दिसतं तसं नसतं ( भाग - 27 )

A marathi story of two little girls. One is from a poor family and the another one is from a rich family. Both of the girls think that their life sucks. They are very unfortunate. They are very unhappy. They look at each other and think that the next person is more happy than them. But in realty they both were equally happy and unhappy. Both have problems in their lives and sources of happiness as well. Many times in our lives we too think that others have better life than ours but who knows they may have more sufferings than us. In fact everybody has moments of both happiness and sadness in their lives. We need to accept them both.

बाल अध्यायाचे अवलोकन


अनुला तानियाचं जीवन बघून श्रीमंत होण्याची ईच्छा होते. तिचा समज होऊन जातो की श्रीमंतांच्या जीवनात दुःख, कष्ट नसतात. तानिया अभ्यासात थोडी कच्ची असल्याने तिची आई सुरुवातीला सतत तिच्यावर बंधनं घालत असते. तसेच तिच्या भविष्याची अति काळजी करत असते. तानियाचा अभ्यास सुधारावा म्हणून तिची आई हुशार अनुला तानियासोबत अभ्यास करायला बोलवते. तानियाला अनुचा हेवा वाटायला लागतो.


अनु श्रीमंत होण्याच्या आशेने लॉटरीचं तिकीट घेते. तिला पन्नास लाखाचं बक्षीस देखील मिळतं. पण तिला कळण्याअगोदरच तानियाची आई ते बळकावून घेते. तानियाला आईकडून प्रेम व मोकळीक हवी असल्याने ती कॉपी करण्याचा मार्ग अवलंबते. तिला अगोदरच तिच्या अनाथ असल्याबद्दल कळलेलं असतं. देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाने तानिया त्या दुःखातून सावरते. ती कॉपी करतांना पकडली गेल्यावर तिच्या आईला कळतं की ती अनाथ आहे हे तानियाला कळलं आहे. त्यांची वागणूक नंतर बदलते. त्यांना जाणीव होते की फक्त परीक्षेत मिळालेल्या गुणांनीच माणसाचं भविष्य ठरत नाही. अर्नव व त्याचं कुटुंब दुसरीकडे शिफ्ट होतं . तसेच तानिया अनुला रागात बरंच काही बोलून जाते. अनु ठरवते की ती तानियाच्या घरी परत कधीच येणार नाही.


आता पुढे


"तानिया उठ."


"झोपूदे ना आई."


तिने चादर तोंडावर घेतली.


"तुला काही वाटतं की नाही? एवढी मोठी झालीस तरीपण थोडीही गंभीरता नाहीए. पुढच्यावर्षी दहावी आहे ना."


"आई मला सिंगर व्हायचं आहे. तसेच मी अनेक...."


"हो बाळा माहितिये की तू अनेक स्पर्धा पण जिंकल्या आहेत", तिला अडवत तिची आई म्हणाली.


"पण पास तर व्हावं लागेल ना. नाहीतर एवढी मोठी सिंगर दहावी फेल कसं वाटेल ते?"


"आय डोन्ट केअर."


"अगं! जास्तच लाडवतेय तू दिवसेंदिवस. चल उठ आणि ते सिंगर होण्यासाठी पण साधना करावी लागते ना."


"काय आई, झोपू पण देत नाही!"


"उठ, आळशी कुठली. दहा वाजलेत! रात्री ते मोबाईल बघणं बंद कर बरं."


"तू माझ्या मोबाईलच्या मागेच पडलेली असतेस नेहमी. तसंही आज रविवार आहे म्हणून झोपले ना."


"हो चल तयार हो. तुझ्यासाठी तुझं फेव्हरेट पनीर बनवलं आहे आज."


तिने आईला घट्ट पकडून घेतलं.


"यु आर सो स्वीट मम्मी."


"अगं, सोड. लहान मुलींसारखं वागतेस नेहमी."


"मी लहानच आहे. पंधरा वर्षांची तर आहे."


"पंधराव्या वर्षी माझ्या आईचं लग्न झालं होतं."


ती हसायला लागली.


"चल आपण सोबत जेवू. "


"अगोदर ब्रश, अंघोळ कर."


"हो आईसाहेब. जशी तुमची आज्ञा."


