दिशाभूल ( भाग 6)
( माघील भागात आपण पाहिले प्रीती ने ती वस्तू करण च्या गळ्यात टाकली )
आता पुढे .........
गळ्यात ती वस्तू पडताच एक किंचाळी कानावर पडली
प्रीती व करण ने दोन्ही हात कानावर ठेवले व मान खाली घातली
थोडा वेळ त्याच स्थिती मध्ये राहून जेव्हा त्यांनी वरती पाहिले तेव्हा खुप बदल झालेला होता
तो रस्ता अचानक
नेहमीप्रमाणे भासत होता ती गर्द झाडी आता विरळ झाली होती
ना कसला विचित्र आवाज ना अजून काही
दूर उभा त्यांना त्यांची गाडी दिसत होती
ती बाई अजूनही त्यांच्याकडे पाट करून च उभा होती
"चला आपली सोबत इथपर्यंत च होती
तो बघा तो डांबरी रस्ता दिसतोय ना तो तुम्हांला तुमच्या घरी घेऊन जाईल
नीट जा आरामात जा
सुखाने संसार करा
पण आता आयुष्यत कधीच दिशा चुकू नका
मोठी माणसे जे सांगतात ते ऐकत जा
जा मुलांनो जा "
त्या बाई च्या बोलण्यात प्रेम जाणवत होते
माहीत नाही का ?
पण ती बाई या मुलां पासून काहितरी लपवत होती,
"आम्ही जाऊ आता बरोबर पण तुमचे काय ??
तुम्ही कोण आहात
व तुम्ही कुठे जाणार
आमच्या सोबत चला आम्ही सोडतो
तुम्हांला " प्रीती कळवळून म्हणू लागली
"मला माझी काही बंधने आहेत जी मी तोडू शकत नाहीत
तुम्ही माझी काळजी न करता इथून लवकर जा "
ती बाई पुन्हा विनवणी करत म्हणाली
" ठीक आहे
पण तुमच्यामुळे खुप मदत झाली मनःपूर्वक आभार "
प्रीती हात जोडत म्हणाली
ती बाई न बोलता च निघून
कुठे गेली
कशी गेली हे कुणालाच कळले नाही
करण व प्रीती आपल्या गाडीने घरी निघाले
घरात सर्व त्यांची वाट च बघत होते
त्यांना बघताच करण च्या आई ने करण ला मिटी मारली
कारण ती दोघे गेल्यापासून त्यांनी घरातील लोकांना करण कधी येणार करण कधी येणार म्हणून परेशान करून सोडले होते
थोडे घरात विसावल्यावर
प्रीती ने घडलेली सगळी हकीकत घरी सांगितली
करण च्या बाबा चा देखील त्याच्या आई च्या या वेडेपणा ला विरोध होता
पण आज प्रीती च्या तोंडातून
सगळ्या गोष्टी ऐकून
आपल्या पत्नी ला फक्त भास होतात कारण ती खुप विचार करते करण बद्दल याची त्यांना जाणीव झाली,
शेवटी करण चे लहानपणी पासून चे जपून ठेवलेले कपडे , ती पेटी, व करण ला जन्म देताच त्याच्या खऱ्या आई चा झालेला मृत्यू , तिची जपून ठेवलेली साडी सर्व काही त्याने विसर्जित केलं
कारण करण च्या या आई ला सतत भीती होती
ती येईल व करण ला तिच्यापासून दूर घेऊन जाईल
पण आज ती आली होती पण
तिने करण सुखरूप घरी पाठवला होता,
लेकरांच्या ओढीने आई कुठेही येऊ शकते आज सिद्ध झालं होतं
आता प्रीती व करण आनंदाने राहू लागले व करण च्या आई च्या मनातील भीती आता दूर झाली होती
त्यांना प्रत्येकाला त्यांची योग्य दिशा मिळाली होती
कथा समाप्त
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा