दिशाभूल ( भाग 5)

Bhaypat

दिशाभूल ( भाग 5 ) 

( माघील भागात आपण पाहिले करण व प्रीती ला एक सुंदर घर दिसले होते व ती दोघे तिकडे वळली होती )

आता पुढे ...........

ती बाई पुढे पुढे जात होती व मधेच प्रीती व करण त्या घराकडे वळले, 

त्यांना त्या बाई ने सांगितलेल्या गोष्टी चे भान देखील नव्हते 
ती दोघे खुश होती फक्त ते सुंदर घर बघून 
काही अंतर चालून ते त्या घराजवळ पोहोचले तोही एक आविष्कार च होता, इतके घनदाट जंगल , काळीज पिळवटून टाकणारा आवाज, काळा कुट्ट अंधार आणि रस्त्यावर कुणीच नाही अशा ठिकाणी हे सुंदर घर दिसणे म्हणजे योगायोग च होता
ती दोघे त्या घरात पोहोचले 
घरातील प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवली होती 
इतकी की जसे कुणी राहात होते तिथे, 
घरात टिव्ही, प्रिझ, सोफा सगळ्या वस्तू होत्या 

"वाव किती छान ना मी पटकन फ्रेश होते" 
प्रीती आनंदाने म्हणाली 

इतका वेळ नाही नाही करणारा करण देखील आता तयार झाला 
तो तिथेच सोप्यावर आडवा झाला 
ती जागा इतकी स्वच्छ होती की धुळीचा अंश ही दिसत नव्हता, 
प्रीती तयार होऊन हॉलमध्ये आली पण करण अजूनही त्याच ठिकाणी होता 
त्याला अजूनही जे  घडतंय त्यावर विश्वास नव्हता, 
त्याने
प्रीतिकडे पाहिले 
तिने  लाल रंगाची साडी घातली 
होती 
आता सगळं लाल लाल होणार म्हणून तो पुटपुटला 
त्या घरात ती दोघे स्वतः चे घर असल्या प्रमाणे वावरत होती 
त्यांना तिथे येऊन खुप वेळ झाला होता 
प्रीती ने खिडकी उघडून बाहेर बघितले तर 
तिला बागेतील फुलझाडे सुकल्या सारखे वाटले, 
आता तर ही फुले आनंदाने डोलत होती मग सुकली कशी 
या प्रश्नाने तिच्या मनात घर केले, 

दिवस आहे की रात्र याचे त्यांनाच भान नव्हते

तेवढ्यात अचानक करण जोर जोरात हसू लागला 
काय झाले हे कळण्याच्या आत 
तो घरातून वेगाने बाहेर आला 
त्याच्या मागे च प्रीती देखील बाहेर पडली 
"करण काय झाले " 
ती कळवळून विचारू लागली 

पण करण फक्त हसत होता 
हसत हसत तो वाऱ्याच्या वेगाने धावू लागला 
तो पुढे व प्रीती माघे 
ती दोघे धावत धावत पुन्हा त्याच रस्त्यावर आले 
पुन्हा तोच अंधार, तो आवाज , तोच रस्ता व समोर ती बाई उभा 
सगळं काही अगोदर प्रमाणे झाले होते पण आता करण बदलला होता 
कारण उद्या मारत होता 
हसत होता 
मध्ये च प्रीती ला त्रास देत होता 
प्रिया आता त्याच्या समोर हतबल झाली 
ती त्या बाई ला मदती साठी विनवणी करू लागली 
तेव्हा तिला त्या बाई चे शब्द आठवले 
जे ती करण साठी बोलली होती 
ते शब्द आठवून प्रीती 
करण ला हाताने ओढत ओढत घेऊन हळूहळू पुढे जात होती 
आता त्या बाईच्या खुप जवळ ही दोघे पोहोचली व पुन्हा चालू झाला त्या तिघांचा प्रवास 

"मला माहित नाही तुम्ही कोण आहात पण तुम्ही जे सांगितलं होतं ते सगळं खरं झालं त्यामुळे 
मी तुमची खुप आभारी आहे पण कृपा करा व आम्हाला यातून बाहेर काढा माझ्या करण ला नीट करा " 
प्रीती कळवळून बोलू लागली

"हा विचार तू त्याच्या गळ्यातील वस्तू काढताना करायचा होतास 
अजूनही वेळ गेलेली नाही ती वस्तू शोधून काढ 
तीच तुझ्या नवऱ्याला वाचू शकते " ती बाई माघे न बघताच म्हणाली

आता प्रीती ला तिची चूक कळून चुकली 
पण तिच्या समोर खंबीर होण्यापेक्षा दुसरा पर्यंत नव्हता म्हणून ती 
करण ला तिथेच ठेऊन माघे निघाली , 
भयानक रस्ता व एकटी ती 
कधी चालत तर कधी पळत होती 
धावून धावून ती घामागूम झाली होती , 
शेवटी प्रीती त्या जागेवर जाऊन पोहोचली पण तेव्हा रागाने फेकलेली वस्तू नेमकी कुठे पडली ते तिलाही आठवत नव्हते, 
तिने शोधा शोध चालू केली 
खुप शोधल्या नंतर शेवटी तिला ती वस्तू मिळालीच 
फेकताना ज्या रागाने तिने ती वस्तू फेकली होती 
आता तो राग नाहीसा झाला होता 
ती वस्तू पटकन उचलून तिने जवळ घेतली व पुन्हा धावत माघे फिरली 
आज ती कथेतील सावित्री शोभत होती जिने स्वतः च्या पतीचे प्राण वाचवले होते,

प्रीती धावत करण जवळ आला पण बघून ती थक्क च झाली करण जमिनीवर पडलेला होता 
व ती बाई त्याच्याकडे पाट करून उभी 
"करण उठ ना 
करण काय झालंय तुला उठ ना रे मी आले बघ " 
प्रीती रडत रडत म्हणत होती 

"तो नाही उठणार त्याच्या गळ्यात ते बांध व वाट बघ थोडा वेळ 

ती बाई करण कडे न बघताच म्हणाली 

प्रीती ला हे सगळं खुप विचित्र वाटत होते पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून तिने पटकन 
त्याच्या गळ्यात ती वस्तू टाकली 
ती वस्तू करण च्या गळ्यात टाकताच एक किंचाळी तिच्या कानावर पडली, 
ती किंचाळी इतकी भयानक होती की क्षणभर प्रीती सुन्न झाली 
तिला अनेक प्रश्न पडले 
या वस्तू चा व करण चा संबंध काय ??
का दिली असेल आई नें सोबत 
खरच असत का अस काही 
व ती किंचाळी कुणाची असेल 
मनात माजलेला गोधळ दडपून टाकत ती उठून उभा राहिली 
एक नजर तिने त्या समोरच्या बाई वर टाकली तर अजूनही ती तिथेच होती शांतपणे उभा 
काय असेल प्रीती व करण ची पुढची दिशा 
मिळेल नवी दिशा की होईल त्यांची च दशा जाणून घेण्यासाठी सोबत रहा 

भाग पोस्ट करायला उशीर झाला त्याबबद्दल क्षमस्व

🎭 Series Post

View all