तिची आई निघून गेली. ती ब्रश करू लागली. ती अंघोळीला जाणारच तेवढ्यात तिचा फोन वाजला. ती धावत आली. तिने आजूबाजूला बघितलं. नंतर फोन उचलला.


"हॅल्लो."


तिकडून काहीच आवाज आला नाही.


"हॅलो. अरे बोल काहीतरी."


"किती छान आवाज आहे ना तुझा! तुझा आवाज ऐकल्यावर बोलायचं सुचतच नाही मला. ऐकतच रहावं वाटतं."


तिच्या गालावर गुलाबी रंग चढला. स्वतः ला सावरत ती म्हणाली.


"बसबस. कधीपण माझी स्तुतीच करत असतोस."


"अगं तू आहेसच स्तुती करण्यासारखी."


"बरं ठीक आहे. फोन करण्याचं काही विशेष कारण आहे का?"


"आपल्याला बोलायला विशेष कारण हवं आहे का?"


"नाही. बरं अजून काय म्हणतोस?"


"तुला भेटायची ईच्छा होत आहे."


"अरे रोज तर भेटतोच ना आपण स्कुलमध्ये. कालच तर भेटलो होतो. उद्या परत भेटू."


"मला एक दिवस पण राहवत नाही तुला भेटल्याशिवाय. तसंही मी कुठं तुझ्या स्कुलमध्ये आहे? तू लगेच निघून जातेस."


"बरं ठीक आहे. नाराज नकोस होऊ प्लिज. येते मी थोड्या वेळाने."


"हो लवकर ये. आपण रोज जेथे भेटतो तेथे."


"बाय. लव्ह यु."


"बाय. लव्ह यु टू."


तिने मोबाईल ठेवला. शॉवर घेतलं. नंतर ड्रेस घातला. तिने तिच्या मोबाईलवर तिची आवडती प्लेलीस्ट सुरु केली. ती हेअर ड्रायरने तिचे केस वाळवू लागली. केस वाळवल्यानंतर ती आरश्यासमोर येऊन उभी राहिली. तिने पॉईंट टिकली तिच्या कपाळावर लावली. ओठांवर गुलाबी लिपस्टिक लावली. कानातले घातले. हातात ब्रेसलेट घातलं. तिचे केस मागे एकत्र करून त्यांना क्लिप लावली. तिच्या कानांवर मोबाईलमध्ये चालू असलेल्या 'गोव्याच्या किनाऱ्यावर' गाण्याचे बोल पडत होते.


"नको बघू असं मनी होतंय कसं

माझ्या काळजाणं भरलिया लाज

तुझ्या नजरेच्या जाळ्यामंदी

काळीज गुतलं आज."


ते बोल ऐकतांना ती स्वतः ला न्याहाळत होती. स्वतः शीच लाजत होती. वेगळ्याच भावविश्वात ती जगू लागली होती. पंधरा वर्षांची तर होती ती. या वयात प्रेमात पडणाऱ्यांमध्ये वेगळीच धुंदी असते. तिच्या नजरेत प्रेम ही जगातील सगळ्यांत सुंदर गोष्ट होती. तिला प्रेमाची दुसरी बाजू, विदारकता माहित नव्हती.


तिने पापण्यांना आयलाईनर लावलं. पर्फ्यूम हातात घेतला. तो अगोदर मनगटावर टाकला. दीर्घ श्वास घेत तिने तो सुगंध अनुभवला. नंतर तिने तो पर्फ्यूम अंगावर लावला. तिने तिच्या स्कुटीची चावी घेतली व ती चावी बोटाने फिरवत दरवाजाच्या दिशेने वळली. तिचे पाऊल थांबले. तिची आई समोर उभी होती.


"काय तानिया, किती वेळ? "


त्यांचं लक्ष तिच्या हातातील चावीकडे गेलं.


"आणि कुठे निघालीस? जेवण करून घे अगोदर."


"नको आई मला जावं लागेल."


"मला माहित आहे तू कुठं जातेय ते."


तिच्या मनात धस्स झालं. आईला कसं कळलं? ती तर नेहमी ईतकी सतर्क असते. आता आईची प्रतिक्रिया काय असणार?


क्रमश.


#मोमेन्ट ऑफ द डे

तिने आईला घट्ट पकडून घेतलं.

"यु आर सो स्वीट मम्मी."


©Akash Gadhave 🎭 Series Post

View all