दिसतं तसं नसतं ( भाग - 42 )

A marathi story of two little girls. One is from a poor family and the another one is from a rich family. Both of the girls think that their life sucks. They are very unfortunate. They are very unhappy. They look at each other and think that the next person is more happy than them. But in realty they both were equally happy and unhappy. Both have problems in their lives and sources of happiness as well. Many times in our lives we too think that others have better life than ours but who knows they may have more sufferings than us. In fact everybody has moments of both happiness and sadness in their lives. We need to accept them both.

मागील अध्यायांचे अवलोकन


अनु गरीब घरातील मुलगी असून तानियाचं जीवन बघून तिची श्रीमंत होण्याची ईच्छा होते. तिला वाटते की श्रीमंत झाल्यावर तिच्या सर्व समस्या संपतील. तिला पन्नास लाखांची लॉटरी पण लागते पण तानियाची आई ते पैसे बळकावून टाकते. ती अभ्यासात खुप हुशार असते. पण तिच्या बाबांचा अपघात झाल्यामुळे तिला उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करणे भाग पडते.


तानियाचं जीवन बऱ्याच अंशी दुःखात गेलेलं असतं. अगोदर तिची आई तिच्यावर चांगले गुण आणण्याची सक्ती करत असते. नंतर तिला कळतं की ती अनाथ आहे. नंतर जेव्हा सगळं हळूहळू ठीक होऊ लागतं, तेव्हा तिला कळतं की तिच्या प्रियकराचं तिच्यावर प्रेम नसून त्याची तिच्या प्रॉपर्टीवर नजर असते. या सर्वांतून ती स्वतः ला सावरते.


आता पुढे


"अर्नव उठ. किती वेळ झोपतो रे तू! आळशी कुठला."


"ये गप्प ना. तुला काय करायचं आहे?"


"थांब तू. तू असं नाहीस ऐकणार."


तिने परदा सरकावला. सूर्यकिरणं काचांना भेदत त्याच्या चेहऱ्यावर पडले. त्याला ते सहन होत नव्हते. त्याने त्याच्या अंगावरील मखमली चादर तोंडावर ओढून घेतली.


"झोपू दे ना!"


तो अगदी लाडाच्या स्वरात म्हणाला.


"आता काय करावं?"


तिची नजर ए. सी. च्या रिमोटवर पडली. तिने ते रिमोट हातात घेतलं. ती स्वतःशी पुटपुटली.


"आता बघतेच कसा उठत नाही ते!"


तिने ए. सी. बंद केली. त्याला गरमी होऊ लागली. त्याने चादर सरकवली तर तोंडावर ऊन येऊ लागलं. ती गालातल्या गालात हसू लागली. तो उठला. तो डोळे बारीक करून तिच्याकडे बघू लागला. तिने त्याला जीभ दाखवली.


"थांब तू दाखवतोच तुला!"


तो तिच्यामागे धावत सुटला. ती ए. सी चं रिमोट घेऊन धावू लागली. ती रूममधून बाहेर आली. ती पायऱ्यांवरून खाली जावू लागली. तोही तिच्या मागेच धावत होता. त्याने डाव्या साईडला असणारी, जमिनीला लागणारी तिची ओढणी हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण तिने तेवढ्यातच ओढणीला गुंडाळून जवळ घेतलं.


ती किचनमध्ये शिरली. सर्व कामवाल्या बाया त्यांच्याकडे बघून हसू लागल्या.


"काय हा वेडेपणा? मोठे झालात शरीराने पण मन मात्र तेवढंच आहे."


ती आईच्या पाठीमागे लपली. ती आईच्या खांद्याला पकडून त्याला अडवू लागली.


"अगं! काय करतेय? सोड मला. चला, बाहेर व्हा."


"बघ ना आई हिने रूममध्ये येऊन ए. सी बंद केला."


"तो तसा उठतच नव्हता. आळशी कुठला."


"तुला काय करायचंय? माकडी कुठली. "


"अरे लहान बहिणीशी असं बोलतात का?"


"आता माकडी ला माकडी नाही म्हणणार तर काय म्हणणार?"


