोडीशी गंभीर झाली. कदाचित तिच्यासमोर तिचा भूतकाळ उभा राहिला असावा. तिच्या आईला स्वतःच्या शब्दांवर पश्चाताप होऊ लागला.


"कशाला बोलले मी? सगळा आनंद एका क्षणात मिटवून टाकला!"


ती तिच्या रूममध्ये निघून गेली. तिचे आईबाबाही थोडेसे गंभीर झाले होते.


डायलॉग ऑफ द डे

"अगं तानिया मार्कांच्या पलीकडे पण खुप मोठं जग आहे."


क्रमश


©Akash Gadhave



🎭 Series Post

View all