दिशाभूल ( भाग 4)

Bhaypat

दिशाभूल ( भाग 4 )

( माघील भागात आपण पाहिले करण च्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला होता ) 

आता पुढे .......

करण च्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला 
तो घाबरला 
व त्याने माघे पाहिले 
तर एक जेमतेम चाळिशी तील व्यक्ती असेल समोर 
विष म्हणजे स्त्री होती ती 
इतक्या रात्री या सामसूम ठिकाणी ही स्त्री कोण असेल???
त्याने आवंढा गिळला व पटकन प्रीती चा हात पकडला 
त्याने स्वतः च्या जीवपेक्षा प्रीती ची काळजी वाटत होती, 


तो घाबरत घाबरत बोलू लागला 

"कोण तुम्ही 
व इथे काय करताय 
तुम्ही आमची मदत कराल का ??

तो व्याकुलतेने म्हणाला 

"हो पण काही अटी चे पालन करून 
जर मान्य असेल तर बोला 
एक तर तुम्ही या रस्त्याने यायला नको होते 
पण आलाच आहात तर आता 
सामोरे जा जो येईल त्याला 
माझ्या पासून अंतर ठेवून " 

कधी तरी करण ने ऐकले होते की भूता चे पाय उलटे असतात 
म्हणून तो खाली बघण्याचा प्रयत्न करू लागला 

"खाली बघू नको 
काहीच हाती लागणार नाही 
मी जे सांगेल ते ऐकणार असेल तर सांग ??
मग पुढे बोलू नाहीतर जाते मी " 
ती त्यांच्यावर ओरडून म्हणाली 

"हो सागा ताई आम्ही सगळं ऐकू " 
प्रीती घाबरून म्हणाली 

"ताई .......
उगाच नाते जोडू नको मग तोडणं अवघड होऊन बसेल " 
ती बाई हसत म्हणाली 

करण व प्रीती ला काही कळत नव्हते
पण सध्यातरी त्यांना दुसरा मार्ग दिसत नव्हता 

"ऐकूयात ना करण त्यांचे 

असे म्हणून प्रीती ने करण ला गळ घातली 

"हो चालेल सांगा तुम्ही " 
करण सहमती दर्शवत म्हणाला 

"ठीक आहे 
मी पुढे चालेल तुम्ही काही अंतर ठेवून माझ्या पाठीमाघे या 
रस्त्याने वेगवेगळे आवाज येतील 
तुम्हांला थांबायला सांगतील 
तुम्हाला सोबत येण्यासाठी सांगतील पण तुम्ही जायचे नाही 
काही झाले तरी माघे वळून बघायचे नाही 
आणि तू ग पोरी 
तुझा खुप मोठा वाटा आहे आता 
हा तुझ्या सोबत असलेला मुलगा कधी कधी वेगळं बोलेल तुला माघे नको जाऊ म्हणून सांगेल वेळ पडली तर तुला ईजा देखील करेल पण तू त्याचे ऐकू नको 
जर हे सगळे नियम पाळले तर तुम्ही सुखरूप तुमच्या घरी जाताल 
बाकी जास्त डोकं चालवू नका 
काळ कसोटीचा व वेळ धोक्याची आहे 
समजलं " 
त्या बाई ने एका दमात बोलून टाकले 

करण व प्रीती आता जास्त च घाबरले काय बोलतेय ही बाई काही कळत नव्हते पण करण काही बोलणार तोच प्रीती म्हणाली 
"चालेल 
तुम्ही जे सांगताल ते ऐकू पण तुम्ही आम्हाला वाचवा " 
असे म्हणून प्रीती ने हात जोडले 

"चालेल चला मग माघे व जे सांगितले ते लक्षात ठेवा व आणखी एक समोर मला कुणीतरी मारतय किंवा तुम्हांला माझ्या भोवती आगेचे

गोळे देखील दिसतील पण तुम्ही घाबरू नका " 

ती पुन्हा सूचना देत म्हणाली 

"नंतर काय होईल माहीत नाही पण ही बाई च प्रीती ला जास्त घाबरवत आहे व प्रीती देखील हो हो करत आहे " 
करण मनातल्या मनात विचार करून हसू लागला 

"हसू नको 
माघे चल " 
ती बाई करण वर ओरडत म्हणाली 

"अरे मी मनात हसलो पण या बाई ला कसे कळले " 
करण मनात विचार करू लागला

ती बाई पुढे पुढे चालत होती व करण व प्रीती माघे, 

आता बराच वेळ झाला होता ती दोघे हळूहळू पाऊले टाकत त्या बाई च्या माघे निघाली होती 

तेवढ्यात जोरात किंचाळी ऐकू आली 
ती दोघे जागेवर थांबली पण त्या बाई चे शब्द आठवून प्रीती ने करण ला हाताला धरून ओढले 

काळाकुट्ट अंधार 
रस्त्यावर फक्त हे तिघे 
समोर ती बाई व माघे हे दोघे 


थोड्या वेळाने पुन्हा आवाज आला पण आता लहान लेकरांच्या रडण्याचा आवाज होता 
इथे करण थोडा भावुक झाला 
"प्रीती कुणाचे तरी बाळ रडतय 
त्याला गरज आहे आपली 
बघुयात का कुणाचे आहे "
करण हट्ट करत म्हणाला 

"नको करण चल तू 
असू दे कुणाचे पण असेल 
आपल्याला काय त्याचे 
तू चल " 
असे म्हणून ती करण ला ओढू लागली 

"थांब प्रीती तू इतकी कशी  निर्दयी आहेस तुला भावना आहेत की नाही " 
करण रागात म्हणाला 

करण वर परिणाम होतोय या सगळ्याचा हे प्रीती ला जाणवत होते 
ती रडू लागली
करण ला पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली 
न थांबण्यासाठी
पण तो पुन्हा पुन्हा हट्ट करत होता माघे जाण्यासाठी 

आता हळूहळू ती बाई व हे दोघे यांच्यातील अंतर वाढत होते 
तेवढ्यात 
अचानक धुराचे लोट आले व त्यात ती बाई दिसेनाशी झाली 

अरे कुठे गेली असेल ती बाई आता आम्हाला रस्ता कोण सांगेल ती दोघे विचार करू लागली 
तेवढ्यात आकाशात वीज चमकावि असा लख्ख प्रकाश पडला व ती बाई त्या प्रकाशात पुन्हा दिसली 
करण व प्रीती च्या चेहऱ्यावर हसू आले 
ती बाई दिसताच ती दोघे तिच्या माघे धावत सुटले वाऱ्याच्या वेगाने 
प्रत्येक झाड माघे टाकत ते  पळत होतो 

तेवढ्यात एक सिंदर घर दिसले 
ते इतके सुंदर होते की त्याला बघून प्रीती त्या बाई ने सांगितलेले सगळं विसरली 
त्या घराच्या लखकणार्या काचा 
समोरील फुलांची झाडे 
त्या दोघांना मोहित करत होती 

"चल तिकडे जाऊयात नक्कीच कुणीतरी राहात असेल तिथे " 
करण तिकडे बोट करत म्हणाला 

"हो चल " 
घर बघून प्रीती देखील तयार झाली 

आपोआपच त्या दोघांची पाऊले त्या घराकडे वळली 

कोणाचे असेल तर घर ???
ती बाई कुठे जाईल ??
ही दोघे भेटतील का त्या बाई ला पुन्हा 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 

धन्यवाद

🎭 Series Post

View all