दिसतं तसं मुळीच नसतं

Marathi katha

"किती छान जोडी आहे ना त्यांची? अगदी राजा-राणीचा जोडा आहे.." रेश्मा

"हो ना.. नाहीतर आमचे हे ध्यान.. काय म्हणावे.." सुलभा

"तिचा नवरा बघ कसा तिला रोज फिरायला घेऊन जातो.. हॉटेलमध्ये जातो.. मस्त मस्त कपडे घालतात.. किती छान चाललंय त्यांचं.." रेश्मा

"बघ ना आणि आम्हाला नुसता घरातली काम करा.. साधं घरातल्या जेवणाचं कौतुक पण कधी नाही.. नेऊन दिल की खायचं नुसता.. यापलीकडे काही येत नाही.." सुलभा

"मला तर त्यांचा खूप हेवा वाटतो बाई.. मला पण असं हव वाटतं सगळं.. किती छान.." रेश्मा

"आपण जाऊन भेटायचं का त्यांना? भेटल्यावर थोडं बरं वाटेल.. कशी ती इतकी नवऱ्याला पटवते ते विचारू आपण.." सुलभा

सुलभा आणि रेश्मा दोघी पण पक्या शेजारी.. त्यांच्या शेजारी नवीन राहायला आलेलं जोडपं मेघा आणि तुषार यांच्याबद्दल त्यांना खूप हेवा वाटत असतो.. त्यांना बघितलं की आपणही त्यांच्या प्रमाणेच असावे असे त्यांना वाटत असतं.. आणि त्यामुळे त्या घरी येऊन नवऱ्याला काहीबाही बोलून त्रासून सोडत असतात..

एक दिवस ठरल्याप्रमाणे त्या दोघीही मेघाच्या घरी जाऊ लागतात.. गेटमधून आत जातात आणि दारावरची बेल वाजवणार.. इतक्यात त्यांना आतून आवाज येतो.. "तुला साधा चहा करायची अक्कल नाही.." असे म्हणून तुषार हातातील कप फेकून देतो.. हे त्यांना दाराच्या फटीतून दिसतं आणि त्यांचा स्वतःवरच विश्वास बसत नाही.. बाहेर इतकी गोड जोडी वाटणारी ही.. घरात मात्र यांचे भलतेच आहे.. मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो.. दिसतं तसं मुळीच नसतं.. त्या दोघी तशाच बाहेर पडतात..

"आमचे हे असे नाहीत बाई.. जे असेल ते अगदी न काही म्हणता खातात.. कधीच नाव ठेवत नाही.." सुलभा

"हो बाई आमचे हे तर माझ्यासमोर जोरात बोलत देखील नाहीत.." रेश्मा

यावरून हेच स्पष्ट होते की, प्रत्येकाने आपल्या जवळ काय आहे तेच बघावे? इतरांप्रमाणे करायला गेल्यास त्यात आपल्याला काही ना काही दोष आढळून येतात.. त्यामुळे तुझे आहे तुझ्यापाशी, दुसऱ्याकडे पाहू नको..