तेथे हास्य फुललं. तिने डोळे बारीक केले व हात कमरेवर ठेवले.


"बघ ना आई!"


आईच्या मानेभोवती स्वतः चे हात गुंडाळत ती म्हणाली. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.


"मीच सांगितलं होतं तिला. आळशी कुठला. माझं बाळ. नाहीए तू माकडी."


ती अजूनच लाडावली. त्याच्याकडे बघून ती हसू लागली.


"आई तू नेहमी तिचीच बाजू घेते!"


"ते असू दे. तू तयार हो लवकर. आज तुझ्या पहिल्या फिल्मचं उदघाटन आहे ना. जा गं तयार कर त्याला. तुला फॅशन डिसाईनर व्हायचं आहे ना."


"हो."


"अगं आई. मी तर फक्त रायटर आहे ना मुव्ही चा. मी काय करू तेथे जाऊन."


"अरे तुझे बाबा बाहेर गेलेत. त्यामुळे तू रायटर व प्रोड्युसर दोन्ही आहेस. सगळं तुलाच बघावं लागेल."


"बरं ठीक आहे."


ती पण त्याच्या मागे निघाली.


"ए, खबरदार. मी स्वतः तयार होईन. तू उगाच विचका करून टाकतेस."


"आई!"


"जा तू. काही म्हणाला तर मला सांग."


"ठीक आहे."


ती त्याच्या मागेमागे आली. तो शॉवर घेण्यासाठी गेला. तिने त्याच्या कपाटातून एक ड्रेस काढून ठेवला. तो शॉवर घेऊन बाहेर आला. डोकं पुसतांना त्याची नजर ड्रेसवर पडली. त्यावर एक नोट पण होती. त्यात लिहिलं होतं, 'हा ड्रेस घाल. छान दिसशील.' त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं. तो ड्रेस घालून आरश्यासमोर उभा राहिला. त्याने त्याचे केस हाताने मागे लोटले. तो निघाला.


त्याची आई हातात ताट घेऊन आली. त्या त्याला कुंकू लावू लागल्या.


"आई काय हे ओल्ड फॅशन्ड!"


"गप्प बस. आला मोठा ओल्ड फॅशन्ड."


त्यांनी त्याच्या कपाळावर टिका लावला. त्याला ओवाळलं.


"तुझी पहिली फिल्म आहे ना! यशस्वी हो."


त्यांनी ताट बाजूला ठेवलं. तो त्यांच्या पाया पडला.


"काय हे ओल्ड फॅशन्ड!"


सर्वजण हसू लागले. त्यांनी हात बाजूला केले. तो त्यांच्या हृदयाशी लागला.


"ऑल द बेस्ट भय्या."


तिला कवेत घेत तो म्हणाला.


"थँक्यू शरू."


तो बाहेर आला. एक ब्लॅक कलरची कार समोर उभी होती. ड्रायवरने त्या कारचं दार उघडलं. त्याने गाडीमध्ये बसतांना मागे बघितलं. त्याची आई व शरयू त्याला बाय करत होते. त्यानेही हात हलवला. तो गाडीत बसला. तो थोडासा नर्व्हस होता. ही त्याची पहिलीच फिल्म होती. त्याच्या खांद्यावर खुप मोठी जबाबदारी होती. ड्रायवर ने गाणं सुरु केलं.


"कुछ पाने की हो आस आस,

कोई अरमान हो जो खास खास

आशायें आशायें आशायें

हर कोशिश मे हो वार वार

करे दारियायोंको आर पार

आशायें आशायें आशायें

तुफानों को चिरके, मंजिलों को छिनले

आशायें खिले दिल की, उम्मीदें हसे दिल की

अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी."


त्या गाण्याने त्यात स्पुर्ती भरली होती. त्याला ऊर्जा मिळाली होती. त्याने दीर्घ श्वास घेतला. त्याला कारमधील ए. सी चा गारवा जाणवत होता. तो त्याच्या रस्त्यात येणाऱ्या आव्हानांसाठी सज्ज होता.


क्रमश.


©Akash Gadhave 🎭 Series Post

View all